तुमचे कौशल्य कसे हायलाईट करायचे
जेव्हा होस्ट्स नवीन दृष्टिकोन देतात आणि नवीन काहीतरी शिकण्यात मदत करतात तेव्हा गेस्ट्सना ते खूप आवडते. त्यांचा अनुभव विशेष करण्यासाठी तुमची पार्श्वभूमी आणि ज्ञान शेअर करा.
वैयक्तिकरीत्या शेअर करणे
तुमच्या गेस्ट्सशी कनेक्ट केल्याने त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होतो आणि तुम्ही अनुभवात काय खास देत आहात हे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यात त्यांना मदत होते.
- तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहात ते दाखवा. तुम्ही पाहुण्यांशी संवाद साधता तेव्हा तुमचे कौशल्य दाखवणारे तपशील समाविष्ट करा.
- कथाकथनाचा वापर करा. अशा अॅक्टिव्हिटीज प्लॅन करा ज्यात तुमची पार्श्वभूमी हायलाईट होईल आणि तुमच्या गेस्ट्सना तुमच्यासोबत निखळ आनंदाचे काही क्षण मिळतील.
रोममधील डेबोरा तिच्या घरी कुकिंग क्लासेस होस्ट करते आणि सोमेलियर आणि शेफ म्हणून तिचे सर्टिफिकेट्स दाखवून गेस्ट्सना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करते. तिच्या भिंतीवर तिच्या आजीचा एक फ्रेम केलेला फोटोसुद्धा आहे. याच आजीकडून तिला हा कौटुंबिक वारसा मिळाला आहे. “आम्ही तिच्या गोष्टी आणि पाककृती शेअर करतो,” ती सांगते. “रिव्ह्यूज फक्त खाद्यपदार्थांबद्दल नसतात, तर आमचा ग्रुपसोबतचा संवाद किती आणि कसा उत्तम होता याबद्दल असतात.”
ॲपमध्ये शेअर करणे
तुमच्या लिस्टिंगचा होस्ट हायलाईट्स विभाग तुमची विश्वासार्हता निर्माण करण्यात मदत करतो आणि त्यामुळे तुम्ही देत असलेल्या अनुभवाच्या गुणवत्तेची खात्री पटते. तुमचे वेगळेपण आणखी उठून दिसावे यासाठी अधिक तपशील जोडा आणि तुम्हाला नवीन सन्मान मिळतील तेव्हा ते अपडेट करा.
- तुमचा परिचय लिहा. हे तुमचे शीर्षक म्हणून दिसते आणि तुम्ही एक नवीन दृष्टीकोन ऑफर करत आहात हे सूचित करते.
- तुमची कौशल्ये थोडक्यात सांगा. पदवी आणि प्रमाणपत्रे यासारखी तुमची क्रेडेन्शियल्स तुमच्या कौशल्याची कल्पना देतात.
- तुम्हाला मिळालेल्या मान्यता शेअर करा. सन्मान, पुरस्कार आणि उल्लेखनीय प्रेस कव्हरेज यांच्यामुळे तुमच्या कौशल्याची आणखी खात्री पटते.
उदाहरणार्थ, बँकॉकमध्ये कुकिंग क्लास होस्ट करणाऱ्या जिब लिहितात की त्या माजी फूड कॉलमिस्ट आहेत. लिस्बनमध्ये वाईन टेस्टिंग क्लास होस्ट करणाऱ्या तेरेसा लिहितात की, त्या सोमेलियर आणि सर्टिफाइड पोर्ट एज्युकेटर आहेत. आणि रोममध्ये कलेशी संबंधित पायी सैर होस्ट करणारे टोमासो लिहितात की ते अनेक कलाशाखांमधील कलाकार असून त्यांची कला फोंडाझियोन पास्टिफिसियो सेरेरे सारख्या प्रतिष्ठित जागांमध्ये प्रदर्शित केली गेली आहे.
होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.