Airbnb वरील भाडी समजून घेणे
Airbnb वर 3 प्रकारची भाडी आहेतः किमान, वीकेंड आणि कस्टम. ती मिळून वापरल्यास तुमची लिस्टिंग वर्षभर नजरेत भरण्यात आणि तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत होते.
Airbnb भाड्याच्या सर्व 3 प्रकारांसाठी पर्सनलाईज्ड भाडे सल्ले देते. ते देताना लोकेशन, सुविधा, तुमची मागील बुकिंग्ज आणि तुमच्या भागातील चालू भाडी यासारख्या अनेक बाबींचा विचार केला जातो.
किमान भाडे
तुमचे किमान भाडे हे तुमच्या कॅलेंडरवरील सर्व रात्रींचे डिफॉल्ट भाडे आहे. तुम्ही पहिले Airbnb Setup मध्ये हे भाडे निवडता आणि नंतर ते तुमच्या भाडे सेटिंग्जमध्ये कधीही बदलू शकता.
तुम्ही एन्टर केलेल्या नंबरच्या खाली किमान भाड्याशी संबंधित सल्ला दिसून येतो ज्यात एक भाडे सुचवलेले असते. तुम्हाला वेगळे भाडे सेट करायचे असल्यास, तुमचे खर्च किती आहेत आणि गेस्ट्स किती पैसे देण्यास इच्छुक आहेत त्यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. या काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
- तुमचे होस्टिंगचे खर्च: मॉर्गेज, अत्यावश्यक सुविधा, देखभाल आणि कर यासारख्या गोष्टी विचारात घ्या.
- तुम्ही देत असलेले मूल्य: लोकप्रिय सुविधा, ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये आणि तुमची लिस्टिंग स्थानिक आकर्षणांच्या जवळपास असणे हे हायलाईट करून तुमच्या लिस्टिंगची वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल यावर विचार करा.
- मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज: तुमच्या भागाच्या मॅपवर बुक झालेल्या आणि न झालेल्या घरांच्या सरासरी भाड्यांची तुलना करण्यासाठी हे प्राईसिंग टूल वापरा. तुम्ही स्मार्ट रेट वापरत असल्यास मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज दिसणार नाहीत.
- गेस्ट्सना द्यावे लागणारे एकूण भाडे: तुम्ही जोडलेले कोणतेही शुल्क, जसे की स्वच्छता शुल्क, एकूण भाड्यावर परिणाम करते.
तुम्ही तुमची कमाईच्या उद्दिष्टांच्या दिशेने काम करत असताना कमी किमान भाड्यापासून सुरुवात केल्यास तुम्हाला तुमच्या पहिल्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात आणि रिव्ह्यूज मिळवण्यात मदत होऊ शकते.
वीकएंडचे भाडे
तुम्ही वीकेंड्ससाठी, म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार रात्रींसाठीचे प्रीमियम जोडू शकता. तुमच्या भाड्यात रात्रीनुसार बदल केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त बुकिंग्ज मिळवण्यात मदत होऊ शकते.
तुम्ही एन्टर केलेल्या नंबरच्या खाली वीकेंड भाडे सल्ला दिसून येतो आणि तो किमान भाड्यापेक्षा काही टक्के जास्त असतो. तुम्ही वीकएंडचे भाडे सेट न केल्यास, तुमच्या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला किमान भाडे लागू होते.
कस्टम भाडे
तुम्ही कोणत्याही रात्रीसाठी कस्टम भाडे सेट करू शकता. हे तुमच्या निवडलेल्या रात्रींसाठी तुमच्या किमान किंवा वीकेंडच्या भाड्याला ओव्हरराईड करते.
तुम्हाला वेगवेगळ्या दिवसांसाठी, सीझन्ससाठी आणि विशेष इव्हेंट्ससाठी भाडे ठरवण्यात मदत करण्यासाठी तुमच्या कॅलेंडरच्या प्रत्येक दिवशी तुमच्या कस्टम भाड्याच्या खाली प्रति रात्र भाड्याबाबात सल्ले दिसून येतात.
तुम्हाला भाडे सल्ले का दिसत नसावेत
तुम्हाला भाडे सल्ले दिसत नसल्यास, ते खालीलपैकी एखाद्या कारणामुळे असू शकते:
- स्मार्ट रेट चालू आहे
- तुमचे भाडे सुचवलेल्या श्रेणीत आहे
- त्या रात्रींसाठी सवलती किंवा प्रमोशन्स आधीच लागू केलेल्या आहेत
- भाडे सल्ले जनरेट करण्यासाठी पुरेसा डेटा नाही
तुम्हाला तुमचे भाडे ऑटोमॅटिक पद्धतीने ॲडजस्ट करायचे असल्यास स्मार्ट रेट चालू करा.
तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगवेगळे असू शकतात.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.