कामात शहाणपण: चिप कॉनली यांची मुलाखत
ज्ञान व काम यांच्यातील संबंध आणि Airbnb होस्ट कम्युनिटीने त्यांच्या करिअरला आकार देण्यास कशी मदत केली याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी चिप कॉनलीचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. चिप दीर्घकाळापासून हॉस्पिटॅलिटी उद्योजक, Airbnb धोरणात्मक सल्लागार, लेखक आणि होस्ट चॅम्पियन आहेत. या होस्ट समुदायामध्ये त्यांच्या गुंतवणुकीची मुळे खोलवर रुजलेली आहेत आणि त्यांचे योगदान दीर्घकाळ टिकून राहील यात शंका नाही. त्यांचे नवीन पुस्तक, Wisdom@Work: The Making of a Modern Elder, मध्ये त्यांनी वृध्द होण्याच्या कल्पनेची नवीन व्याख्या मांडली आहे. त्यांच्या मते वृध्द होणे म्हणजे ज्ञान शेअर करण्याची आणि सतत नवे शिकत राहण्याची संधी होय.
प्रश्न: तुमची अनेक वर्षांपासून आदरातिथ्य आणि Airbnb होस्ट कम्युनिटीची मदत करत आला आहात. तुमच्या नवीन पुस्तकात तुम्ही जे ज्ञान शेअर केले त्यासाठी तुम्हाला या कामातून कशी प्रेरणा मिळाली?
चिप कॉनली: “सर्व प्रथम मी हे सांगू इच्छितो की मी आमच्या होस्ट कम्युनिटीला मिस करतो. कंपनीमध्ये माझ्या चार वर्षांच्या लीडरशीपच्या भूमिकेत असताना, मी जगभर प्रवास करत होतो आणि सोबतच आमच्या होस्ट्सकडून शिकत होतो. ते मला खूप आवडायचे. एक जुनी म्हण आहे, ‘ज्ञान बोलते, पण शहाणपण ऐकते,’ आणि मला आमची होस्ट कम्युनिटी ही कुशल लिसनर आहे पण संपूर्ण कम्युनिटीसाठी उल्लेखनीय योगदान देणारी आहे, हे लक्षात आले. ‘विस्डम ऑफ क्राऊड’ ने (म्हणजे जगभरात पसरलेल्या आमच्या होस्ट कम्युनिटीने) मला बरेच काही शिकवले. त्यांचे काही मत आणि दृष्टिकोन माझ्या नवीन पुस्तकात मिळेल. माझे पुस्तक तंत्रज्ञानाच्या मागे सुसाट धावत सुटलेल्या या जगात मुल्य आधारित ज्ञान का गरजेचे आहे याचे सविस्तर वर्णन करते.”
प्रश्न: तुमच्या ज्ञानाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून होस्ट्स त्यांच्या स्वतःच्या होस्टिंग प्रवासामध्ये काय शिकू शकतात?
कॉनली: “कंपनीमधील माझ्या साडेपाच वर्षांच्या काळात (आणि सल्लागार म्हणून गेले दीड वर्ष) Airbnb मधील सरासरी कर्मचाऱ्यांच्या वयाच्या दुप्पट असणे रोमांचकारी आहे. आमच्या होस्ट कम्युनिटीसाठी आणि विशेषकरून जे वयाने थोडे मोठे आहेत त्यांच्यासाठी हितचिंतक म्हणून मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. ब्रायन आणि त्याचे सह-संस्थापकाना हे पाहून खरोखरच आनंद होतो की, 50 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या होस्ट्सना इतर कोणत्याही वयाच्या होस्ट्सच्या तुलनेत Airbnb वर गेस्टना संतुष्ट करण्याच्याबाबतीत अधिक स्कोअर मिळतो. याची काही कारणे असू शकतात: त्यांच्या होस्टिंग स्किल्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक वेळ देणे, वयानुसार वाढणारी आपली भावनिक बुद्धिमत्ता (हे उत्कृष्ट होस्ट्सचे मुख्य वैशिष्ट्य आहे) आणि कदाचित सेवानिवृत्ती उत्पन्न निर्माण करण्याचे टूल म्हणून होस्टिंगकडे अधिक लक्ष देणे. कोणत्याही एका वयोगटाची शहाणपणावर मक्तेदारी आहे असे मला नाही वाटत. पण शहाणपण एक गुणवत्ता आहे जी जाणीवपूर्वक आचरणात आणून हळूहळू जोपासली जाऊ शकते आणि कालांतराने त्याचा लाभ घेता येतो.”
प्रश्न: तुमच्या विशीत, तिशीत, चाळीशीत आणि त्यानंतरच्या काळात तुमच्यासाठी आदरातिथ्याची संकल्पना कशी बदलली आहे किंवा बदलली नाही?
कॉलोनी: “मी माझ्या मध्य-विशीत (1987) Joie de Vivre Hospitality सुरू केली तेव्हा ही कंपनी अमेरिकेमधील पहिल्या बुटीक हॉटेल कंपन्यांपैकी एक होती. आम्ही प्रवाशांच्या वाढत्या संख्येला अधिक वैयक्तिकृत, अधिक स्थानीय हॉटेल अनुभव देत होतो. विशेष म्हणजे, आम्ही आमच्या फ्रंट-डेस्क एजंट्सचे टायटल 'क्लर्क' वरून 'होस्ट्स' असे बदलले होते, त्यामुळे होस्टिंगची कल्पना माझ्या रक्तात 32 वर्षांपासून आहे. 24 वर्ष मी त्या कंपनीचा CEO होतो, आम्ही 52 बुटीक हॉटेल्स तयार केली आणि हे स्पष्ट झाले की, जगभरातल्या मोठी हॉटेल शृंखलांना बुटीक हॉटेल्स सारखे दिसणे सुरू करायचे होते (ते डिझाईनकडे अधिक लक्ष देऊ लागले, उत्तम रेस्टॉरंट आणि बार सेवा पुरवू लागले, स्थानिक अनुभवांवर अधिक लक्ष केंद्रित करू लागले इ.). मी Airbnb मध्ये ग्लोबल हॉस्पिटॅलिटी आणि स्ट्रॅटेजीचे प्रमुख म्हणून सामील झालो, तेव्हा मला ही नवीन होम-शेअरिंगची लाट म्हणजे बुटीक हॉटेलची नवकल्पनाच मोठ्या प्रमाणावर लागू होत असलेली जाणवली. तंत्रज्ञानामुळे Airbnb ला स्थानिक आदरातिथ्याचा हा विचार जागतिक स्तरावर घेऊन जाता आला. साडेपाच वर्षांपूर्वी ब्रायन चेस्की यांनी कंपनीत जॉईन होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी विचारले की, ‘तुम्ही आदरातिथ्याला मुख्यधारेत आणायला कोणती पावले उचलणार?’ आणि मला वाटते की, Airbnb आणि आमच्या अभूतपूर्व होस्ट कम्युनिटीने हेच केले आहे.”
प्रश्नः नवीन होस्ट जेव्हा होस्टिंग सुरू करतात तेव्हा तुम्ही कोणता सल्ला द्याल?
कॉनली: “जगभरातील आमच्या सर्वोत्तम होस्ट्समध्ये सामान्यतः आढळणारी गुणवत्ता म्हणजे अतिशय सुनियोजित असणे आणि अतिशय स्वागतार्ह व समानुभूतीपूर्ण असण्याचे संयोजन आहे. ते भिन्न गुण आहेत आणि काही होस्ट्सकडे एखादा गुण इतरांपेक्षा जास्त चांगला असू शकतो, परंतु ज्यांच्याकडे या दोन्ही गुणांचे प्राविण्य असते—कधीकधी एखादे जोडपे हे वेगवेगळे गुण एकत्र आणतात—ते खूप यशस्वी होतील.”
प्रश्न: तुम्ही पुढे काय करणार आहात, चिप? पुढच्या सीझनमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे?
कॉनली: “मी ब्रायन आणि त्यांच्या सिनियर टीमचा स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझर म्हणून काम करणे सुरू ठेवेन. मी Wisdom@Work लिहितो ज्यामुळे मला हे पाहण्यास मदत झाली की मध्यमवयीन आणि त्याहून अधिक वयाच्या किती लोकांना त्यांच्या आयुष्याचा आणि कारकीर्दीचा पुनर्विचार करण्याची इच्छा असते परंतु अशा लोकांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याकडे किती कमी संसाधने आहेत. म्हणून, मी जगातील पहिली मिडलाइफ विस्डम शाळा तयार केली आहे, जिचे नाव आहे मॉडर्न एल्डर अकॅडमी आणि ही शाळा विद्यार्थ्याना नवीन आजीवन अनुभव मिळवून देण्यासाठी जागा आणि साधने प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. हा मेक्सिकोच्या, दक्षिणेकडील बाहामधील कॅबो सॅन लुकासच्या उत्तरेस एका तासाच्या अंतरावर असलेला बीचफ्रंट कॅम्पस आहे, म्हणून मी हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये पुन्हा पाऊल ठेवले. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक आमच्यासोबत सामील होण्यासाठी येत आहेत.”
चिपचे पुस्तक आणि मॉडर्न एल्डर अकॅडमीबद्दल अधिक वाचण्यासाठी, त्याच्या वेबसाइटला भेट द्या.
या लेखात दिलेली माहिती प्रकाशनानंतर बदलली असल्याची शक्यता असू शकते.