Airbnb होस्ट ब्रेंडा सेवानिवृत्तीचे उत्पन्न कसे कमावते

होस्टिंगमुळे एक सेवानिवृत्त महिला त्यांचे कौटुंबिक घर कायम ठेऊन स्वतःचा खर्च भागवू शकत आहेत.
Airbnb यांच्याद्वारे 1 नोव्हें, 2018 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
7 जाने, 2022 रोजी अपडेट केले

Airbnb होस्ट ब्रेंडा न्यू ऑर्लीयन्सच्या जेंटली परिसरात त्यांच्या दुसऱ्या घरी गेस्ट्सचे हार्दिक स्वागत करतात. ब्रेन्डाचा जन्म न्यू ऑर्लीयन्समध्ये झाला आणि तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या, जगभरातील प्रवाशांना आपले घर आणि शहर दाखवण्यात त्यांना अभिमान वाटतो. त्या म्हणतात, “माझ्या आयुष्याची 66 वर्ष मी इथे राहिली आहे आणि 32 वर्षांपासून ही प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे.” "मी न्यू ऑर्लीयन्समधील सरकारी शाळांमध्ये शिकले आणि लोकांना माझे शहर दाखवण्यात मला आनंद होतो.” जेव्हा ब्रेन्डा त्यांच्या दुसऱ्या पतीबरोबर राहायला गेल्या, तेव्हा इतकी वर्ष जिथे प्रेमाने संसार केला ते पहिले घर त्यांना विकावे लागले नाही. होस्टिंगमुळे त्यांना घर कायम ठेवता आले आणि सेवानिवृत्तीदरम्यान स्वतःचा खर्च भागवता आला आहे.

ब्रेन्डाची मुलगी स्पेनमध्ये राहायला जात होती आणि ब्रेन्डा तिला शिफ्ट होण्यास मदत करत असताना त्यांना Airbnb बद्दल माहीत झाले. “आम्ही एका महिलेच्या घरी राहिलो होतो आणि त्या आमच्याशी खूप चांगल्या वागल्या. त्यांनी माझ्या मुलीला तिच्या निवासस्थानी हलवण्यास देखील मदत केली. हा सर्वात मोठा अनुभव होता आणि मी विचार केला की ‘मी कुणासाठी तरी हे करू शकते.'” आणि आता त्या तेच करत आहेत. जेव्हा गेस्ट्स ब्रेन्डाकडे येतात तेव्हा त्यांना स्नॅक्स आणि शिफारसी देऊन त्या त्यांचे स्वागत करतात. कुठे जावे आणि संपूर्ण शहराचा आनंद कसा घ्यावा हे त्यांना ठाऊक आहे की नाही याची त्या खात्री करतात. “मी त्यांना माझे छोटेखाणी ‘मिस ब्रेन्डा’ भाषण देते.”& nbsp;माझ्या गेस्ट्सपैकी एकाने असे सांगितले की तो त्याच्या आवडत्या काकूच्या घरी राहत आहेत असे त्याला वाटले.”

ब्रेन्डाला गेस्ट्ससह स्थानिक स्पॉट्सची माहिती शेअर करणे आवडते आणि त्या त्यांना न्यू ऑर्लीयन्सच्या अशा ठिकाणी पाठवतात ज्या पर्यटकांच्या ठराविक अनुभवाचा भाग नसतो. “मी नेहमीच लोकांना लेकफ्रंट एयरपोर्टला जाण्याचा सल्ला देते जिथे खासगी विमान येतात. मेसिना नावाचे एक छानसे सुंदर छोटे रेस्टॉरंट आहे—तिथे तुम्हाला जगात सापडणार नाही असे चवदार पॅनकेक्स मिळतात. दोन ऑर्डर केले तरी पोट भरून गच्च होईल, इतक्या त्या प्लेटभर मोठ्या असतात,” ब्रेन्डा हसून सांगतात. “आणि मग मी सॅसफ्रासची शिफारस करते, जिथे तुम्हाला न्यू ऑर्लीयन्समधील सर्वात अस्सल गंबो मिळतो. गम्बोला लागणाऱ्या सामग्रीची जुळवाजुळव करण्यापासून सुरुवात करून ते दररोज पारंपारिक गम्बो बनवतात.

ब्रेन्डा त्यांच्या Airbnb मध्ये राहून बचत केलेल्या पैशांसह गेस्ट्स स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देत आहेत याची खात्री करतात. “जे लोक माझ्याबरोबर राहतात, त्यांच्याकडे डाउनटाउनच्या हॉटेलमध्ये तीन दिवस राहण्यासाठी $600 नसतील परंतु त्यांच्याकडे जे आहे ते सर्व घेऊन ते न्यू ऑर्लीयन्समध्ये खर्च करतील. त्यामुळे [गेस्ट्स] स्टोअरमध्ये त्यांचे पैसे खर्च करतात आणि आमच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावतात.”

ब्रेन्डासाठी, होस्टिंग हा त्यांचे घर टिकवून ठेवण्याचा आणि खर्च भागवण्याचा एक मार्ग आहे. एका दुर्घटनेत झालेल्या गंभीर दुखापतीनंतर ब्रेन्डाला करिअर सोडून लवकरच निवृत्त व्हावे लागले. “माझ्या मानेवर शस्त्रक्रिया झाली होती आणि मी आता काम करू शकत नव्हते.” कॅटरीना चक्रीवादळानंतर त्यांचे विम्याचे दर आणि प्रॉपर्टी कर दुप्पट झाले. “पाणी बिले, वीज बिले, विमा पेमेंट्स आणि प्रॉपर्टी कर भरल्यानंतर तुमच्याकडे काय शिल्लक राहते? तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंब, हीच तुमची संपत्ती म्हणून उरतात.

हे मोठे खर्च उचलण्यासाठी होस्टिंग उत्पन्नाचे महत्त्वपूर्ण स्त्रोत म्हणून राहिले आहे. “ सामाजिक सुरक्षा सोडून [होस्टिंग] माझ्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे.” ब्रेन्डाला भीती वाटते की शहर प्रशासन हे सर्व त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय घेऊ शकेल. जर शहर प्रशासनाने निवासी भागातील पूर्ण घरांसाठी अल्प मुदतीच्या भाड्याच्या परवान्यावर कायमस्वरूपी बंदी घातली तर “हे खूप खेदजनक असेल आणि मला तोटा होईल. तसेच, मला ही चिंता आहे की हे शहर अल्पकालीन रेंटल्समधून मिळणारे उत्पन्न, कोणत्या मार्गाने आणि कसे निर्माण करेल. त्यामुळे माझ्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. या सर्व गोष्टींचा खूप जास्त त्रास होतो.”

अखेरीस, ब्रेन्डा आशा करतात की शहर प्रशासन त्यांच्यासारख्या तात्पुरत्या अल्प-मुदतीचे रेंटल परवाने किंवा दुसरे घर असलेल्या लोकांना त्यांच्या संपूर्ण घराच्या लिस्टिंगचे होस्टिंग सुरू ठेवण्याची परवानगी देणारा सुज्ञ निर्णय घेईल. “मला आशा आहे की ते वैयक्तिक घरमालकांच्या बाजूने निर्णय घेतील, जे माझ्यासारखे कायमचे येथे राहिले आहेत.” अल्प-मुदतीच्या रेंटलच्या नियमांबाबत निष्पक्ष आणि सुज्ञ निर्णय झाला तर, ब्रेन्डा खर्च चालवण्यासाठी योग्य उत्पन्न मिळवणे सुरू ठेवू शकतात आणि त्यांच्या सुंदर शहराच्या उत्कृष्ट राजदूत बनू शकतात.

या लेखात दिलेली माहिती पब्लिकेशन झाल्यानंतर कदाचित बदलली असेल.

Airbnb
1 नोव्हें, 2018
हे उपयुक्त ठरले का?