Airbnb अनुभव होस्ट करण्यासाठी काय आवश्यक आहे
ज्यांना शहराची सर्वोत्तम माहिती आहे अशा स्थानिकांनी होस्ट केलेले Airbnb अनुभव पूर्णपणे नव्याने तयार केलेले अनुभव असतात. ॲक्टिव्हिटीजमध्ये युनिक ट्रिप्स, टेस्टिंग्ज, आऊटडोअर ॲक्टिव्हिटीज, वर्कशॉप्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.
अनुभवांची गुणवत्तेसाठी तपासणी केली जाते आणि होस्ट्स, को-होस्ट्स आणि लिस्टिंग्जनी आमच्या स्टँडर्ड्सची आणि आवश्यकतांची पूर्तता करणे अपेक्षित आहे. जाणून घेण्यासाठी येथे काही गोष्टी आहेत:
मूलभूत स्टँडर्ड्स
- ओळख व्हेरिफिकेशन: तुमची ओळख व्हेरिफाय करा आणि लागू असेल तेथे, बॅकग्राऊंड चेक्स आणि इतर तपासण्या पूर्ण करा.
- लायसन्स आणि सर्टिफिकेशन: ॲक्टिव्हिटीशी संबंधित वैध लायसन्सेस, विमा आणि सर्टिफिकेशन्स कायम ठेवा. आवश्यक असेल तेव्हा पुरावा द्या.
- ज्ञान: औपचारिक ट्रेनिंग किंवा इतर संबंधित पार्श्वभूमी असणे. उदा. शिक्षण, अप्रेंटिसशिप किंवा कौटुंबिक वारसा. आम्ही तुमच्या लिस्टिंगमध्ये तुम्ही समाविष्ट केलेले शिक्षण, रोजगाराचा इतिहास किंवा ॲवॉर्ड्स आणि सन्मान यांची पडताळणी करू शकतो.
- ॲक्टिव्हिटी: ॲक्टिव्हिटी स्थानिक संस्कृतीशी, खाण्यापिण्याशी किंवा लोकांशी कनेक्ट करा. अनुभवाने गेस्ट्सना सहभागी होण्यासाठी आणि तुम्हाला आणि एकमेकांना जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
- जागा: अनुभवासाठी सुरक्षित, स्वच्छ, आरामदायक आणि सुसज्ज असलेले लोकेशन निवडा.
लिस्टिंग स्टँडर्ड्स
- फोटो: कमीतकमी 5 उच्च गुणवत्तेचे, रंगीत फोटो सबमिट करा. तुम्हाला स्पष्ट अपेक्षा सेट करण्यासाठी आवश्यक असतील तेवढे फोटो शेअर करा.
- शीर्षक: मुख्य ॲक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करा. अनुभवादरम्यान गेस्ट्स काय करतील हे सांगणारे एखादे क्रियापद तुमच्या शीर्षकात समाविष्ट करा, उदा. “एक्सप्लोर करा”, “शोधा” किंवा “टेस्टिंग करा”.
- वर्णन: गेस्ट हा अनुभव का बुक करू शकतो, तुम्ही कोण आहात आणि लोकेशन कशामुळे खास बनते यावर भर देणाऱ्या तपशिलांसह तुमचे शीर्षक पूर्ण करा.
- प्रवासाचा कार्यक्रम: सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनुभवाच्या विशिष्ट ॲक्टिव्हिटीजची रूपरेषा लिहा, जेणेकरून गेस्ट्स हा अनुभव त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवू शकतील. किमान एक ॲक्टिव्हिटी समाविष्ट करा.
अनुभवांच्या सबमिशन्सचा आणि मंजूर केलेल्या लिस्टिंग्जमध्ये केलेल्या बदलांचा आढावा घेतला जाईल.
होस्टिंगसाठी आवश्यकता
- बुकिंग्ज: गेस्ट्सच्या रिझर्व्हेशन्सचा सन्मान करा आणि टाळता येण्याजोग्या कारणांमुळे कॅन्सल करणे टाळा.
- मेसेजिंग: गेस्ट्सचे रिझर्व्हेशन सुरू होण्यापूर्वी त्यांच्याशी तत्परतेने संवाद साधा.
- सुरक्षितता: सुरक्षित ठिकाण निवडा आणि दुखापत टाळण्यासाठी गेस्ट्सना योग्य प्रशिक्षण आणि उपकरणे द्या. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एक योजना तयार करा.
- रेटिंग्ज: गेस्ट्सकडून उच्च स्टार रेटिंग्ज कायम ठेवा.
- लिस्टिंग: तुमच्या लिस्टिंगचे तपशील अचूक ठेवा, ज्यात लोकेशन, सुरू होण्याची आणि संपण्याची वेळ आणि को-होस्ट्सच्या आणि बुकिंगच्या कोणत्याही अटी, जसे की ॲक्टिव्हिटीजसाठी योग्य वय आणि कौशल्य पातळी यांचा समावेश आहे.
तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. Airbnb गेस्ट फीडबॅक, होस्ट कॅन्सलेशन्स आणि अनुभवांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबद्दल ग्राहक सेवेला आलेल्या रिपोर्ट्सचा आढावा घेते.
वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त, तुम्हाला Airbnb च्या सेवेच्या अटी आणि होस्टचे मुख्य नियम आणि होस्टिंगची सुरक्षितता धोरणे यांचे पालन करणेदेखील आवश्यक आहे.
जे होस्ट्स आमच्या स्टँडर्ड्सची आणि आवश्यकतांची पूर्तता करत नाहीत त्यांची लिस्टिंग किंवा अकाऊंट सस्पेंड केले किंवा काढून टाकले जाऊ शकते. Airbnb अनुभव स्टँडर्ड्स आणि आवश्यकता पूर्ण वाचा.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.