किमतीच्या बदल्यात सर्वोत्तम मूल्य कसे द्यावे
किमतीच्या मोबदल्यात अप्रतिम गुणवत्ता मिळेल असे अनुभव गेस्ट्स शोधत असतात. तुमचा अनुभव अधिक खास आणि गेस्ट्सनी दिलेल्या किमतीसाठी योग्य कसा बनवायचा यावर विचार करा.
अनुभवाचा दर्जा वाढवणे
अनोखेपणा, कौशल्य, कनेक्शन, लोकेशन आणि विश्वासार्हता या सर्वांचा तुम्ही देत असलेल्या एकंदरीत मूल्यावर परिणाम होतो. टॉप-रेटेड होस्ट्स म्हणतात की ते किमतीच्या मानाने चांगले मूल्य देण्याकरता या सल्ल्यांना प्राधान्य देतात.
- तुमच्या ॲक्टिव्हिटीज पर्सनलाईज करा. 'आज' टॅबमध्ये आणि ग्रुप मेसेज थ्रेडमध्ये प्रत्येक ग्रुपचे छंद, भाषा आणि इतर अनेक गोष्टी जाणून घ्या. त्यांच्या आवडीनिवडींनुसार ॲक्टिव्हिटीज डिझाईन करण्याचा विचार करा.
- शक्य असेल ते सर्व अपग्रेड करा. उच्च दर्जाचे साहित्य आणि चांगले संशोधन करून सांगितलेले किस्से यांच्यामुळे खूप चांगला प्रभाव पडतो. छोट्या छोट्या सुधारणांना देखील हे लागू होते, जसे की ऑरगॅनिक घटक वापरणे.
- गेस्ट्सचा पाठपुरावा करा. गेस्ट्सना धन्यवाद देण्यासाठी आणि फोटोज आणि शिफारसी शेअर करण्यासाठी मेसेज पाठवा. विशेष लक्ष देऊन केलेल्या या अतिरिक्त गोष्टींमुळे गेस्ट्सना आपली काळजी घेतली आहे असे वाटते आणि आपलेपणा वाटतो.
सिडनी आणि ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलियामध्ये पायी चालण्याच्या सैर होस्ट करणारे जस्टिन म्हणतात, “मी अनुभवानंतर शिफारशींचा पर्सनलाईज्ड मॅप पाठवतो.” “पारंपरिक टूर गाईड्स असे करताना मला दिसत नाहीत. याच गोष्टी गेस्ट्सना खूप मौल्यवान वाटतात.”
स्पर्धात्मक भाडे सेट करणे
गेस्ट्सना त्यांचा अनुभव दिलेल्या किमतीच्या तुलनेत योग्य न वाटल्यास अगदी सर्वोत्तम अनुभवांनासुद्धा कमी रेटिंग्ज मिळू शकतात. तुम्ही तुमच्या भाड्याचा आढावा घेता तेव्हा या काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.
- मिळत्या-जुळत्या अनुभवांशी तुलना करा. स्थानिक किमतींची तुलना करण्यासाठी आणि कोणती किंमत स्पर्धात्मक ठरेल हे समजून घेण्यासाठी Airbnb आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर तुमच्यासारख्या ॲक्टिव्हिटीज शोधा.
- मागणीतील बदलांनुसार बदल करा. वेगवेगळ्या वेळा, दिवस, सीझन्स किंवा विशेष इव्हेंट्सनुसार तुमच्या किमती बदलून पहा. उदाहरणार्थ, वीकेंड्स हे वीकडेजपेक्षा जास्त लोकप्रिय असू शकतात.
- सवलती ऑफर करा. मर्यादित वेळेसाठी, अर्ली बर्ड आणि मोठ्या ग्रुपसाठी या सवलतींमुळे गेस्ट्स आकर्षित होण्यात आणि तुमच्या अनुभवातील जागा भरण्यात मदत होते. जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त सवलती जोडता तेव्हा गेस्टना सर्वात जास्त बचत करून देणारी सवलत मिळते.
लंडनच्या सोहोमध्ये सांगीतिक पायी सैर होस्ट करणारे एव्हरेन म्हणतात, “तुम्हाला नेहमी लोकांना किमतीच्या बदल्यात जे अपेक्षित असते त्यापेक्षा जास्त द्यावे लागते.” “माझ्यासाठी याचा अर्थ असा नाही की भेट देण्याच्या जागांमध्ये आणखी जोडायला पाहिजे. मी किमतीच्या बदल्यात सर्वोत्तम मूल्य देण्यासाठी तथ्ये आणि मनोरंजक किस्से यांचा उत्कृष्ट मेळ साधण्यावर लक्ष केंद्रित करतो.”
होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.