Airbnb होस्ट्सचे संरक्षण कसे करते

आमच्या धोरणांच्या आणि संरक्षणांच्या मदतीने पूर्ण आत्मविश्वासाने होस्ट करा.
Airbnb यांच्याद्वारे 4 फेब्रु, 2020 रोजी
10 जुलै, 2024 रोजी अपडेट केले

तुम्ही होस्ट करत असताना तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही हजर आहोत. तुम्ही जोपर्यंत कम्युनिकेशन, बुकिंग आणि पेमेंटसाठी Airbnb चा वापर कराल, तोपर्यंत आमची धोरणे आणि सेवा तुमचे संरक्षण करतील.

होस्ट्ससाठी AirCover

होस्ट्ससाठी AirCover हे Airbnb वरील प्रत्येक होस्टसाठी संपूर्ण संरक्षण आहे. यामध्ये $10 लाख USD चा होस्ट दायित्व विमा समाविष्ट आहे. यात होस्ट नुकसान संरक्षणासाठी $30 लाख USD देखील समाविष्ट आहे, ज्यात कलाकृती, मौल्यवान वस्तू, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये पार्क केलेल्या अथवा ठेवलेल्या कार्स, बोट्स, इतर मोटर वाहने आणि वॉटरक्राफ्ट तसेच इतर अनेक गोष्टींना सुरक्षा कव्हरेज दिले जाते.

होस्ट्ससाठी AirCover गेस्ट्सच्या ओळख व्हेरिफिकेशनसारखे ट्रिपपूर्वीचे उपाय देते, जे वापरून बुकिंग करणारे गेस्ट्स ते जे सांगत आहेत तेच आहेत याची खात्री करण्यात मदत होते. कायद्याची परवानगी असल्यास आम्ही बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सचे बॅकग्राउंड चेक करू शकतो आणि बुक करणारे गेस्ट्स काही विशिष्ट वॉचलिस्ट्स किंवा प्रतिबंधित सूचीमध्ये सामील आहेत का ते तपासू शकतो. आमचे प्रोप्रायटरी रिझर्व्हेशन स्क्रीनिंग तंत्रज्ञान त्रासदायक पार्ट्या आणि प्रॉपर्टीचे नुकसान होण्याची शक्यता कमी करण्यास देखील मदत करते.

Airbnb सपोर्ट

Airbnb तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी 46 भाषांमध्ये, दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सात दिवस उपलब्ध आहे.

  • फोन आणि ऑनलाईन सपोर्ट: तातडीच्या समस्यांसाठी, आम्हाला कॉल करा. तुमचे कॅलेंडर अपडेट करणे किंवा तुमच्या भाड्यामध्ये फेरबदल करणे यासारख्या तातडीच्या नसलेल्या समस्यांसाठी, आम्हाला मेसेज पाठवा.
  • स्वतंत्र सुपरहोस्ट सपोर्ट: जेव्हा सुपरहोस्ट्स Airbnb शी संपर्क साधतात तेव्हा त्यांचा एखाद्या तज्ञ Airbnb सपोर्ट स्टाफ सदस्याशी ऑटोमॅटिक संपर्क साधला जातो.
  • 24-तास सुरक्षा लाईन: तुम्हाला कधीही असुरक्षित वाटल्यास आमचे ॲप तुम्हाला विशेषरीत्या प्रशिक्षित सुरक्षा एजंट्सशी, दिवसा किंवा रात्री कधीही, एका टॅपद्वारे संपर्क साधू देते.

गेस्ट्ससाठी मुख्य नियम

Airbnb ने सर्व गेस्ट्सना गेस्ट्ससाठीच्या मुख्य नियमांचे पालन करणे आवश्यक केले आहे. गेस्ट्सनी तुमच्या जागेचा आदरपूर्वक वापर करणे, मुख्य नियमांचे पालन करणे, समस्या उद्भवल्यास त्वरित संवाद साधणे आणि जास्त स्वच्छतेची आवश्यकता नसलेल्या स्थितीत तुमचे घर सोडणे आवश्यक आहे. प्रत्येक बुक करणारा गेस्ट रिझर्व्हेशन करण्यापूर्वी या मुख्य नियमांना संमती देतो.

गेस्टने मुख्य नियमांचे पालन न केल्यास, तुम्ही Airbnb सपोर्टशी संपर्क साधून किंवा गेस्टला रिव्ह्यूज प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेसाठी किंवा घराच्या नियमांसाठी कमी रेटिंग देऊन त्यांना रिपोर्ट करू शकता. जर समस्या कायम राहिल्यास, स्टँडर्ड घराचे नियम वारंवार मोडणाऱ्या गेस्ट्सना Airbnb वरून सस्पेंड केले जाऊ शकते किंवा काढून टाकले जाऊ शकते.

घराचे नियम मुख्य नियमांनुसार लागू केले जाऊ शकतात. त्याद्वारे तुम्ही तुमच्या गेस्ट्सना सांगू शकता की तुम्हाला तुमच्या जागेसाठी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. तुम्ही आमच्या स्टँडर्ड घराच्या नियमांच्या लिस्टमधून या गोष्टी निवडू शकता:

  • पाळीव प्राणी
  • इव्हेंट्स
  • धूम्रपान, व्हेपिंग आणि ई-सिगारेट्स
  • शांततेचा कालावधी
  • चेक इन आणि चेक आऊटच्या वेळा
  • गेस्ट्सची कमाल संख्या
  • कमर्शियल फोटोग्राफी आणि चित्रीकरण

तुमच्याकडे स्टँडर्ड घराच्या नियमांमध्ये समाविष्ट नसलेल्या विशेष सूचना असल्यास, तुम्ही त्या तुमच्या लिस्टिंग सेटिंग्जमधील अतिरिक्त नियमांमध्ये लिहू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही गेस्ट्सना चेक आऊट करण्यापूर्वी सर्व खिडक्या बंद आणि लॉक करण्यास सांगू शकता.

रिव्ह्यूज आणि प्रोफाईल्स

गेस्ट्सवरील रिव्ह्यूज आणि त्यांच्या प्रोफाईल्समुळे तुम्हाला गेस्ट्सच्या वास्तव्यापूर्वी त्यांना जाणून घेण्यास मदत होते. रिझर्व्हेशन बुक करणाऱ्या किंवा ट्रिपमध्ये सामील होणाऱ्या गेस्ट्सना फोटो आणि त्यांच्या तपशिलांसह संपूर्ण प्रोफाईल तयार करण्यास सांगितले जाते.

होस्ट्स आणि गेस्ट्स रिझर्व्हेशन पूर्ण झाल्यानंतरच एकमेकांना रिव्ह्यू देऊ शकतात, त्यामुळे गेस्ट्सवरील रिव्ह्यूज वास्तविक अनुभवांवर आधारित असतात यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. गेस्ट्स वास्तव्यास येण्यापूर्वी तुम्ही त्यांना प्रश्नही विचारू शकता आणि कोणत्याही वेळी तुमच्या अपेक्षासुद्धा सेट करू शकता.

तात्काळ बुकिंग वापरत असल्यास, तुम्ही ती सुविधा फक्त त्या गेस्ट्सना देण्याचा पर्याय निवडू शकता, ज्यांनी कोणत्याही अप्रिय घटनेशिवाय किंवा कमी रेटिंग्जशिवाय किमान एक वास्तव्य पूर्ण केले आहे. तुम्ही मॅन्युअल बुकिंग विनंत्यांना प्राधान्य दिल्यास, तुम्ही रिझर्व्हेशन स्वीकारण्यापूर्वी गेस्ट्सच्या प्रोफाईल्स आणि रिव्ह्यूज ॲक्सेस करू शकता.

जोवर तुम्ही होस्ट कॅन्सलेशन धोरणाचे पालन करत आहात तोवर एखाद्या रिझर्व्हेशनमध्ये पार्टी केली जाणार आहे असे तुम्हाला रास्तपणे वाटल्यास, तुम्ही ते कधीही कॅन्सल करू शकता. जोवर तुम्ही आमच्या भेदभाव-विरोधी धोरणाचे पालन करत आहात तोवर, तुम्हाला एखाद्या ट्रिपच्या विनंतीबाबत मनात काही शंका-कुशंका असल्यास तुम्ही ती नाकारू शकता.

अधिक सपोर्ट हवा आहे का?

इतर होस्ट्सशी संबंध जोडण्यासाठी तुमच्या स्थानिक होस्ट क्लबमध्ये सामील व्हा.
तुमचा होस्ट क्लब शोधा

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

होस्ट्ससाठी AirCover चे होस्ट नुकसान संरक्षण, होस्ट दायित्व विमा आणि अनुभव दायित्व विमा याद्वारे मिळणारे संरक्षण जपानमध्ये वास्तव्य किंवा अनुभव ऑफर करणाऱ्या होस्ट्सना लागू होत नाही, जेथे जपान होस्ट विमा आणि जपान अनुभव संरक्षण विमा लागू आहे किंवा Airbnb Travel LLC द्वारे वास्तव्य ऑफर करणाऱ्या होस्ट्सना देखील लागू होत नाही. मेनलँड चीनमध्ये वास्तव्याच्या जागा किंवा अनुभव ऑफर करणाऱ्या होस्ट्सना, चीन होस्ट संरक्षण प्लॅन लागू होतो. कृपया लक्षात घ्या की सर्व कव्हरेज मर्यादा USD मध्ये दाखवल्या आहेत.

होस्ट दायित्व विमा आणि अनुभव दायित्व विमा तृतीय-पक्ष विमा कंपन्यांद्वारे अंडरराईट केले जातात. तुम्ही युकेमध्ये वास्तव्ये होस्ट करत असल्यास, होस्ट दायित्व आणि अनुभव दायित्व विमा पॉलिसीज Zurich Insurance Company Ltd. द्वारे अंडरराईट केल्या जातात आणि त्यांची व्यवस्था आणि पूर्तता युकेमधील होस्ट्सना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Airbnb UK Services Limited द्वारे करण्यात येते, जी Financial Conduct Authority द्वारे अधिकृत आणि विनियमित Aon UK Limited ची नियुक्त प्रतिनिधी आहे. Aon चा FCA रजिस्टर नंबर 310451 आहे. तुम्ही फायनान्शियल सर्व्हिसेस रजिस्टर येथे भेट देऊन किंवा FCA शी 0800 111 6768 वर संपर्क साधून हे तपासू शकता. होस्ट्ससाठी Aircover मधील होस्ट दायित्व आणि अनुभव दायित्व पॉलिसीजचे नियमन Financial Conduct Authority द्वारे केले जाते. उर्वरित उत्पादने आणि सेवा Airbnb UK Services Limited द्वारे व्यवस्थापित केलेली नियंत्रित उत्पादने नाहीत. FPAFF405LC

होस्ट नुकसान संरक्षण हा विमा नाही आणि तो होस्ट दायित्व विम्याशी संबंधित नाही. होस्ट नुकसान संरक्षणाद्वारे, गेस्ट्सकडून तुमच्या घराला आणि सामानाला झालेल्या काही विशिष्ट प्रकारच्या नुकसानीची तुम्हाला भरपाई केली जाते, जर गेस्ट्सने त्या नुकसानीची भरपाई केली नाही तर. वॉशिंग्टन स्टेटमधील लिस्टिंग्जसाठी, होस्ट नुकसान संरक्षणांतर्गत असलेल्या Airbnb च्या कराराच्या जबाबदाऱ्या, Airbnb ने खरेदी केलेल्या विमा पॉलिसीद्वारे कव्हर केल्या जातात. ज्या होस्ट्सचा राहण्याचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया नाही, अशा होस्ट्ससाठी, हे होस्ट नुकसान संरक्षण नियम लागू होतात. ज्या होस्ट्सचा राहण्याचा किंवा आस्थापनाचा देश ऑस्ट्रेलिया आहे, अशा होस्ट्ससाठी, होस्ट नुकसान संरक्षण ऑस्ट्रेलियन युजर्ससाठी असलेल्या होस्ट नुकसान संरक्षणाच्या अधीन आहे.

Airbnb
4 फेब्रु, 2020
हे उपयुक्त ठरले का?