हाताने बांधलेल्या घरामुळे दोन सुपरहोस्ट्स जवळजवळ अर्ध निवृत्ती घेऊन कसे मजेत आयुष्य घालवत आहेत
सुपरहोस्ट्स मेरी आणि बस्टर रेनॉल्ड्ससाठी, आदरातिथ्य आणि घर निर्माण करणे हे गेली 40 वर्षे त्यांच्या जीवनाचा भाग आहेत. “ही एक जीवनशैली आहे,” बस्टर म्हणाला. तो आणि त्यांची पत्नी मेरी 1980 पासून त्यांचे घर स्वतःच्या हातांनी बांधत आहेत आणि ते गेस्ट्ससह शेअर करत आहेत. “इतके नवनवीन लोक तुमच्याकडे सतत येत असल्यामुळे तुम्ही तुमच्या घराकडे पुन्हा नव्या नजरेने पाहू शकता. जे काही घडलं आहे त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो.” दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गपासून बसने 30 मिनिटांच्या अंतरावर, आधी जिथे पक्षी अभयारण्य होते अशा जागी असलेल्या ह्या प्रॉपर्टीमध्ये तीन गेस्ट रूम्स असलेले मुख्य घर तसेच दोन गेस्ट कॉटेज आहेत. आणि या जोडप्याने ते शेवटी “काल रात्री!” पूर्ण केले. मेरी हसते, “मी नवीन बाथरूमच्या टायलिंगचे काम अक्षरशः आता पूर्ण केले.”
मेरी आणि बस्टर यांनी टायलिंगच्या कामातून थोडी उसंत घेतली आणि त्यांनी होस्टिंग कसे सुरू केले, त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर कसा आधार मिळाला आणि 3000 मैल दूर, नायजेरियात त्यांच्या घरासारखेच दुसरे घर का असू शकते याबद्दल सांगितले.
स्वतःच्या हाताने घर बांधणे हे प्रचंड मोठे काम वाटते. तुम्ही दोघांनी या पूर्वी कन्स्ट्रक्शनमध्ये काम केले होता का?
मेरी: “खरे सांगायचे तर, नाही. बस्टर एक सेवानिवृत्त सिनेमॅटोग्राफर आहे, आणि मी माझे जवळजवळ संपूर्ण आयुष्य शिक्षणक्षेत्रात घालवले. आमचा एक घरमालक होता जो कॉटेजीस बांधायचा आणि ते इतके खराब बांधले गेलेले होते की आम्हाला वाटले की जर तो हे करू शकला तर... आम्ही ते अधिक चांगले करू शकू. त्यामुळे बस्टरने एक भिंत बांधण्याचा कोर्स केला आणि मी एक प्लंबिंगचे पुस्तक विकत घेतले.”
ती तुमची ट्रेनिंग आहे का?
बस्टर: (हसत) आमच्याकडे त्यावेळी घर विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. आम्हाला हव्या असलेल्या जमिनीच्या तुकड्यावर आम्हाला हवे असलेले घर मिळवण्याचा हा एकमेव मार्ग होता. म्हणून आम्ही 3,000 रँड ($218 USD) सह सुरुवात केली आणि तेथून पुढची वाटचाल केली. प्रत्येक वीकएंड, प्रत्येक मोकळा मिनिट, प्रत्येक उपलब्ध पैसा या घरासाठी खर्ची घातला.”
मेरी: “बस्टरने स्ट्रक्चर तयार केले, आणि मी आतल्या सर्व गोष्टी केल्या. बीम्स स्थानिक गमट्रीजपासून बनवले आहेत आणि इतर बरेचसे लाकूड जोहान्सबर्गमधील पहिली सोन्याची खाण असलेल्या क्राउन माइन्स स्क्रॅपयार्डमधून आणले आहे. आम्ही बाहेरच्यांना फक्त एका गोष्टीचं कंत्राट दिलं, ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि शाकारलेल्या छताचं, कारण ते खूपच कौशल्याचं काम होतं. शाकारणे ही एक पारंपरिक हस्तकला आहे, त्यामुळे आम्ही त्या कामासाठी स्थानिक कुशल कारागिरांना नेमलं आणि त्यांच्या बायकांनी ते गवत स्वतःच्या हातांनी कापलं. मायकेलअँजेलोने सिस्टीन चॅपेल बनवण्याच्या ध्यासात त्याचे आयुष्य शिडीवर चढण्या-उतरण्यात घालवलं, आमचंसुद्धा तसंच आहे. हे एखाद्या कलाकृतीमध्ये जगण्यासारखे आहे.”
गप्पा मारणे हा गेस्ट्सशी कनेक्ट करण्याचा एक चांगला मार्ग बनला आहे का?
बस्टर: “हो, नक्कीच. हे घर ओपन-प्लॅन असलेले आहे, हा शब्द 1980 मध्ये शब्दकोशातही नव्हता. आता कुठे ही संकल्पना आलेली दिसते! गेस्ट्स किचनच्या दारातून आत येतात आणि [घराशी तसेच] आम्ही त्यांना नाश्त्यासाठी काय देत आहोत, त्याच्याशी लगेच कनेक्ट होतात: घरच्या फळांपासून घरी बनवलेले जाम्स, लोणची आणि चटणी तसेच होम-बेक केलेले ग्रॅनोला आणि मफिन्स. विविध प्रकारचे ब्रेड्स, भरपूर कॉफी आणि दक्षिण आफ्रिकेची खासियत असलेला रोईबोस चहा नेहमी उपलब्ध असतो. आम्ही नाश्त्याच्या टेबलावर गप्पा मारत कमीतकमी एक तास घालवतो ”.
मेरी: “नायजेरियातून एक ग्रुप आमच्याकडे आला होता ज्यांनी एका पंचतारांकित हॉटेलची अपेक्षा केली होती. जेव्हा ते आत आले त्यांचे चेहरे उतरले, पण अनुभवाचा आनंद घेणे सुरू करायला त्यांना फार वेळ लागला नाही. जेव्हा ते परतले, तेव्हा एकांनी आमच्या घराच्या योजनांची एक प्रत मागितली कारण त्यांना आमच्यासारखे घर बांधायचे होते. तर नायजेरियात कुठेतरी आमच्या घरासारखेच घर असू शकतो.
ही सर्वात चांगली प्रशंसा वाटते! तुम्ही होस्टिंगची सुरुवात कशी केली?
मेरी: “AFS—अमेरिकन फील्ड सर्व्हिस, या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंज कार्यक्रमाद्वारे. 1984 मध्ये, आम्ही अमेरिकेची एक छान ट्रिप केली आणि आम्ही परतल्यावर, AFS होस्ट कुटुंबे शोधत होते. तेव्हापासून, आम्ही सात विद्यार्थ्यांना होस्ट केले आहे, प्रत्येकी एक वर्षासाठी आणि ते जगाच्या वेगवेगळ्या भागातील होते. होस्टिंग आमच्यासाठी एक जीवनशैली बनली आहे. आम्ही मुळात आमच्या पालकांसाठी आणि नंतर भाड्याने देण्यासाठी दोन कॉटेजेसदेखील वाढवल्या. 2017 मध्ये, आमची मुलगी कॅटीने आम्हाला Airbnb मध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आणि आम्हाला अगदी लगेचच बुकिंग्ज मिळायला सुरुवात झाली.”
होस्टिंगमधले तुम्हाला सर्वात जास्त काय आवडते?
मेरी: “लोक. आम्हाला नेहमीच येथे लोकांनी येणे, वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेणे आणि दक्षिण आफ्रिकेत लोक का येतात याबद्दल समजून घेणे आवडते. शिकागोमधील आफ्रिकन अमेरिकन लोकांचा एक छान ग्रुप होता, ज्यांना त्यांची मुळे शोधायची होती. आम्ही त्यांना अशा ठिकाणी पाठवले जिथे आम्हाला वाटले की त्यांना आफ्रिकेतील अस्सल अनुभवांचा आनंद घेता येईल. आणि त्यांना खूप आनंद झाला आणि या संस्कृतीशी त्यांना खूप जवळीक वाटली.”
बस्टर: “एक अर्जेंटिनियन माणूस आमच्या कंपोस्टिंग सिस्टममुळे इतका भारावून गेला की त्याला मायदेशी परत गेल्यावर कंपोस्टचा व्यवसाय सुरू करायचा होता. अशा कहाण्या आम्हाला आमचे काम सुरू ठेवायला प्रेरित करतात.”
मेरी: “याव्यतिरिक्त, बस्टरला लवकर सेवानिवृत्ती घ्यावी लागली आणि मी अर्ध-सेवानिवृत्त असल्याने या पूरक उत्पन्नामुळे खूप फरक पडला आहे. यामुळे आम्हाला आमच्याच घरात राहणे शक्य झाले. आम्ही दोन घरगुती कामगार आणि एका माळ्याला देखील कामावर ठेवले आहे. आम्हाला Airbnb चे उत्पन्न नसते तर त्यांना देखील त्यांची नोकरी गमवावी लागली असती. नफा किंवा भरपूर पैसे कमावणे हा आमचा हेतू नाही—अजिबात नाही—परंतु केवळ आमचे घर टिकवून ठेवावे आणि नेली, एलिझाबेथ आणि मिषेक यांना नोकरीवर ठेवावे एवढेच वाटते.
तुम्हाला होस्ट्सना काही सल्ला द्यायचा आहे का?
मेरी: “तुम्ही जे करत आहात त्याचा तुम्हाला आनंद घ्यावा लागेल–नाहीतर ते करण्यात काही अर्थ नाही. आम्ही त्याचा आनंद घेतो. आणि जेव्हा लोक गोष्टींची प्रशंसा करतात, तेव्हा तुम्हाला कळते तुम्ही ते योग्यप्रकारे करत आहात.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.