सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

योग्य लोकेशन कसे निवडावे

टॉप-रेटेड होस्ट्स सांगत आहेत की एखादी जागा कशामुळे अस्सल आणि खास बनते.
Airbnb यांच्याद्वारे 13 मे, 2025 रोजी
13 मे, 2025 रोजी अपडेट केले

गेस्ट्सना स्थानिक संस्कृतीशी कनेक्ट होण्यात मदत होईल अशा खास जागांवर वेळ घालवायला आवडते. तुमचे लोकेशन कसे विशेष महत्त्वाचे आहे आणि तुम्ही ते का निवडले ते दाखवा.

योग्य जागा शोधणे

कमीतकमी, तुमचे लोकेशन आरामदायक, स्वच्छ आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. ते ॲक्टिव्हिटीला साजेसेसुद्धा असावे.

  • पूर्वेतिहास सांगा. लोकेशनचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्याचा समृद्ध इतिहास आणि वारसा उलगडून दाखवा. रोममधील डेबोरा तिच्या घरी कुकिंग क्लासेस होस्ट करते आणि त्यात तिच्या आजीने तिला सांगितलेल्या पाककृती, गाणी आणि इतर परंपरा शेअर करते. “आपण जे काही करतो त्याची एक कहाणी असते,” ती सांगते.
  • स्थानिक गोष्टींवर भर द्या. गेस्ट्सना इतर कुठेही सापडणार नाहीत अशा जागा शोधा. लिस्बनमध्ये खाण्यापिण्याशी संबंधित सैर होस्ट करणारी रूबी सांगते की ती गेस्ट्सना फक्त स्थानिक कौटुंबिक व्यवसायांना भेट देण्यासाठी घेऊन जाते, जसे की एखादे छोटेसे पेस्ट्री शॉप. “त्यामुळे गेस्ट्स खूप खुश होऊन जातात,” ती सांगते.

अस्सलपणाचे उद्दिष्ट ठेवणे

स्थानिक संस्कृतीची झलक देणारे एखादे संस्मरणीय ठिकाण निवडा.

  • फक्त आतल्या लोकांना असलेला ॲक्सेस द्या गेस्ट्सना स्वतःहून जिथे जाता येणार नाही अशा जागांना भेट द्या. लिस्बनमध्ये वाईन टेस्टिंग क्लास होस्ट करणाऱ्या तेरेसा “अनपेक्षित धक्का” देण्याचा प्रयत्न करतात, जसे की लोकांसाठी बंद असलेली जागा शोधणे किंवा सर्वांना उपलब्ध असलेल्या तासांव्यतिरिक्तच्या वेळेत जाणे. “यामुळे काहीतरी नवीन अनुभवल्याची भावना निर्माण होते,” त्या सांगतात.
  • लोकेशनच्या विशेष पैलूंवर लक्ष केंद्रित करा दृश्ये, ध्वनी आणि चवींमुळे मनावर एखाद्या जागेची गडद छाप पडण्यात मदत होते. “वातावरणाने तुम्हाला ताबडतोब ओढून घेतले पाहिजे,” मेक्सिको सिटीमध्ये कुकिंग क्लास होस्ट करणाऱ्या ग्रेसिएला म्हणतात. “गेस्ट्स एखाद्या लोकेशनला आल्यावर त्यांना चांगला अनुभव मिळणार आहे किंवा नाही हे त्यांना काही मिनिटातच समजून जाते.”

अस्सल आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीशी जुळणाऱ्या लोकेशनवर होस्ट केल्यास चांगली रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज मिळण्यात मदत होऊ शकते.

होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
13 मे, 2025
हे उपयुक्त ठरले का?