सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

एक अनोखा अनुभव कसा द्यावा

टॉप-रेटेड होस्ट्स सांगत आहेत की ते अनोख्या ॲक्टिव्हिटीज कशा देतात.
Airbnb यांच्याद्वारे 13 मे, 2025 रोजी
13 मे, 2025 रोजी अपडेट केले

गेस्ट्स अशा अनुभवांच्या शोधात असतात जे त्यांना वाटते की इतरत्र कुठेही मिळणार नाहीत. तुमचे ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व यांचा योग्य वापर करून तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीज अस्सल आणि अविस्मरणीय बनवा.

एक नवीन दृष्टीकोन ऑफर करणे

अनुभवांमुळे गेस्ट्सना शहराची सर्वोत्तम माहिती असलेल्या स्थानिक होस्ट्सच्या मदतीने एखादी संस्कृती, कौशल्य किंवा ठिकाण ॲक्सेस करण्यात मदत झाली पाहिजे.

  • तुमचे शहर अभिमानाने दाखवा. अशा ॲक्टिव्हिटीजचे आयोजन करा ज्या गेस्ट्स स्वतःच्या बळावर करू शकत नाहीत. सिडनी आणि ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलियामध्ये पायी चालण्याच्या सैर होस्ट करणारे जस्टिन गेस्ट्सना ठराविक आकर्षणांच्या पलीकडचे शहर दाखवतात. “सिडनीबद्दल लोकांच्या मनात एक ठरावीक इमेज आहे—हार्बर बीचेस, ऑपेरा हाऊस आणि सीफूड,” ते म्हणतात. “पण मी गेस्ट्सना लिटल इटली आणि थाई टाऊनसारख्या जागांमध्ये घेऊन जातो. मी अशा बिझनेस मालकांच्या शोधात असतो ज्यांच्या गोष्टी मी सांगू शकेन.”
  • तुमचे व्यक्तिमत्त्व जोडा. तुमच्या ॲक्टिव्हिटीशी असलेले तुमचे अस्सल कनेक्शन दाखवा. लंडनच्या सोहोमध्ये सांगीतिक पायी सैर होस्ट करणारे एव्हरेन यांनी एका बँडमध्ये गिटार वाजवली आहे, रेकॉर्ड लेबल चालवले आहे आणि एक रॉक बँडदेखील मॅनेज केला आहे. “तुम्हाला हे इतरत्र कुठेही मिळणार नाही,” ते म्हणतात.

अनुभव अविस्मरणीय करणे

गेस्ट्स तुमच्यासोबत जो वेळ घालवतील, त्यात त्यांनी तुमच्याकडून काय घेऊन गेलेले तुम्हाला हवे आहे यावर विचार करा.

  • काहीतरी अविस्मरणीय असे करा. ते खूप खर्चिक किंवा महाग असणे गरजेचे नाही. लिस्बनमध्ये खाण्यापिण्याशी संबंधित सैर होस्ट करणाऱ्या रूथी त्यांच्या गेस्ट्सना एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातात जिथे ते त्या कुटुंबाच्या शेतातील ऑलिव्ह ऑईलची चव घेऊन पाहतात. “तुम्ही ते विकत घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये त्याची चव घेणे ही खूप विशेष बाब आहे.”
  • मेमेंटो द्या. हे त्या अनुभवाशी संबंधित असले पाहिजे, जसे की हाताने बनवलेला पास्ता किंवा पॉटरी. बर्लिनमध्ये फोटोग्राफी वर्कशॉप होस्ट करणारे डॅनिलो गेस्ट्सबरोबर घालवलेल्या वेळेतील गेस्ट्सचे आवडते फोटोज एडिट करण्यात त्यांची मदत करतात. “एडिटिंगच्या जादूची थोडीशी झलक दाखवणे हे जणू एक रिवॉर्डच असते,” ते म्हणतात.

तुम्ही तुमचा अनुभव आणखी अनोखा बनवण्यासाठी त्यात काही बदल केल्यास, तुमची लिस्टिंग अपडेट करा जेणेकरून गेस्ट्सना काय अपेक्षा ठेवावी हे कळेल.

होस्ट्स, फोटोज आणि लिस्टिंगचे सर्व तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
13 मे, 2025
हे उपयुक्त ठरले का?