सुपरहोस्ट स्पॉटलाईट: गमावल्यानंतर मी पोकळी कशी भरून काढली
सुपरहोस्ट मेरीआन यांना अचानक त्या आणि त्यांचे दिवंगत पती यांनी एकत्रित नूतनीकरण केलेल्या क्राफ्ट्समन घरमध्ये एकटेपणा जाणवू लागला. स्वतःला सावरण्यासाठी, त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि त्यांचे कॅलिफोर्नियाचे घर जगभरातील गेस्ट्ससाठी उघडले. त्यांच्या स्वतःच्या शब्दांत, होस्टिंगने त्यांच्या आयुष्याला कसा नवीन अर्थ दिला आणि महिला उद्योजक होण्याचा अर्थ काय आहे, त्या शेअर करतात:
आयुष्य असण्यामध्ये, घरी माणसे परत येण्यामध्ये काहीतरी लाभदायक होते.
जेव्हा मी माईक यांना गमावले, तेव्हा काहीतरी हरवल्याची, रिकामेपणाची, पोकळीची भावना होती. मे 2017 मध्ये स्टँडर्ड प्रोसिजर असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, परंतु काही गुंतागुंतींमुळे त्यांना स्वतःचा प्राण गमवावा लागला. त्याच्या चार दिवसांपूर्वी, आम्ही एकत्र 26 वर्षे साजरी केली होती.
माझी मुलगी माझ्याबरोबर वास्तव्य करण्यासाठी घरी आली. जवळजवळ एक वर्षानंतर ती निघून गेली आणि अचानक, मी घरात एकटीच पडले.
मी होस्टिंग का सुरू केले याची विशिष्ट घटना किंवा कारण मला आठवत नाही. फक्त माझ्या विचारात ते सतत येत होते. आणि मग मी सप्टेंबर 2017 मध्ये ओरेगनमधील मित्रांना भेटण्यासाठी ट्रिप केली आणि मी तेथे Airbnb मध्ये राहिले. तिथला होस्ट एक चांगला माणूस होता, आणि मी काय घडले ते सांगितले. होस्ट होणे ही माझ्यासाठी एक संधी असू शकते, हे मला जाणवायला लागले.
माझ्या पतीच्या मृत्यूनंतर, त्यांची पेन्शन संपली आणि त्यामुळे उत्पन्न बऱ्याच प्रमाणात कमी झाले. मी स्वतः शिक्षिका, लेखिका आणि लँडस्केपर म्हणून काम करते. मी अशा स्थितीत नव्हते, की मी फोकस करू शकेन.
माझ्या कल्पनेमध्ये, Airbnb हा एक कमाई करण्याचा सोपा मार्ग होता. पण ते एक काम आहे. एकटी महिला म्हणून मला सुरक्षिततेची चिंता अवश्य होती. मी गेस्ट्सच्या रूम्स आणि माझ्या रूमसाठी कुलूप विकत घेतले, पण मला वाटते की मी फक्त एकदाच माझे दार लॉक केले आहे, जेव्हा एका माणसाने एकदा रात्री खूप उशिरा चेक इन केले. माझा एक मित्र जो होस्टदेखील आहे, त्याने सुचवले की मी येथे मला पाहिजे असलेल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी माझ्या घराचे वर्णन लिहावे आणि आतापर्यंत त्याचा उपयोग झाल्याचे दिसते. कदाचित हा भोळेपणा आहे, पण मला याची खात्री आहे की बहुतेककरून लोक चांगले असतात.
होस्टिंग एकांतवासापासून दूर जाण्याचा एक मार्ग बनला आहे. मला घर स्वच्छ ठेवण्याचे, काहीही न झाल्यासारखे वागण्याचे ते एक कारण बनले. तुम्ही स्वतःला थोडेसे सावरले पाहिजे. त्या सर्व चांगल्या गोष्टी होत्या.
प्रत्येक व्यक्ती आल्यावर मला माईकची आठवण येते. ही एकाच वेळी दुःखद आणि सक्षम करणारी बाब आहे.
त्यांना या घरात काम करायला खूप आवडायचे. ते सुतार होते. जेव्हा आम्ही 1995 मध्ये घर विकत घेतले, तेव्हा त्याची तोडफोड झाली होती, घर दुरवस्थेत होते, आणि त्यांनी ते राहण्यासाठी एक सुंदर ठिकाण बनवले. काही मार्गांनी, मला त्यांचा आत्मा, त्यांची उर्जा अनुभवता येते, जेव्हा लोक घरात येतात, लाकूडकाम लक्षात घेतात आणि म्हणतात, “अरे, व्वा.”
मला खूप अभिमान वाटतो. मला ते आम्हा दोघांसाठीही भावते. मी ते शेअर करू शकते, हे किती छान आहे.
सुरवातीला, मी माझ्या पतींना नुकतेच गमावले आहे असे गेस्ट्सना सांगायची. मग कालांतराने, मी शेअर करणारी ती पहिली गोष्ट राहिली नाही.
माझ्याकडे आलेल्या गेस्ट्सचा मला अविश्वसनीय आशीर्वाद मिळाला आहे. मी सांता मोनिकामध्ये राहत असल्याने, त्यांना बीचवर, पियरवर आणि व्हेनिसला जायचे होते, म्हणून मी त्यांना खरोखरचे पाहिले नाही. मला अजून बरीच जागा आणि बरीच शांतता हवी होती, त्यासाठी ती परिपूर्ण होती.
कधीकधी, आम्ही कॉफी घेताघेता गप्पा मारायचो किंवा समुद्राची हवा खात, वाईनचा ग्लास घेऊन पोर्चमधल्या झोपाळ्यावर बसायचो. काही गेस्ट्स खूपच चांगल्या व्यक्ती होत्या. क्लिशे जरी वाटले तरी, आयुष्य पुढे जात असल्याची जाणीव होत होती.
एक गेस्ट एक तरुण महिला होती. मी माईकचा मृत्यू झाल्याचे सांगितले नव्हते, परंतु कदाचित त्यांना घराच्या आसपासचे फोटो दिसले असावेत. त्यांनी मला सांगितले की, काही महिन्यांपूर्वी एका अपघातात त्यांनी त्यांचा बॉयफ्रेंड गमावला. मी एका अविश्वसनीय गोष्टीचा भाग बनले, जिकडे केवळ घरच नाही तर अशी एक जागा खुली करून, जिथे त्यांना समजू शकेल अशा व्यक्तीबरोबर त्या स्वतःच्या दुःखाविषयी बोलू शकल्या. आणि माझ्यासाठी, त्या एक अशी व्यक्ती होत्या ज्यांच्याशी मी माईकबद्दल बोलू शकेन. आम्हाला जोडणारा एक अविश्वसनीय दुवा होता. आम्ही काही वेळा टेक्स्ट पाठवले आहेत. त्या परत येतील किंवा येणार नाहीत, परंतु थोड्या काळासाठी आम्ही एकमेकांच्या आयुष्याला स्पर्श केला.
होस्टस म्हणून, आम्ही जागा शेअर करतो, परंतु कधीकधी ती अशी जागा ठरते जिथे आम्ही त्याहून अधिक काही शेअर करतो.
माझे घर खुले करताना, मला खूप थकल्यासारखे वाटले तरीही मी काहीतरी देऊ शकले.
आता माझा स्वतःचा बिझनेस आहे. तुमचा स्वतःचा बॉस असण्याबद्दल आणि तुमच्या जीवनाचा विकास कसा होतो यावर ताबा असण्याबद्दल संपूर्णपणे सांगण्यासारखे बरेच काही आहे. एक महिला जेव्हा तिचा स्वतःचा व्यवसाय चालवते, तेव्हा तिच्या शक्तीची खरी जाणीव होते.
लोकांना हे थोडे विचित्र वाटेल, परंतु एखाद्या अनोळखी व्यक्तीचे स्वागत करण्यामध्ये काहीतरी पवित्रता आहे. होस्टस म्हणून, आम्ही थकलेल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतो. आणि जेव्हा आपण यातनांमध्ये असतो, दुखावतो आणि एकाकी होतो, तेव्हा तो संवाद आणि कनेक्शन थोडासा दिलासा देते.
फोटोज मेरीआन यांच्या सौजन्याने