उच्च-गुणवत्तेचे फोटो कसे निवडायचे आणि जोडायचे
Airbnb वर काय बुक करायचे हे ठरवण्यासाठी गेस्ट्स अनेकदा फोटोंवर अवलंबून असतात. तुमच्या अनुभवाच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले पाहिजे, अपेक्षा स्पष्ट केल्या पाहिजेत आणि उत्सुकता निर्माण केली पाहिजे.
गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे
तुम्ही शेअर केलेला प्रत्येक फोटो उच्च गुणवत्तेचा असणे आवश्यक आहे. प्रत्येक इमेजचे रिझोल्युशन 800 x 1,200 पिक्सेल्स आणि फाईल साईज 10 मेगाबाईटपर्यंत असणे आवश्यक आहे. बहुतेक स्मार्टफोन कॅमेऱ्यांच्या मदतीने तुम्ही हे परिणाम मिळवू शकता.
असे फोटोज सबमिट करा:
- तुम्ही काढलेले किंवा परवानगी घेऊन वापरलेले
- रंगीत असलेले, ब्लॅक अँड व्हाईट नसलेले
- चांगल्या प्रकाशातले, शक्यतो नैसर्गिक प्रकाशातले
- कम्पोझिशन आणि बॅकग्राऊंड साधे असलेले
- मुख्य विषयाला केंद्रस्थानी ठेवून फोकस केलेले
- तपशिलांचा क्लोज-अप आणि विस्तृत कम्पोझिशन्सचे मिश्रण
असे फोटो सबमिट करू नका:
- अंधारात काढलेले किंवा प्रखर फ्लॅश वापरलेले
- अस्पष्ट, ग्रेनी किंवा कमी रिझोल्युशन असलेले
- जास्त एडीट केलेले, फिल्टर केलेले किंवा बदल केलेले
- सेल्फीज किंवा पोज देऊन काढलेले फोटो
- कोलाजेस
- एकाच फोटोची अनेक व्हर्जन्स
- लोगोजचे किंवा ब्रँड्सचे फोटो
तुम्हाला आणखी फोटो हवे असल्यास, हे सल्ले लक्षात घेऊन तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबाला फोटो काढायला सांगण्याचा विचार करा. किंवा गेस्ट्सना त्यांचे सर्वोत्तम फोटो शेअर करण्यास आणि तुम्हाला ते तुमच्या लिस्टिंगवर वापरण्याची परवानगी देण्यास सांगा.
उत्कृष्ट इमेजेस जोडणे
5 किंवा अधिक फोटो सबमिट करा—तुम्हाला स्वारस्य निर्माण करण्यासाठी आणि स्पष्ट अपेक्षा सेट करण्यासाठी आवश्यक असतील तेवढे फोटो सबमिट करा.
अनुभवाच्या लिस्टिंग्जमध्ये फोटो या 3 ठिकाणी प्रदर्शित केले जातात: ग्रीड, तुमच्या प्रवासाचा कार्यक्रम आणि फोटो गॅलरी. तुम्ही एक आकर्षक कव्हर फोटोदेखील निवडाल, जो गेस्ट्सना Airbnb वर सर्च रिझल्ट्समध्ये दिसेल.
तुम्ही सबमिट केलेल्या फोटोंचा आम्ही आढावा घेऊ आणि आमच्या स्टँडर्ड्सची पूर्तता करणाऱ्या इमेजेस मंजूर करू. प्रत्येक विभागासाठी तुम्ही काय सबमिट केले पाहिजे, ते येथे आहे.
ग्रीड. तुमच्या लिस्टिंगमधील वरच्या चार फोटोंना ग्रीड म्हणतात. यांचे फोटोज समाविष्ट करा:
- मुख्य उपक्रमात सहभागी झालेले गेस्ट्स
- तुम्ही अनुभवाचे नेतृत्व करतानाचे दृश्य
- एखादा महत्त्वाचा तपशील, उदा. गिअरचा किंवा एखाद्या घटकाचा क्लोज-अप
- लोकेशन, उदा. सेटिंग दाखवणारा वाईड-ंअँगल शॉट
तुमच्या प्रवासाचा कार्यक्रम. तुमच्या प्रवासाचा कार्यक्रम हा एक छोटासा अजेंडा असतो, जो गेस्ट्सना तुमचा अनुभव त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यात मदत करतो. प्रवासाच्या कार्यक्रमाचे फोटो छोटे असतात, त्यामुळे प्लेन बॅकग्राउंड असलेली साधी दृश्ये निवडा. यांचे फोटोज समाविष्ट करा:
- तुम्ही लिहिलेल्या वर्णनाशी जुळणारे क्षण
- व्यक्ती, वस्तू आणि समजण्यास सोपे असलेले इतर तपशील
फोटो गॅलरी. तुम्ही शेअर केलेल्या सर्व इमेजेस गेस्ट्स फोटो गॅलरीमध्ये पाहू शकतात. तुमच्या गॅलरीने हा अनुभव कशामुळे आकर्षक आणि संस्मरणीय बनतो, ते दाखवून दिले पाहिजे. यांचे फोटोज समाविष्ट करा:
- तुमच्याशी, कोणत्याही को-होस्ट्सशी आणि इतर गेस्ट्सशी संवाद साधणारे गेस्ट्स
- गेस्ट्सच्या दृष्टिकोनासह वेगवेगळ्या कोनातून काढलेले ॲक्टिव्हिटीजचे फोटो
- गेस्ट्स आठवण म्हणून घरी नेऊ शकतील असे कोणतेही आयटम्स
तुम्ही सबमिट केलेले सर्व वापरण्याची तुमच्याकडे परवानगी असल्याची आणि इमेजेसमध्ये अनुभव अचूकपणे प्रतिबिंबित होत असल्याची खात्री करा.
सर्व होस्ट्स, फोटो आणि लिस्टिंग तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.