सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

एक सुरळीत अनुभव कसा होस्ट करावा

विश्वासार्ह आणि उत्तम प्रतिसाद देणारे होण्यासाठी टॉप-रेटेड होस्ट्सचे सल्ले.
Airbnb यांच्याद्वारे 13 मे, 2025 रोजी
13 मे, 2025 रोजी अपडेट केले

गेस्ट्सना सुरळीत अनुभव देण्यासाठी समर्पित असलेले होस्ट खूप आवडतात. याचा अर्थ असा की तुम्ही वेळेवर प्रतिसाद देणे, आगमनाच्या स्पष्ट सूचना देणे, तुमच्या अनुभवाचे अचूक वर्णन करणे आणि सर्वकाही वेळेवर आणि सुनियोजित असणे.

त्वरित प्रतिसाद देणारे असणे

अनुभवाच्या आधी आणि नंतर गेस्ट्सच्या मेसेजेसना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी Airbnb ची मेसेजिंग टूल्स वापरा.

  • झटपट उत्तरे वापरा. तुम्हाला पटकन प्रतिसाद देण्यात मदत व्हावी यासाठी हे मेसेज टेम्प्लेट्स तुमच्या लिस्टिंग आणि गेस्ट रिझर्व्हेशन्समधील तपशील मिळवतात. तुम्ही त्यात बदल करू शकता आणि त्यांना विशिष्ट वेळी पाठवण्यासाठी शेड्युलदेखील करू शकता, जसे की गेस्टने बुक केल्यानंतर लगेचच.
  • नोटिफिकेशन्स सेट करा. गेस्ट्सचे मेसेजेस त्वरित पाहिल्यास तुमच्या प्रतिसाद देण्याच्या वेळेत सुधारणा होऊ शकते. तुमच्या भेटीची वेळ जवळ येईल तेव्हा विशेष लक्ष द्या.

बँकॉकमध्ये कुकिंग क्लास होस्ट करणाऱ्या जिब म्हणतात, “त्वरित प्रतिसाद देणे खूप महत्वाचे आहे.” “तुम्ही गेस्ट्सच्या समस्या जितक्या लवकर सोडवाल किंवा त्यांच्या प्रश्नांना जितक्या लवकर उत्तरे द्याल, तितके तुम्ही त्यांना जास्त विश्वासार्ह वाटाल.”

आगमनाच्या स्पष्ट सूचना देणे

तुम्ही विश्वासार्ह आहात हे दाखवण्यात मदत व्हावी यासाठी कुठे भेटायचे ते गेस्ट्सना माहीत आहे याची खात्री करा.

  • तपशीलवार सूचना लिहा. गेस्ट्सना तुमच्या भेटीचे लोकेशन शोधण्यात आणि तुम्हाला कसे ओळखायचे हे जाणून घेण्यात मदत व्हावी यासाठी संबंधित तपशील द्या.
  • दिशानिर्देश वेळेच्या आधी शेअर करा. तुमच्या अनुभवाच्या एक किंवा दोन दिवस आधी आगमन सूचना असलेले झटपट उत्तर शेड्युल करा जेणेकरून तुमच्या गेस्ट्सकडे प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा वेळ असेल.

ब्रुकलिनची पायी सैर होस्ट करणारे डॅनी गेस्ट्सनी बुक केल्यावर त्यांना एक वेलकम मेसेज पाठवून त्यात सबवेची माहिती देतात आणि ते कुठे भेटतील आणि कुठे निरोप देतील हे स्पष्ट करतात. “यामुळे गेस्ट्सना त्यांच्या दिवसातील बाकी वेळेचे नियोजन करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो,” ते सांगतात.

तुमच्या अनुभवाचे अचूक वर्णन करणे

अनुभवादरम्यान गेस्ट्सनी काय अपेक्षा ठेवावी याबद्दल तुमच्या लिस्टिंगमध्ये तपशीलवार माहिती असली पाहिजे.

  • को-होस्ट्स असल्यास त्यांना जोडा. तुमच्या कॅलेंडरवर जा आणि तुम्ही ज्या को-होस्ट्ससोबत काम करता त्यांना ते जे इन्स्टंस होस्ट करणार आहेत त्यांच्यामध्ये जोडा. यामुळे गेस्ट्सना कोणाला शोधायचे हे जाणून घेण्यात मदत होते.
  • सखोल माहिती समाविष्ट करा. तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनात आणि फोटोजमध्ये गेस्ट्सना आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट शेअर करा जेणेकरून त्यांना तुमच्या अनुभवासाठी तयारी करण्यात मदत होईल. उदाहरणार्थ, त्यांनी कोणत्या गोष्टी पॅक केल्या पाहिजेत ते सांगू शकता, जसे की हायकिंग शूज आणि पाणी, किंवा उंच पायऱ्यांचे फोटो दाखवू शकता.

“आपण बाजारात पायी फिरणार आहोत आणि तिथे गेस्ट्सना भरपूर उत्साही आवाज आणि सुखद, संमिश्र गंध अनुभवायला मिळणार आहेत हे मी त्यांना आधीच सांगून ठेवते,” मेक्सिको सिटीमध्ये कुकिंग क्लास होस्ट करणाऱ्या ग्रेसिएला म्हणतात. “अशा प्रकारे, ते अनुभवासाठी पूर्ण तयारीने आणि उत्साहात पोहोचतात.”

सुव्यवस्थित आणि वक्तशीर असणे

तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार गोष्टी केल्यास तुमचा अनुभव सुरळीतपणे पार पडण्यात मदत होते.

  • आगाऊ नियोजन करण्यासाठी वेळ काढा. तुमचा अनुभव शेड्युलनुसार ठेवण्यासाठी तुमचे लोकेशन आणि कोणतीही आवश्यक सामग्री तयार ठेवा. उदाहरणार्थ, जागा स्वच्छ आहे आणि पुरेशा खुर्च्या आणि वर्कस्पेसेज आहेत याची खात्री करा.
  • गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज करता येतील असा वेग ठेवा. वेळेवर सुरू करा आणि वेळेत संपवा, तसेच अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी घाईगडबड करावी लागू नये म्हणून मध्ये योग्य ब्रेक्स ठेवा.

लंडनच्या सोहोमध्ये सांगीतिक पायी सैर होस्ट करणारे एव्हरेन म्हणतात, “मी माझ्या मार्गाचे नियोजन करण्यासाठी बराच वेळ घेतला.” “मग तो मार्ग योग्य आहे याची खात्री करण्यासाठी पुन्हा-पुन्हा रिहर्सल केली.”

होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
13 मे, 2025
हे उपयुक्त ठरले का?