तुमची जागा तयार करा
अगदी छोट्या तपशीलांकडे लक्ष दिल्याने तुमची वास्तव्याची जागा पंचतारांकित होऊ शकते. स्वागतार्ह वाटणारे घर तुम्हाला तुमचा पहिले उत्कृष्ट रिव्ह्यूज देऊ शकते.
स्वच्छतेबद्दल काटेकोर असणे
यशस्वी होस्ट्स तुमची जागा चकाचक ठेवण्यासाठी, या तीन गोष्टी करण्याचा सल्ला देतात:
वारंवार वापरल्या जाणाऱ्या जागांवर लक्ष केंद्रित करा. काऊंटरटॉप, नाले स्वच्छ करा आणि साबणाच्या बाटल्या पुन्हा भरा. कुठेही केस राहिले नाहीत, ते पुन्हा तपासा.
प्रत्येक रूम रीफ्रेश करा. खिडक्या उघडा, फरशी आणि सर्व पृष्ठभाग साफ करा, फर्निचरच्या खालचेसुद्धा. फ्रेश लिनन्स वापरून बेड बनवा आणि प्रत्येक गेस्टसाठी स्वच्छ टॉवेल्स द्या.
- टर्नओव्हर चेकलिस्ट तयार करा. काहीही दुर्लक्षित होऊ न देण्यासाठी प्रत्येक चेक इनपूर्वी त्याच नित्यक्रमाचे पालन करा.
स्पेनच्या कॅनरी बेटांवरील होस्ट सल्लागार बोर्डाचे सदस्य आणि सुपरहोस्ट डॅनियल म्हणतात,“मी बुकिंग्जच्या दरम्यान सहा तास ठेवतो, जेणेकरून आम्ही संपूर्ण स्वच्छता करू शकू.” “तुमच्या ऑनलाईन लिस्टिंगमध्ये जशी आहे, जागा तशीच असली पाहिजे.”
मूलभूत गोष्टींचा साठा करणे
तुमच्या जागेवर आवश्यक सुविधा मिळतील अशी गेस्ट्सची अपेक्षा असते. त्या या आहेत:
- टॉयलेट पेपर
- साबण (हात आणि शरीरासाठी)
- प्रति गेस्ट एक टॉवेल
- प्रति गेस्ट एक उशी
- प्रत्येक गेस्ट बेडसाठी लिनन्स
प्रत्येक रूममध्ये सोयीस्कर गोष्टी देऊन गेस्ट्सना घरासारखे वाटण्यात मदत करा, जसे की:
किचन
- तुमच्या अधिकतम गेस्ट्ससाठी टेबलांची व्यवस्था
- कॉफी मेकर, टी केटल, भांडी आणि तवे, स्वयंपाकाची भांडी
- मीठ, मिरपूड आणि खाद्यतेल
- भांड्यांचा साबण, ड्रायिंग रॅक आणि कापडी किंवा पेपर टॉवेल्स
लिव्हिंग रूम
- तुमच्या अधिकतम गेस्ट्ससाठी बसण्याची व्यवस्था
- स्ट्रीमिंग सेवा असलेला टीव्ही
- उपकरणे कशी वापरावी याविषयीच्या सूचनांसह सुविधा सूची
बाथरूम
- हॅन्ड टॉवेल्स आणि बाथ मॅट
- टॉयलेट ब्रश आणि प्लंजर
- शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर ड्रायर
बेडरूम
- आवरणे असलेल्या खिडक्या आणि दिवे असलेली बेडसाईड टेबल्स
- कपड्यांसाठी ड्रॉवर किंवा हँगर्स आणि सामानासाठी जागा
- अतिरिक्त ब्लँकेट आणि फॅन किंवा स्पेस हीटर
तुम्ही तुमची जागा सेट केल्यावर, तिथे एक रात्र घालवा किंवा मित्रांना वास्तव्य करून फीडबॅक देण्यास सांगा. काय करायची आवश्यकता आहे ते तुम्हाला लगेचच कळेल.
अतिरिक्त जोडणे
अगदी छोट्याश्या तपशीलांकडे होस्ट्सनी लक्ष देणे आणि त्यांचे वास्तव्य अधिक आरामदायी बनवण्यासाठी अतिरिक्त गोष्टी ऑफर करणे, हे गेस्ट्सना आवडते. यामध्ये इअर प्लग्ज, कॉटन स्वाब्ज, बोर्ड गेम्स, पॉवर ॲडाप्टर्स आणि छत्र्या किंवा बीच टॉवेल्स यासारख्या तुमच्या लोकेशनशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो.
बऱ्याच अनुभवी होस्ट्सचे म्हणणे आहे की त्यांना हे आवडते:
- एक स्वागतार्ह भेटवस्तू देणे. हाताने लिहिलेली एक नोट, स्थानिक वस्तूंचे बास्केट किंवा विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी काहीतरी ठेवा.
- सजावटीद्वारे आराम देण्याचा प्रयत्न करणे. तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला कशामुळे आराम मिळतो याचा विचार करा. वॉल आर्ट, प्लांट्स आणि थ्रो पिलोज अशा गोष्टी घराला एक व्यक्तिमत्व आणि गेस्ट्सना आराम देऊ शकतात.
- सुविधा सूची प्रिंट करणे. गेस्ट्स सहजपणे शोधू शकतील अशा ठिकाणी सूची ठेवा, जसे की काऊंटरटॉपवर.
- विशेष वैशिष्ट्ये हायलाईट करणे. तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनात, स्वतंत्र वर्कस्पेस किंवा तुम्ही ऑफर केलेल्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांसारख्या काही विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या कोणत्याही गोष्टींची नोंद करा.
नॅशव्हिल, टेनेसी येथील होस्ट एल्सी म्हणतात,“माझ्याकडे एक पॅक करता येणारे मुलांचे खेळघर, एक हाय चेअर तसेच पुस्तके आणि खेळणी आहेत.”
तुम्हाला अधिक टिप्स हव्या असल्यास आणि तुमची पहिली बुकिंग मिळाली नसल्यास तुम्ही सुपरहोस्टकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळवू शकता. ते Airbnb वरील टॉप रेटिंग असलेले आणि सर्वात अनुभवी होस्ट्स आहेत.
पब्लिकेशननंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.