तुमचा पहिला 5-स्टार रिव्ह्यू मिळवा
रेटिंग्ज आणि रिव्ह्यूजमुळे गेस्ट्सना तुमचा अनुभव त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यात मदत होते. सकारात्मक रिव्ह्यूजमुळे अधिक बुकिंग्ज मिळू शकतात आणि जास्त कमाई होऊ शकते.
तुमची पहिली बुकिंग्ज मिळवणे
सुरुवात करण्यासाठी तुमच्या लिस्टिंग्ज टॅबमधील प्राईसिंग टूल्स आणि तुमच्या कॅलेंडरमधील उपलब्धता सेटिंग्ज वापरा.
- सवलती जोडा. मर्यादित वेळेसाठी, अर्ली बर्ड आणि मोठ्या ग्रुपसाठी या सवलतींमुळे तुमच्या बुकिंग्जची सुरुवात होण्यात आणि तुमची किंमत स्पर्धात्मक राहण्यात मदत होऊ शकते.
- तुमची उपलब्धता खुली करा. गेस्ट्स तुमचा अनुभव किती आधीपासून बुक करू शकतात ते निवडा. तुमचे कॅलेंडर डिफॉल्टनुसार 'उपलब्ध नाही' वर सेट केले गेले आहे.
- कटऑफची वेळ कमी करा. गेस्ट्सना तुमच्या अनुभवाच्या सुरुवातीच्या थोडे आधी बुक करण्याची परवानगी दिल्यास जास्त बुकिंग्ज आकर्षित करण्यात मदत होऊ शकते.
- जास्त मागणीच्या वेळांना प्राधान्य द्या. तुमच्या भागातील अनुभवांसाठी लोकप्रिय असलेल्या दिवस आणि वेळांचे संशोधन करा, जसे की वीकेंड्स किंवा सुटीचे दिवस. तुम्ही एकदा, दररोज किंवा साप्ताहिक आधारावर इव्हेंट्स शेड्युल करू शकता.
रिव्ह्यूज कसे काम करतात ते समजून घेणे
गेस्ट्सच्या फीडबॅकमुळे तुम्हाला सर्वोच्च गुणवत्तेचा अनुभव देण्यात आणि होस्ट म्हणून तुमची प्रतिष्ठा वाढण्यात मदत होते. गेस्ट्सना हे देण्यास सांगितले जाते:
- एकूण रेटिंग. गेस्ट्स प्रत्येक अनुभवाला 1 ते 5 स्टार्स या श्रेणीत रेटिंग देतात. तुमचे सरासरी एकूण रेटिंग तुमच्या लिस्टिंगवर, सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या प्रोफाईलवर दिसून येते.
- तपशीलवार रेटिंग्ज. गेस्ट्स अनोखेपणा, कौशल्य, कनेक्शन, लोकेशन, विश्वासार्हता आणि किमतीसाठी योग्य या निकषांवर रेटिंग देऊन अधिक विशिष्ट फीडबॅक देतात.
- सार्वजनिक रिव्ह्यू. हा तुमच्या प्रोफाईलवर आणि तुमच्या लिस्टिंगच्या रिव्ह्यूज विभागामध्ये दिसतो. तुम्ही सार्वजनिक रिव्ह्यूला उत्तर दिल्यास, तुमचा प्रतिसाद त्याच्या खाली दिसेल.
- खाजगी टीप. हा फीडबॅक तुमच्या लिस्टिंगवर दिसत नाही—तो फक्त तुमच्यासाठी असतो.
एकदा का तुम्हाला तुमचे पहिले 3 रिव्ह्यूज मिळाले की तुम्ही गेस्ट फीडबॅकवरील इन्साईट्स अनलॉक कराल. Airbnb ॲपचा इन्साईट्स विभाग ॲक्सेस करण्यासाठी मेनू वापरा.
गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे
टॉप-रेटेड होस्ट्स गेस्ट्सच्या अपेक्षांपेक्षा जास्त देऊन सर्व तपशीलवार रेटिंग्जमध्ये उत्तम कामगिरी कशी करतात हे सांगत आहेत.
आदरातिथ्याच्या या सल्ल्यांव्यतिरिक्त, Airbnb चे होस्टचे मुख्य नियम आणि होस्टिंगची सुरक्षितता धोरणे लक्षात ठेवा. त्यात सुरक्षित आणि उच्च-गुणवत्तेचे अनुभव देण्याशी संबंधित मूलभूत अपेक्षा दिलेल्या आहेत.
होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.