प्रभावी शीर्षक आणि वर्णन कसे लिहावे
अनेकदा गेस्ट्स त्यांना स्थानिक लोकांसारखे शहर एक्सप्लोर करण्याची संधी देणाऱ्या अनुभवांचा शोध घेत असतात. तुमचे शीर्षक आणि वर्णन याद्वारे तुमचे स्थानिक संबंध हायलाईट केले पाहिजेत आणि तुमचा अनुभव शहराची अस्सल बाजू पाहण्याचा एक अनोखा मार्ग कसा ऑफर करतो, हे दर्शवले पाहिजे.
तुमच्या अनुभवाला नाव देणे
अनुभवादरम्यान गेस्ट्स काय करतील हे सांगणाऱ्या कृतीच्या एखाद्या क्रियापदाने तुमचे शीर्षक सुरू करा. कृतीनंतर तुमचे शीर्षक नजरेत भरवणारा तपशील द्या.
विशिष्ट आणि अचूक माहिती द्या. तुमच्या शीर्षकाची लांबी 50 कॅरॅक्टर्स किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
तुमच्या भागातील इतर लिस्टिंग्जमध्ये दिसणारे वाक्यांश पुन्हा वापरणे टाळा. परवानगीशिवाय इतरांची नावे किंवा ट्रेडमार्क्स वापरू नका.
अनुभवाच्या चांगल्या शीर्षकांची उदाहरणे:
- पॅरिसच्या पेस्ट्री शेफसह क्रॉसों बेक करा
- व्यावसायिक सर्फरसह रिओमधील लाटांवर स्वार व्हा
- नॅशनल गॅलरीमध्ये एखाद्या आर्टिस्टप्रमाणे स्केचिंग करा
तुमच्या अनुभवाचे वर्णन करणे
तुमचे वर्णन तुमच्या शीर्षकाला पूरक असावे. गेस्ट हा अनुभव का बुक करेल, याच्या मुख्य कारणापासून सुरुवात करा. तुमची पार्श्वभूमी, लोकेशन कशामुळे खास बनते आणि तुम्ही एकत्र करणार असलेल्या ॲक्टिव्हिटीबद्दल अधिक तपशील जोडा.
अशी भाषा निवडा, ज्यामुळे अनुभव खूप रोमांचक वाटेल आणि चुकवावासा वाटणार नाही. थेट, संक्षिप्त आणि माहिती देणारी भाषा वापरा.
तुमची पार्श्वभूमी, लोकेशन, ॲक्टिव्हिटी किंवा या तिन्ही गोष्टींच्या एकत्रित येण्यामुळे तयार होणाऱ्या तुमच्या स्थानिक कनेक्शनवर भर द्या. तुमच्या वर्णनाची लांबी 90 कॅरॅक्टर्स किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
अनुभवाच्या चांगल्या वर्णनांची उदाहरणे:
- स्थानिक स्तरावरच्या घटकांसह बे एरियाचे प्रसिद्ध सिंगल-ओरिजिन चॉकलेट तयार करा आणि त्याचा आस्वाद घ्या.
- सातव्या पिढीतील रोमन व्यक्तीकडून एरिनातील प्राचीन वास्तूंची माहिती घ्या.
- NYC मधील प्रसिद्ध एलेव्हेटेड वॉकवेच्या संस्थापक संस्थेतील एका गाईडसह हा वॉकवे एक्सप्लोर करा.
सर्व होस्ट्स, फोटो आणि लिस्टिंग तपशील Airbnb अनुभवांच्या स्टँडर्ड्स आणि आवश्यकतांनुसार असणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.