तुमच्या पहिल्या Airbnb गेस्ट्सचे स्वागत कसे करावे
तुमच्या पहिल्या गेस्ट्ससाठी कशी तयारी करावी याबद्दल तुम्हाला प्रश्न असू शकतात. सुरळीत अनुभव तयार करण्यासाठी येथे काही सल्ले दिले आहेत.
एक साधी चेक इन प्रक्रिया द्या
एक सोपी आणि विश्वसनीय प्रक्रिया सेट अप करा. तुमच्या लिस्टिंगच्या आगमन गाईडमध्ये तुमच्या जागेवर येण्यासाठी दिशानिर्देश, चेक इन पद्धत आणि स्टेप-बाय-स्टेप चेक इन सूचना जोडा. बरेच गेस्ट्स स्वतःहून चेक इनची सोय पसंत करतात, ज्याद्वारे तुम्ही तिथे नसलात तरी त्यांना आत जाता येतेे.
गेस्ट्स त्यांच्या ट्रिप तपशिलांमध्ये, त्यांनी चेक इन करण्यापूर्वी 48 तास आधी किंवा तुमच्याकडे सोयीस्कर कॅन्सलेशन धोरण असल्यास 24 तास आधी तुमच्या चेक इन सूचना ॲक्सेस करू शकतात.
गेस्टच्या गरजा काय असतील याचा अंदाज घ्या
प्रत्येक गेस्ट वेगळा असतो, पण बहुतेकांना काही आयटम्सचा आणि माहितीचा ॲक्सेस असणे अपेक्षित असते. आरामदायी वास्तव्य पुरवण्यासाठी या पायऱ्या वापरा.
मूलभूत गोष्टींचा साठा करा. यामध्ये टॉवेल्स, लिनन्स, उशा, साबण, टॉयलेट पेपर यांचा समावेश होतो.
स्वत: उपलब्ध रहा. तुम्ही समस्यांचे त्वरित निराकरण कसे कराल, याची योजना तयार करा आणि काही समस्या आल्यास गेस्ट्स तुमच्याशी संपर्क साधू शकतात, याची त्यांना आठवण करून द्या.
सुविधा सूची जोडा. महत्त्वाची माहिती द्या, उदा. इंटरनेट कसे ॲक्सेस करायचे आणि अप्लायन्सेस कशी वापरायची. गेस्ट्सना सहजपणे सापडेल अशी एक छापील आवृत्ती ठेवा.
- गाईडबुक जोडा. खाण्यापिण्याच्या, शॉपिंगच्या, साईटसीईंगच्या आणि निसर्गरम्य ठिकाणांचा अनुभव घेण्याबद्दल तुमच्या स्थानिक टिप्स शेअर करा.
लवकर आणि वारंवार संवाद साधा
तुम्ही गेस्ट्सशी केलेला प्रत्येक संवाद म्हणजे त्यांच्या अपेक्षा सेट करण्याची आणि तुम्हाला त्यांच्या गरजांची काळजी आहे, हे दाखवण्याची संधी असते.
स्वागतार्ह वातावरण तयार करा. प्रत्येक गेस्टला तुमच्या जागेत आरामदायक वाटण्यासाठी मदत करण्याकरता सर्वसमावेशक पद्धतींना प्राधान्य द्या. गेस्ट्सना त्यांच्या घरच्यासारखे वातावरण देण्यासाठी तुम्ही काय देऊ शकता, विचारण्यापासून सुरुवात करा.
समजून घ्या. गेस्ट्सच्या दृष्टिकोनातून प्रत्येक परिस्थितीकडे पहाण्याचा प्रयत्न करा.
त्वरित प्रतिसाद द्या. चांगला प्रतिसाद दर असल्यास तुमची लिस्टिंग Airbnb वर गेस्ट्सच्या सर्चेसमध्ये अधिक वर दिसण्यास मदत होते. पटकन संवाद साधण्यासाठी ॲप वापरा आणि चेक इन सारख्या महत्त्वाच्या क्षणी उपयुक्त माहिती देण्यासाठी शेड्युल केलेले मेसेजेस सेट अप करा.
विशिष्ट वेळी शेड्युलिंग करण्याचा विचार करण्याकरता येथे मेसेजेसचे काही नमुने दिले आहेत. ही उदाहरणे शॉर्टकोड्स, प्लेसहोल्डर्स वापरतात जे रिझर्व्हेशन, लिस्टिंग आणि गेस्ट्सचे तपशील आपोआप भरतात. ड्रॉप-डाऊन मेनूमधून ते इन्सर्ट करा, कारण तुम्ही स्वतः टाईप केल्यास ते काम करणार नाहीत.
तुमची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा
गेस्ट्सना आल्यावर स्वच्छ जागा हवी असते. एक नित्यक्रम तयार करा ज्यामध्ये सर्व पृष्ठभाग, जमीन आणि कपडे साफ केले जाते.
कुठे डाग, घाण आणि केस आहेत का ते बघा. सहसा बेडच्या खाली, ड्रॉवरच्या आत आणि खिडकीच्या कव्हरिंग्सकडे दुर्लक्ष केले जाते.
सौम्य सुगंध निवडा. कोणत्याही प्रकारच्या तीव्र सुगंधामुळे गेस्ट्सना त्रास होऊ शकतो. स्वच्छता करताना खिडक्या उघडा आणि सौम्य, बहुउद्देशीय जंतुनाशके वापरा.
- वैयक्तिक वस्तू काढून टाका किंवा स्टोअर करा. यामुळे तुमची जागा अधिक आकर्षक आणि सुटसुटीत वाटते.
रिव्ह्यूसाठी विचारा आणि रिव्ह्यू द्या
चेक आऊटनंतर एकमेकांचा रिव्ह्यू करण्यासाठी तुमच्याकडे आणि तुमच्या गेस्ट्सकडे 14 दिवसांचा वेळ असतो. रिव्ह्यूज तोपर्यंत लपवले जातात जोपर्यंत तुम्ही आणि बुकिंग करणारे गेस्ट आपआपला रिव्ह्यू सबमिट करत नाहीत किंवा 14 दिवसांचा रिव्ह्यूचा कालावधी संपत नाही. गेस्ट्स त्यांच्या एकूण अनुभवासाठी आणि सहा सब-कॅटेगरीजसाठी स्टार रेटिंग्ज देखील देऊ शकतात. त्या सबकॅटेगरीज आहेत: स्वच्छता, अचूकता, चेक इन, कम्युनिकेशन, लोकेशन आणि व्हॅल्यू.
तुमचे पहिले काही रिव्ह्यूज खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला तीन रिव्ह्यूज मिळाल्यानंतर तुमचे एकूण रेटिंग तुमच्या लिस्टिंगवर दिसेल आणि सर्च रिझल्ट्स मध्ये तुमच्या लिस्टिंगच्या रँकवर या रेटिंगचा परिणाम होऊ शकतो. चेक आऊटच्या दिवशी मेसेज शेड्युल करा आणि गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्याचा रिव्ह्यू देण्यास सांगा.
रिव्ह्यूज करताना प्रामाणिक आणि आदरपूर्ण रहा आणि प्रत्येक गेस्टचे मूल्यांकन करण्यासाठी समान मानक वापरा. रिव्ह्यू प्रक्रिया गेस्ट्स आणि होस्ट्स यांच्यात विश्वास निर्माण करण्यात मदत करते.
लर्निंग सिरीज: पहिली होस्टिंग
या लेखात दिलेली माहिती पब्लिकेशन नंतर कदाचित बदललेली असू शकते.