तुमच्या भाड्याचा आढावा घ्या
तुम्ही तुमचे सुरुवातीचे किमान भाडे Airbnb Setup मध्ये सेट करता. तुम्ही तुमच्या कमाईच्या उद्दिष्टांच्या दिशेने काम करत असताना कमी भाड्यापासून सुरुवात केल्यास तुम्हाला तुमच्या पहिल्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात आणि रिव्ह्यूज मिळवण्यात मदत होऊ शकते. स्पर्धात्मक राहण्यासाठी तुमच्या भाड्याचा नियमितपणे आढावा घ्या.
स्थानिक मागणी समजून घेणे
तुम्ही तुमच्या जागेचे भाडे जवळपासच्या मिळत्या-जुळत्या जागांपेक्षा जास्त ठेवल्यास, तुम्ही बुकिंग्ज गमावू शकता. तुम्ही Airbnb प्राईसिंग टूल्स वापरून मागणीतील बदलांना प्रतिसाद देऊ शकता. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- प्रति रात्र भाडे सल्ले. पर्सनलाईज्ड शिफारसींमुळे तुम्हाला वेगवेगळ्या दिवसांसाठी, सीझन्ससाठी आणि विशेष इव्हेंट्ससाठी भाडे ठरवण्यात मदत होते. हे सल्ले देताना तुमच्या लिस्टिंगचे लोकेशन आणि सुविधा, तुमची मागील बुकिंग्ज आणि तुमच्या भागातील नवीनतम भाडी यासारख्या घटकांचा विचार केला जातो. ते दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी तुमच्या कॅलेंडरच्या वरच्या कांडीवर टॅप करा.
- मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज. या टूलमुळे तुम्हाला तुमच्या भागाच्या मॅपवर बुक झालेल्या आणि न झालेल्या घरांच्या सरासरी भाड्यांची तुलना करता येते. मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज पाहण्यासाठी तुमच्या कॅलेंडरवरील कोणत्याही तारखांवर टॅप करा किंवा तुमच्या भाडे सेटिंग्जमध्ये किमान भाडे उघडा.
- स्मार्ट रेट. हे टूल भाडे सल्ल्यात वापरले जातात तेच घटक वापरून तुमचे भाडे मागणीनुसार ऑटोमॅटिक पद्धतीने अपडेट करते. तुम्ही तुमच्या भाड्याची श्रेणी सेट करता आणि तुम्ही तुमची भाडे सेटिंग्ज उघडून ती कोणत्याही तारखांसाठी चालू आणि बंद करू शकता. तुम्ही स्मार्ट रेट वापरल्यास, तुम्हाला भाडे सल्ले दिसणार नाहीत.
“माझ्या प्रदेशात काय चालले आहे हे जाणून घेतल्याने, मला माझ्या भाड्याविषयी अधिक आत्मविश्वास मिळतो,” फेलिसिटी या न्यू साऊथ वेल्स, ऑस्ट्रेलियामधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि सुपरहोस्ट सांगतात. "मला कळेल की, माझे भाडे योग्य आहे आणि म्हणून मी माझी भूमिका कायम ठेवली पाहिजे किंवा मला माझे भाडे कमी करायची आवश्यकता आहे."
आपण काय मूल्य देत आहोत यास प्राधान्य देणे
गेस्ट्स दिलेल्या भाड्याच्या मोबदल्यात अप्रतिम गुणवत्ता मिळेल अशी वास्तव्ये शोधत असतात. तुमच्या भाड्याचा आढावा घेताना, या गोष्टी लक्षात ठेवा:
- गेस्ट्सना द्यावे लागणारे एकूण भाडे. गेस्ट्स किती भाडे देतात हे समजून घेतल्यास तुम्हाला स्पर्धात्मक भाडे सेट करण्यात मदत होऊ शकते. Airbnb सेवा शुल्कासह भाडे विवरण मिळवण्यासाठी तुमच्या कॅलेंडरवरील कोणत्याही तारखा निवडा. हे लक्षात ठेवा की तुम्ही जोडलेले कोणतेही शुल्क, जसे की स्वच्छता शुल्क, एकूण भाड्यावर परिणाम करते.
- गेस्ट रिव्ह्यूज. गेस्ट फीडबॅक वापरून कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत आणि तुम्ही कुठे सुधारणा करू शकता हे जाणून घ्या. तुम्हाला काही उत्तम रिव्ह्यूज मिळाल्यानंतर, तुम्हाला तुमचे भाडे अपडेट करावे असे वाटू शकते.
- तुमची जागा काय ऑफर करते. लोकप्रिय सुविधा आणि ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये जोडणे यासारखे अपडेट्स केल्याने जास्त गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होऊ शकते.
लेक ॲरोहेड, कॅलिफोर्निया येथील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि सुपरहोस्ट केटी के म्हणतात, “तुमचे भाडे आणि बुकिंग्जना चालना देण्यासाठी डिझाईन आणि सुविधा या खूप उपयुक्त ठरतात.”
सवलती जोडणे
प्रमोशन्स आणि सवलतींमुळे तुमच्या लिस्टिंगचे सर्च रँकिंग चांगले होण्यात आणि गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होऊ शकते. पर्यायांमध्ये हे समाविष्ट आहेत:
- नवीन लिस्टिंग प्रमोशन. तुम्हाला तुमचे पहिले गेस्ट्स आणि रिव्ह्यूज मिळवण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या पहिल्या 3 बुकिंग्जवर 20% ची सूट ऑफर करा.
- अर्ली बर्ड सवलत. आधीपासून प्लॅन करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी 1 ते 24 महिने यादरम्यान कधीही केलेल्या बुकिंग्जसाठी तुमचे भाडे कमी करा.
- अखेरची सवलत: तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या जागा भरण्यात मदत व्हावी म्हणून चेक इनच्या आधी 1 ते 28 दिवस यादरम्यान कधीही केलेल्या बुकिंग्जसाठी तुमचे भाडे कमी करा.
- साप्ताहिक आणि मासिक सवलती: तुमचे कॅलेंडर लवकर भरण्यात आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करण्यात मदत व्हावी यासाठी दीर्घकालीन वास्तव्यांवर सवलत ऑफर करा.
“साप्ताहिक आणि मासिक सवलती दिल्यामुळे मला दीर्घकाळ वास्तव्ये मिळतात,” डॅनियल हे, कॅनरी आयलँड्स, स्पेन येथील सुपरहोस्ट सांगतात. “सहसा गेस्ट्स एका आठवड्यासाठी बुकिंग करतात, आणि हा एक छोटा विजय आहे.”
गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर नवीन लिस्टिंग प्रमोशनसाठी आणि 10% किंवा त्याहून अधिकच्या साप्ताहिक आणि मासिक सवलतींसाठी एक विशेष कॉलआऊट दिसतो.
तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगवेगळे असू शकतात.
होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.