सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

तुमचे भाडे कसे सेट करावे

तुमचे खर्च विचारात घ्या, मिळत्या-जुळत्या अनुभवांची तुलना करा आणि सवलत वापरा.
Airbnb यांच्याद्वारे 13 मे, 2025 रोजी
13 मे, 2025 रोजी अपडेट केले

Airbnb तुम्हाला तुमच्या कमाईच्या उद्दिष्टांना सहाय्य करण्यासाठी होस्टिंग टूल्सचा आणि लाखो गेस्ट्सचा ॲक्सेस देते. स्पर्धात्मक भाडे सेट केल्याने तुमचा अनुभव नजरेत भरण्यात आणि गेस्ट्सना बुक करण्यास प्रोत्साहित करण्यात मदत होऊ शकते.

तुम्ही तुमचे भाडे नेहमी नियंत्रित करू शकता आणि तुम्ही ते कधीही बदलू शकता.

Airbnb वरील भाडे

नवीन अनुभवासाठी कमी भाड्यापासून सुरुवात केल्याने तुम्हाला तुमच्या पहिल्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात तसेच रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज लवकर मिळवण्यात मदत होऊ शकते. तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे भाडे कालांतराने ॲडजस्ट करू शकता.

तुम्ही Airbnb वर तुमचे भाडे सेट करता तेव्हा विचारात घेण्यासाठी येथे काही घटक दिले आहेत.

  • तुमचा खर्च: तुमचा वेळ, वस्तू आणि लायसन्सिंग यांसारखे खर्च कव्हर करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात याचा विचार करा.
  • याच प्रकारचे अनुभव: स्थानिक भाड्याची तुलना करण्यासाठी आणि स्पर्धात्मक काय आहे हे समजून घेण्यासाठी Airbnb आणि इतर प्लॅटफॉर्मवर तुमच्यासारख्या ॲक्टिव्हिटीजचा शोध घ्या.
  • सेवा शुल्क: Airbnb कडून प्रत्येक बुकिंगसाठी होस्ट्सकडून आकारले जाणारे सेवा शुल्क विचारात घ्या. तुम्ही जेव्हा तुमचे भाडे सेट करता तेव्हा ते तुम्हाला दिसेल. शुल्कामुळे आम्हाला होस्टिंग टूल्स प्रदान करण्यात, 24/7 ग्राहक सेवा ऑफर करण्यात आणि Airbnb अनुभव लाखो गेस्ट्सपर्यंत पोचवण्यास मदत होतेे.

तुमचे भाडे सेट करणे

ॲक्टिव्हिटी, लोकेशन आणि कनेक्शन वाढवण्यासाठी आदर्श ग्रुप साईजनुसार तुमच्या गेस्ट्सची कमाल संख्या जोडा. तुम्ही प्रत्येक वेळी अनुभव ऑफर करता तेव्हा ही कमाल संख्या लागू होईल.

प्रति गेस्ट आणि प्रायव्हेट ग्रुपसाठी तुमचे किमान भाडे सेट करा.

  • प्रति गेस्ट भाडे: ही अशी रक्कम आहे जी तुम्ही अनुभवात सामील होण्यासाठी प्रत्येक गेस्टला आकाराल. तुमच्या भाड्यात सर्व शुल्क आणि ग्रॅच्युईटीज समाविष्ट असणे आवश्यक आहे. कमी भाडे ऑफर केल्याने कदाचित अधिक गेस्ट्स आकर्षित होऊ शकतात आणि जास्त कमाई होऊ शकते. उदाहरणार्थ, अमेरिकेत 4 गेस्ट्सनी प्रत्येकी $60 USD प्रमाणे बुकिंग केल्यास एकूण भाडे $240 होते, तर 8 गेस्ट्सनी प्रत्येकी $45 USD प्रमाणे बुकिंग केल्यास एकूण भाडे $360 USD होते.
  • प्रायव्हेट ग्रुपची किमान रक्कम: ही प्रायव्हेट ग्रुपकडून तुम्ही आकारणार असलेली किमान एकूण रक्कम आहे. इतर कोणीही ही विशिष्ट तारीख आणि वेळ बुक करू शकणार नाही.

सेटअप दरम्यान तुम्ही तुमचे भाडे एन्टर केल्यावर तुम्ही किती कमाई कराल ते तुम्हाला दिसेल.

सवलती जोडणे

तुमचे भाडे स्पर्धात्मक ठेवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बुकिंग्जसाठी सवलती ऑफर करणे.

  • मर्यादित-कालावधी: तुमच्या पहिल्या गेस्ट्सना बुकिंग करण्यासाठी आकर्षित करण्याकरता 30 दिवसांसाठी तुमच्या भाड्यावर 5% ते 50% सवलत ऑफर करा.
  • अर्ली बर्ड: 2 आठवड्यांपेक्षा आधी बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सना 20% सवलत द्या.
  • मोठा ग्रुप: तुमच्या कमाल क्षमतेपर्यंत जलद पोचण्यासाठी ग्रुप सवलत जोडा.

गेस्टने अनुभव बुक केल्यावर प्रत्येक वेळी तुमच्या सवलती लागू होतात. तुम्ही एकापेक्षा जास्त सवलती जोडल्यास, गेस्टला सर्वात जास्त बचत करून देणारी सवलत मिळेल. त्यांना एकाच रिझर्व्हेशनवर अनेक सवलती मिळू शकत नाहीत.

सर्व होस्ट्स, फोटो आणि लिस्टिंग तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
13 मे, 2025
हे उपयुक्त ठरले का?