प्रत्येक गेस्टला आपले स्वागत आहे असे वाटावे यासाठी आपलेपणाच्या पद्धती

तुमची लिस्टिंग अपडेट करण्यापासून ते गेस्ट्सना रिव्ह्यू करण्यापर्यंत—अनेक गोष्टींसाठी अनुभवी होस्ट्सकडून मार्गदर्शन मिळवा.
Airbnb यांच्याद्वारे 27 जून, 2022 रोजी
वाचण्यासाठी 6 मिनिटे लागतील
27 जून, 2022 रोजी अपडेट केले

Airbnb वर होस्टिंग म्हणजे जगभरातील लोकांसाठी तुमची जागा खुली करणे आणि सर्वसमावेशकता हा होस्टिंगचा पाया आहे.

यशस्वी होस्ट होण्याची गुरुकिल्ली म्हणजे सर्व पार्श्वभूमींच्या लोकांना आरामदायक आणि घरच्यासारखे कसे वाटेल हे समजून घेणे. एक कम्युनिटी म्हणून, आम्ही कोणत्याही वंश, धर्म, राष्ट्रीय मूळ, वांशिकता, दिव्यांगता, लिंग, लिंग ओळख, लैंगिक अभिमुखता किंवा वयाच्या प्रत्येक गेस्टचे आदराने आणि कोणतेही मत न बनवता किंवा पूर्वग्रह न ठेवता स्वागत करण्यास वचनबद्ध आहोत.

सर्वसमावेशक आदरातिथ्य हा यशस्वी होस्ट होण्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याचा अर्थ असा की: 

  • सर्व पार्श्वभूमींच्या सर्व गेस्ट्सना स्वीकारणे आणि त्यांचे स्वागत करणे

  • सर्वांना समान अनुभव देणे आणि गेस्ट्सच्या गरजांची काळजी घेणे

  • कनेक्शन निर्माण करण्यासाठी भिन्नता आणि समानतांचा उपयोग करून घेणे

  • खुल्या मनाने विचार करायची सवय लावून घेणे आणि गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्यासाठी काय लागू शकते हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारण्याची तयारी ठेवणे

तुम्ही तुमच्या होस्टिंगच्या कामात सर्वसमावेशक पद्धती आणाव्या आणि प्रत्येक गेस्टचे आदरातिथ्य अगत्याने करावे यासाठी Airbnb ने होस्ट्स, गेस्ट्स आणि तज्ञांकडून सखोल माहिती जमा केली आहे. तुमची लिस्टिंग सेट करण्यापासून ते रिव्ह्यूज देण्यापर्यंत, शिफारस केल्या गेलेल्या या कृतींमुळे नकळतपणे होणारा पक्षपात कमी होण्यात आणि कनेक्शन बनवण्यात मदत होऊ शकते.

प्री-बुकिंग: आपलेपणाची भावना जागवणारी लिस्टिंग तयार करणे

तुम्ही सर्व पार्श्वभूमीच्या लोकांचे स्वागत करता हे स्पष्ट करून, तुम्ही ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित कम्युनिटीजमधील गेस्ट्सना आरामदायक वाटण्यात मदत करू शकाल आणि त्यांना तुमची जागा बुक करण्यासाठी प्रोत्साहित करू शकाल. गेस्ट्सशी बोलून आम्हाला समजले आहे की विशेषत: या समुदायातील लोक बुकिंग करण्यापूर्वी लिस्टिंग्जमध्ये सर्वसमावेशकतेच्या खुणा शोधतात.

तुम्ही एक सर्वसमावेशक होस्ट आहात याचा संकेत देण्यासाठी तुम्ही करू शकाल अशा काही गोष्टी येथे दिल्या आहेत:

  • तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनाच्या पहिल्या काही वाक्यात हे स्पष्ट करा की तुम्ही सर्व पार्श्वभूमींच्या (खाली उदाहरणे दिली आहेत) लोकांचे स्वागत करता.

  • अचूक वर्णन करून तुमच्या प्रॉपर्टीची ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये सांगा आणि तुमचे फोटोज अपडेट करा.

  • तुमच्या प्रोफाईलमध्ये
  • तुमची सर्वनामे जोडा (उदाहरणेः ती/तिला, तो/त्याला, ते/त्यांना). तुम्हाला कसे संबोधित केलेले आवडते आहे हे यावरून समजते आणि हेदेखील लक्षात येते की तुम्हाला तुमच्या गेस्ट्सचे पसंतीचे सर्वनाम वापरण्याची देखील काळजी आहे.

  • तात्काळ बुकिंगचालू करा जेणेकरून गेस्ट्सना तुमची लिस्टिंग आगाऊ बुकिंग ऑफरशिवाय बुक करता येईल.यामुळे हे देखील समजते की तुम्ही तुमच्या बुकिंगच्या निकषांमध्ये बसणाऱ्या कोणालाही होस्ट करण्यास तयार आहात. 

  • बुकिंग करण्यापूर्वी तुमच्याशी संपर्क साधणाऱ्या गेस्ट्सना आगाऊ बुकिंग ऑफर द्या आणि त्यांना प्रोत्साहित करा. आमच्या असे लक्षात आले आहे की गेस्ट्स कधीकधी बुकिंग करण्यापूर्वी होस्ट्सशी संपर्क साधतात कारण त्यांना स्वीकारले जाईल आणि त्यांचे स्वागत केले जाईल किंवा नाही याचा त्यांना अंदाज घ्यायचा असतो.

  • एखाद्या गेस्टची बुकिंगची विनंती नाकारण्यापूर्वी तुमच्या कारणाबद्दल काळजीपूर्वक विचार करा. ते कारण तुम्ही तुमच्या गेस्टना समोरासमोर सहजपणे सांगू शकाल का?

टिप: तुमच्या गेस्ट्सना तुमच्याशी कनेक्ट होण्याची संधी देण्यासाठी तुमच्या प्रोफाईलमध्ये आणि तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनात तुमच्याबद्दल आणि तुमच्या आवडींबद्दल अधिक शेअर करा.

तुम्ही इतर होस्ट्सनी त्यांच्या लिस्टिंग्जमध्ये वापरलेल्या सर्वसमावेशक स्टेटमेंट्सच्या आधारे तुमचे स्टेटमेंट बनवू शकता. ही उदाहरणे मिळविण्यासाठी आम्ही होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्यांशी बोललो:

  1. सॅन फ्रान्सिस्कोचे पीटर लिहितात: “माझे घर सर्व अल्पसंख्याक आणि उपेक्षित ग्रुप्सच्या लोकांसाठी एक सुरक्षित जागा आहे. मी सर्व वंश, धर्म, लिंग आणि लैंगिक प्रवृत्तींच्या गेस्ट्सचे स्वागत करतो.

  2. “माझ्या लिस्टिंगमधील दुसऱ्या फोटोमध्ये एक स्मारक दाखवण्यात आले आहे, ज्यात ‘ही तुमची जागा आहे ', असे म्हटले आहे,” असे ओसाका, जपानमधील शिन्या सांगतात. शिन्या यांनी आणखी एक फोटो जोडला आहे ज्यावर त्यांचा हेतू स्पष्ट करत म्हटले आहे “मी विविधता आणि समावेशकतेचा आदर करतो.” तुम्ही हे कॅप्शनमध्ये देखील लिहू शकता. 

आगमनाच्या आधी: प्रत्येक गेस्टला समाविष्ट केल्यासारखे वाटू देणे

एकदा तुमची जागा बुक झाली की, तुमच्या गेस्ट्सना एक आपुलकीचा आणि स्वागत करणारा मेसेज पाठवा. इतरांच्या भावनांबद्दल आदर दाखवणे—आणि कोणतीही पूर्वधारणा न बाळगणे—खूप कामाचे असते. 

  • तुमचा वेलकम मेसेज पर्सनलाईज करा आणि त्यासाठी तुमच्या गेस्टच्या प्रोफाईलवरील माहितीचा वापर करा. यात त्यांच्या आवडी, त्यांचे मूळ गाव आणि छंद यांच्याबद्दलच्या प्रश्नांचा समावेश असू शकतो. 

  • तुमच्या गेस्ट्सच्या संदर्भात बोलताना लिंग आणि अभिमुखतेबाबत तटस्थ भाषा वापरा. एखाद्याच्या लिंग किंवा रिलेशनशिप स्टेटसबद्दल कोणतीही धारणा न बनवणे चांगले असते. 

  • एखाद्या गेस्टने ॲक्सेसिबिलिटीच्या गरजांबद्दल विचारल्यास, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नक्की द्या आणि त्यांना आणखी कशाची गरज आहे हेसुद्धा विचारा.

टिप: तुमच्या गेस्ट्सना मेसेज पाठवून विचारण्याचा प्रयत्न करा, “तुमचे वास्तव्य आरामदायक व्हावे याची खात्री करण्यासाठी मी काय करू शकतो?”

तुम्हाला प्रेरणा हवी असल्यास, इतर होस्ट्सनी गेस्ट्सना लिहिलेल्या मेसेजेसचा संदर्भ घ्या. येथे दोन उदाहरणे दिली आहेत: 

  1. फॉलकारा, आयर्लंड येथील मायकेल म्हणतात की ते सुरुवातीला एक मैत्रीपूर्ण नातेसंबंध तयार करण्यास प्राधान्य देतात. “आमच्या लिस्टिंगमध्ये वास्तव्य करण्याची विनंती केल्याबद्दल मी नेहमीच गेस्ट्सचे आभार मानतो,” ते म्हणतात. “मग मी सांगतो की मी त्यांच्या येण्याची तारीख जवळ आल्यावर त्यांच्याशी संपर्क साधेन, त्यांना एका सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देतो. या दरम्यान त्यांना काही हवे असल्यास, माझ्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका असेही त्यांना सांगतो.”

  2. डेनव्हरच्या सुझान लिहितात: “आमचे घर तुमचे घर आहे. आरामात रहा. या जागेला तुमची स्वतःची जागा समजा. आमच्या गेस्टना आणखी चांगला अनुभव देण्यासाठी तुमच्याकडे काही कल्पना असल्यास कृपया आम्हाला कळवा.” 

चेक इननंतर: गेस्ट्स आरामदायी असल्याची खात्री करणे

गेस्ट्सनी—विशेषत: ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित कम्युनिटीजमधील लोकांनी—सांगितले आहे की या गोष्टींमुळे त्यांना आपले स्वागत केले जाते आहे असे वाटण्यात मदत होते:

  • शक्य असेल तेव्हा गेस्ट्सना स्वतःहून चेक इन करण्याची सुविधा द्या पण त्यांना वैयक्तिक चेक इन आवडेल का हेसुद्धा विचारा.
  • गेस्ट्सना विनाकारण भेटू नका. त्याऐवजी, त्यांना प्रायव्हसी द्या आणि त्यांना गरज भासेल तेव्हा तुम्ही (वैयक्तिक किंवा व्हर्च्युअल पद्धतीने) उपलब्ध आहात हे स्पष्ट करा.

टिप: तुमच्या जागेबद्दल कोणतीही महत्वाची माहिती तुमच्या घराच्या नियमांमध्ये जोडा, जेणेकरून गेस्ट्स ती डिजिटल पद्धतीने ॲक्सेस करू शकतील.

चेक आऊटनंतर: गेस्ट्सचा रिव्ह्यू तटस्थपणे करणे

रिव्ह्यूज हे Airbnb च्या विश्वसनीय कम्युनिटीचा पाया आहेत. तुमच्या गेस्ट्सचा रिव्ह्यू देणे ही तुमची कृतज्ञता दाखवण्याची आणि उपयुक्त फीडबॅक देण्याची संधी आहे.

प्रत्येक गेस्टचे मूल्यांकन करण्यासाठी
  • समान स्टँडर्ड्स वापरा.

  • शक्य असेल तेव्हा Airbnb वर नवीन असलेल्या गेस्ट्सना होस्ट करा
  • आणि त्यांच्या वास्तव्यानंतर त्यांच्यावर रिव्ह्यू लिहा. रिव्ह्यूमुळे गेस्ट्सना भविष्यातील बुकिंग्ज मिळण्यात खूप मदत होते. 

  • गेस्ट्सना रिव्ह्यूज देण्यासाठी प्रोत्साहित करा. आमच्या असे लक्षात आले आहे की ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित कम्युनिटीजमधील प्रवासी, त्यांच्यासारख्या इतर गेस्ट्सचे कसे स्वागत केले गेले हे माहीत करून घेण्यासाठी बुकिंग करण्यापूर्वी बऱ्याचदा रिव्ह्यूज वाचतात.

  • तुम्ही या सर्वसमावेशक पद्धतींचे पालन करत आहात याची खात्री करा, विशेषतः तुम्ही नव्याने होस्टिंग करत असल्यास. लक्षात ठेवा की सर्व गेस्ट्सचे स्वागत करताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमच्या गेस्ट्सच्या गरजांबद्दल प्रश्न विचारणे आणि मनमोकळा संवाद साधणे.

    तुम्ही तुमच्या गेस्ट्सना फक्त 'तुम्हाला माझ्या जागेत आरामदायक आणि आपलेपणा वाटण्यासाठी मी काय करू शकतो?' असे विचारून समावेशकतेचा दरवाजा उघडू शकता. दाट शक्यता आहे की असे केल्याने तुम्ही तुमच्या गेस्ट्सना वास्तविक आयुष्यातील तुमचा दरवाजा उघडण्यात आणि तुमच्या जागेत एक उत्तम अनुभव घेण्यात मदत कराल. 
    Airbnb
    27 जून, 2022
    हे उपयुक्त ठरले का?