एक सुपरहोस्ट कशा प्रकारे एक अनुभव होस्ट बनले
लॉस एंजेलिस मधील सुपरहोस्ट बर्ट ब्लॅकराचने उत्तम संधी ओळखण्यात नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संगीतकार आणि गायकांच्या कुटुंबात लहानाचे मोठे झाल्यानंतर, वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या आई-वडिलांची संगीत प्रकाशन कंपनी चालवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, बर्टची संगीत कारकीर्द एका ग्रॅमी विजेत्या अल्बमच्या ध्वनी अभियांत्रिकीपासून आणि एक हिट एचबीओ मालिका मिळवण्यापासून, सुपर बाऊल दरम्यान प्रसारित होणाऱ्या जाहिरातींसाठी संगीत तयार करण्यापर्यंत—आणि अलीकडेच, Airbnb वर एक सांगीतिक अनुभव होस्ट करण्यापर्यंत विस्तारली आहे.
अनुभव होस्ट करणे कसे सुरू केले, त्याचा ते गेस्ट्सचे त्यांच्या घरामागील कॉटेजमध्ये ज्या पद्धतीने स्वागत करतात यावर कसा परिणाम झाला, आणि हे करताना ते वाटेत काय शिकले हे जाणून घेण्यासाठी आम्ही बर्टबरोबर बसलो. त्यांना काय म्हणायचे होते ते येथे आहे.
तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगा. तो कशामुळे युनिक आहे?
“माझा अनुभव आहे एका दिवसासाठी डीजे बना. माझ्या स्टुडिओमध्ये मी लोकांचे छोटे ग्रुप्स होस्ट करतो आणि त्यांना रेकॉर्डिंग आणि मिक्सिंगच्या मूलभूत गोष्टी शिकवतो, संगीत कसे निवडावे, चांगला ठोका कशाने बनतो, अशा सगळ्या गोष्टी. Airbnb वर हा या प्रकारचा पहिलाच अनुभव होता आणि त्याने असा प्रभाव निर्माण केला ज्याबद्दल इतर कोणीही विचार केला नव्हता.”
अनुभव म्हणून डीजे चे काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यामागचे कारण काय होते?
“बरेच लोक डीजे कसे व्हावे हे शिकू इच्छितात कारण त्यांना वाटते की ते सोपे आहे, पण त्यामध्ये उपकरणे आहेत आणि संगीत निवडणे आणि हे सर्व एकत्र कसे काम करते हे समजून घेणे आहे. तुम्हाला तुमचे संगीत ऐकण्यास चांगले असावे असे वाटत असल्यास, ते बरेच किचकट आहे
"मी आठव्या इयत्तेत असताना माझ्या मित्रांसह डीजेचे काम शिकण्यास सुरुवात केली, जी खरोखरच माझ्या संगीत कारकीर्दीची सुरुवात होती. मग संगीत आणि संगीतरचना तयार करणे आणि त्यानंतर येणारे सर्व काही—मी हे खूप मोठ्या काळासाठी करत आलो आहे. म्हणून जे लोक माझ्या अनुभवासाठी साईन अप करतात त्यांना एखाद्या तज्ञाकडून तीन तासांचे मार्गदर्शन मिळते, परंतु त्यात मजा आहे आणि भीती वाटण्यासारखे काहीच नाही. त्यांना यातून खूप काही मिळू शकते.”
तर, तुम्ही अनुभव होस्ट करण्यास सुरुवात कशी केली?
“Airbnb वर तुमची स्वतःची गोष्ट करणे खरोखर तुमचा स्वतःचा बिझनेस चालविण्यासारखे आहे. परंतु सामान्यतः जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करतो तेव्हा तुम्हाला बिझनेस लायसन्स किंवा कर्ज मिळवावे लागते, तुमच्याकडे थोडे भांडवल असावे लागते आणि बऱ्याच लोकांवर त्यामुळे मर्यादा येऊ शकते. पण Airbnb वर तुम्ही एक कल्पना आणि $10 USD घेऊन सुरू करू शकता.
“मी ऐकले होते की Airbnb अनुभव आयोजित करत आहे आणि ते खूपच छान वाटले. मी Airbnb चा खूप मोठा चाहता आहे म्हणून ते जे काही करतात त्यात मी 1,000% असतोच. मला असे काहीतरी तयार करायचे होते ज्यात माझ्या संगीताची पार्श्वभूमी कामी येईल, कारण ते माझे कौशल्य आहे. मी कल्पना सबमिट केली आणि Airbnb मधील काही लोकांशी भेटायला आणि गप्पा मारायला (मीट-अँड-ग्रीट) आमंत्रित केले गेले आणि त्यांनी मला माझा अनुभव तयार करण्यात मदत करण्यासाठी माझ्याबरोबर काम केले.
“सुरुवातीला आमच्याकडे अनुभवाचे दोन घटक होते. आम्ही स्टुडिओमध्ये मिक्स कसे करावे हे शिकण्यात वेळ घालवत असू आणि मग आम्ही ध्वनी नमुने खरेदी करण्यासाठी जवळच्या रेकॉर्ड स्टोअरमध्ये जात असू. परंतु मी त्यात सुधारणा करून फक्त स्टुडिओच्या भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे लोक ज्यासाठी मुख्यत: येतात, त्या घटकावर अधिक भर दिला आहे आणि त्यामुळे काही व्यवस्थापकीय गोष्टी कमी झाल्या आहेत. लिस्टिंगचे व्यवस्थापन करण्यासारखेच इथेदेखील काय काम करेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करून पहायच्या आहेत.
तुम्ही सुपरहोस्टदेखील आहात. याचा तुमच्या अनुभवाच्या होस्टिंगवर कसा परिणाम झाला आहे?
“आमच्या लिस्टिंगमध्ये गेस्ट्सच्या होस्टिंगमधून मी बरेच काही शिकलो. आम्ही एलएच्या मध्यभागी राहतो, ट्रॅफिक वगळले की सर्व काही 15 मिनिटांच्या अंतरावर आहे, म्हणून आधी मला वाटले की आम्ही फक्त लिस्टिंगची नोंद करून देऊ आणि ती आपोआपच बुक होईल. पण माझी पत्नी नेहमी अधिक परिश्रम करायची, चांगल्या सुविधांसह कॉटेज स्वच्छ आणि सुंदर डिझाइन केलेले असल्याची खात्री करून घ्यायची.
“एकंदरीत, मला वाटते की आम्ही लोकांना फसवून त्यांच्या अपेक्षेच्या प्रमाणात सेवा न देणे टाळण्याचा दृष्टीकोन घेऊन आणि आम्ही त्यांच्याशी चांगले वागलो आहोत याची खात्री करून आम्ही आमची लिस्टिंग यशस्वी केली आहे. आम्हाला सुपरहोस्ट स्तरावर आणण्यात ते कसे चालले हे पाहून, मी अनुभवी होस्ट होण्याकरिता समान गोष्ट लागू केली.”
अनुभव होस्ट होण्याबद्दल सर्वात चांगला भाग काय आहे?
“यामुळे माझ्या संगीत कारकीर्दीत खरोखर नवीन जीवन आणि ऊर्जा निर्माण केली आहे. यामुळे मला माझ्या सर्जनशीलतेला अभिव्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. एक कलाकार म्हणून, तुमच्याकडे कलात्मक विचारांना अभिव्यक्त करायचे मार्ग नसल्यास तुम्ही निराश व्हाल. आणि यामुळे मला थोडे प्रयोग करता येतात आणि माझी कौशल्ये लोकांसह शेअर करता येतात. परंतु यामुळे माझ्या कामासाठी बरेच मार्ग देखील उघडले आहेत आणि मला बरेच नवीन प्रोजेक्ट्स मिळाले आहेत. मी डीजेइंगचा समावेश करून कॉर्पोरेट इव्हेंट्स करण्यास सुरुवात करत आहे.”
अनुभव तयार करण्याबद्दल विचार करणार्या इतर होस्ट्सना काही सल्ला द्यायचा आहे का?
“सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या क्षेत्रातील माहितगार असले पाहिजे. जर तुम्ही आईसक्रीम बनवणारे असाल तर तुम्हाला आईसक्रीम बनवण्याबाबत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता येणे गरजेचे आहे. आणि लिस्टिंगप्रमाणेच, इथेही तुम्हाला वेगवेगळ्या घटकांबाबत प्रयोग करून, नक्की काय कामी येते ते जाणून घ्यायची तयारी ठेवावी लागते. पण तुम्ही लिस्टिंगच्या बाबतीत ज्याप्रकारे भाडे आणि संबंधित गोष्टी बदलत असता, तसे अनुभवात करता येत नाही आणि भाडी ठाम ठेवावी लागतात. लोकांना अनुभवाचे मोल जाणवेल इतके त्याचे भाडे जास्त असले पाहिजे पण तरी ते लोकांना अॅक्सेसिबल वाटेल इतके असले पाहिजे. आपल्याला काहीतरी विशेष मिळते आहे असे त्यांना वाटले पाहिजे. आणि ते जाताना त्यांच्यासोबत काहीतरी घेऊन जातील याची खात्री करा. माझ्या गेस्ट्सना माझ्या कलेक्शनमधील काही रेकॉर्ड्स निवडायची संधी मिळते जेणेकरून ते त्या अनुभवातून सोबत काहीतरी घेऊन जातात.”
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.