जास्त मागणीला जास्त कमाईमध्ये रूपांतरित करणे

गर्दीच्या सीझनचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यात मदत व्हावी यासाठी Airbnb होस्टिंग टूल्स वापरा.
Airbnb यांच्याद्वारे 6 जाने, 2025 रोजी
4 मिनिटांचा व्हिडिओ
19 मार्च, 2025 रोजी अपडेट केले

सुट्ट्या, मोठे इव्हेंट्स आणि अनुकूल हवामानामुळे लोकांचा तुमच्या लिस्टिंगमधील इंटरेस्ट वाढू शकतो. या जास्त मागणी असलेल्या कालावधींमध्ये Airbnb होस्टिंग टूल्स तुम्हा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यात मदत करतात. तुमची कमाई जास्तीत जास्त वाढवण्यासाठी या पायऱ्यांचा विचार करा.

तुमचे कॅलेंडर अप टू डेट ठेवा

जास्त मागणीच्या सीझनची तयारी करण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या कॅलेंडरमध्ये अतिरिक्त रात्री खुल्या करणे. यामुळे तुमची लिस्टिंग जास्त सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यात मदत होते तसेच तुमची कमाई वाढू शकते.

तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरवर जा आणि ब्लॉक केलेल्या रात्री पहा, ज्या राखाडी रंगात दिसतात. तुम्ही होस्ट करू शकता अशा कोणत्याही ब्लॉक केलेल्या रात्री उघडा.

तुमचा उपलब्धतेताचा कालावधी वाढवल्याने गेस्ट्सना आणखी आधी बुकिंग करता येते. हे धोरण विशेषकरून त्या प्रदेशांमध्ये प्रभावी ठरते जिथे जास्त मागणीच्या कालावधीचा अंदाज आधीपासून लावता येतो, जसे की वार्षिक मोठे इव्हेंट्स आणि स्नो व बीच सीझन.

तुमचा उपलब्धतेचा कालावधी काहीही असो, तुमचे कॅलेंडर एका वेळी एक दिवस या आधारावर खुले होते. उदाहरणार्थ, तुमचा कालावधी 12 महिने असल्यास, गेस्ट्स तुमची जागा आजच्या तारखेपासून एक वर्ष पुढेपर्यंत बुक करू शकतात, आणि तुमची उपलब्धता दररोज अपडेट होईल.

स्पर्धात्मक भाडे ठेवा

जास्त मागणीच्या सीझनमध्ये स्पर्धात्मक राहण्यासाठी तुमच्या भागातील तुमच्यासारख्या लिस्टिंग्जची भाडी तपासा. तुमच्यासारख्या लिस्टिंग्जची तुलना करण्यासाठी, तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरवर जा आणि 31 दिवसांपर्यंतच्या तारखेची श्रेणी निवडा.

तुम्हाला तुमच्या भागाच्या नकाशावर मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची सरासरी भाडी दिसतील. कोणत्या प्रॉपर्टीज मिळत्या-जुळत्या आहेत हे ज्या घटकांवरून ठरवले जाते त्यांच्याध्ये लोकेशन, आकार, वैशिष्ट्ये, सुविधा, रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि गेस्ट्सनी तुमच्या लिस्टिंग्जचा विचार करताना बघितलेल्या इतर लिस्टिंग्ज समाविष्ट असतात.

जवळपासच्या इतर मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जपेक्षा कमी भाडी असलेल्या लिस्टिंग्जना सर्च रिझल्ट्समध्ये सहसा वरची रँकिंग मिळते.

तुम्ही रोज रात्री एकसारखे भाडे ऑफर करत असल्यास, मागणीतील बदलांशी जुळवून घेण्यासाठी वीकडेज आणि वीकेंड्सची भाडी वेगवेगळी ठेवण्यावर विचार करा. भाडी मागणीनुसार बदलती ठेवल्यास तुम्हाला जास्त बुकिंग्ज मिळण्यात मदत होऊ शकते.

सवलत जोडा

सवलती जोडणे हा गेस्ट्सच्या नजरेत भरण्याचा आणखी एक मार्ग आहे. तुम्ही या सुविधा ऑफर करून वेगवेगळ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करू शकता:

  • साप्ताहिक आणि मासिक सवलती. सात किंवा त्याहून जास्त रात्रींच्या वास्तव्यांसाठी साप्ताहिक सवलती किंवा 28 किंवा त्याहून जास्त रात्रींच्या वास्तव्यांसाठी मासिक सवलती ऑफर करा. यामुळे तुमच्या सर्व लिस्टिंग्जमध्ये वास्तव्याचा सरासरी कालावधी वाढू शकतो आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करावी लागू शकते.
  • अर्ली बर्ड सवलत. चेक इनच्या 1 ते 24 महिने आधी केलेल्या बुकिंग्जवर सवलत जोडा आणि जास्त गर्दीच्या सीझन्सपूर्वी भरपूर बुकिंग्ज असतील याची खात्री करा.
  • अखेरची सवलत. चेक इनची तारीख जवळ आल्यावर तुमचे प्रति रात्र भाडे कमी केल्याने तुम्हाला ऐन वेळी प्रवास प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यात मदत होऊ शकते. चेक इनच्या 1 ते 28 दिवस आधी केलेल्या बुकिंग्जवर सवलती दिल्याने तुमचे कॅलेंडर भरण्यात आणि तुमची कमाई वाढवण्यात मदत होऊ शकते.

गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर 10% किंवा त्याहून अधिकच्या साप्ताहिक, मासिक आणि अखेरच्या सवलतींकडे तसेच 3% किंवा त्याहून अधिकच्या अर्ली बर्ड सवलतींकडे लक्ष वेधून घेणारा एक विशेष कॉलआऊट दिसतो. तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.

स्मार्ट रेट चालू केल्यावर अर्ली बर्ड सवलत उपलब्ध नसते आणि वास्तव्यांच्या कालावधींनुसार सवलती देताना स्थानिक नियम आणि विनियमांचे पालन करणे आवश्यक असते याची नोंद घ्या.

फोटो टूर सेट अप करा

उत्तम फोटोजमुळे लोकांचे लक्ष वेधले जाते, त्यांनी काय अपेक्षा ठेवाव्यात हे स्पष्ट होते आणि गेस्ट्सचा तुमचे घर बुक करण्याबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही जास्त मागणी असलेल्या सीझनची तयारी करत असताना तुमच्या लिस्टिंगचे फोटो अपडेट करण्यावर विचार करा.

  • तुमचे फोटो प्लॅन करून ठेवा. तुमच्या घराचे अनोखे तपशील, लोकप्रिय सुविधा आणि ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये दाखवणारे फोटो काढण्यावर लक्ष केंद्रित करा. गेस्ट्स वापरू शकतील अशी प्रत्येक रूम आणि भाग वेगवेगळ्या कोनांमधून कॅप्चर करा.
  • हॉरिझॉन्टल, हाय-रिझोल्युशन इमेजेस अपलोड करा. फोटो किमान 800 पिक्सल्स x 1,200 पिक्सल्स असणे आवश्यक आहे. फाईलचा आकार मोठा असेल तर चांगले असते, 10 मेगाबाईट्सपर्यंत.
  • व्यावसायिक मदत मिळवा. एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफरला नेमण्यावर विचार करा. Airbnb तुम्हाला जगभरातील निवडक शहरांमध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर्सशी कनेक्ट करू शकते.
  • एक फोटो टूर तयार करा. Airbnb ची टूल्स तुमच्या अपलोड केलेल्या इमेजेसची रूमनुसार आपोआप क्रमवारी लावतात जेणेकरून गेस्ट्सना तुमच्या घराचा लेआऊट समजण्यात मदत होते. तुम्ही फोटो हलवू शकता, काढून टाकू शकता आणि जोडू शकता, प्रत्येक रूममध्ये तपशील जोडू शकता आणि प्रत्येक फोटोसाठी कॅप्शन लिहू शकता.

चेक इन आणि चेक आऊट करणे सोपे करा

तुमची लिस्टिंग अधिक आकर्षक बनवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे चेक इन आणि चेक आऊट सोपे करणे.

  • स्वतःहून चेक इनची सुविधा जोडा. स्मार्ट लॉक, कीपॅड किंवा लॉकबॉक्स इन्स्टॉल केल्याने गेस्ट्सना एक कोड वापरून प्रवेशद्वार अनलॉक करता येते. बरेच गेस्ट्स स्वतःहून चेक इनची सुविधा आणि सोयीस्करपणा पसंत करतात आणि यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो. तुम्ही कोणतीही पद्धत निवडा, प्रत्येक बुकिंगच्या गेस्टना एक युनिक ॲक्सेस कोड देणे महत्त्वाचे आहे.
  • चेक आऊटच्या सूचना द्या. स्पष्ट आणि सोप्या पायऱ्यांचा समावेश करा, जसे की चाव्या कुठे ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी बंद करणे आवश्यक आहे.

कॅलिफोर्नियाच्या पाम स्प्रिंग्जमधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि सुपरहोस्ट केटी म्हणतात, “गेस्ट्सना अशा कामांचा खूप जास्त भार होऊ नये हे महत्त्वाचे आहे कारण कोणत्याही परिस्थितीत चेक आऊटपूर्वी करण्याच्या कामांची यादी किती मोठी होती अशी आठवण त्यांच्या मनात राहू नये.” “तुमची चेक आऊटची यादी लांबलचक नाही, केवळ या एक कारणामुळे तुम्ही फाईव्ह स्टार रिव्ह्यू मिळवू शकता.”

स्थानिक होस्ट क्लब मध्ये सामील व्हा

जगभरातील शेकडो होस्ट क्लब्ज Airbnb होस्ट्सना एकमेकांशी कनेक्ट होण्यात आणि एकमेकांकडून शिकण्यात मदत करतात. आम्हाला असे दिसून आले आहे की या स्थानिक क्लब्जचे सदस्य हे क्लबचे सदस्य नसलेल्या होस्ट्सपेक्षा दुप्पट कमाई करतात* आणि ते सुपरहोस्ट्स होण्याची शक्यता जवळपास तिप्पट असते.**

क्लबच्या लोकप्रिय अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • एकमेकांना कमाई वाढवू शकतील असे होस्टिंगचे सल्ले देणे
  • अल्पकालीन रेंटलच्या नियमांवर चर्चा करणे
  • विश्वसनीय स्थानिक सेवा शेअर करणे (क्लीनर्स, प्लंबर्स, इ.)
  • नेटवर्किंगसंबंधी विशेष कार्यक्रमांना उपस्थित राहणे

*Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार, सप्टेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत, संपूर्ण जागतिक होस्ट लोकसंख्येच्या तुलनेत जागतिक Airbnb होस्ट क्लब सदस्यांची सरासरी कमाई आणि सरासरी रेटिंग्जची तुलना करताना. कमाईचा डेटा लोकेशन, सीझन आणि लिस्टिंगचा प्रकार यानुसार बदलतो.

**जुलै 2023 ते जुलै 2024 या कालावधीत सामील झालेल्या होस्ट्सच्या सुपरहोस्ट स्टेटसशी संबंधित Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार.

तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.

होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.

होस्टिंग टिप्स स्थानिक कायद्याच्या अधीन आहेत.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
6 जाने, 2025
हे उपयुक्त ठरले का?