सुपरहोस्ट कसे बनावे

अधिक बुकिंग्ज आकर्षित करा, तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यात मदत करा आणि 5-स्टार वास्तव्ये होस्ट करा.
Airbnb यांच्याद्वारे 6 जाने, 2025 रोजी
6 मिनिटांचा व्हिडिओ
19 मार्च, 2025 रोजी अपडेट केले

Airbnb चा सुपरहोस्ट प्रोग्रॅम आमच्या टॉप रेटिंग असलेल्या, सर्वात अनुभवी होस्ट्सना सन्मानित करतो.

आम्ही त्यांचे विशेष आदरातिथ्य साजरे करून रिवॉर्ड म्हणून त्यांच्या लिस्टिंगवर एक बॅज देतो, ज्यामुळे अधिक बुकिंग्ज मिळण्यात मदत होऊ शकते. काही 59% गेस्ट्स म्हणतात की सुपरहोस्ट स्टेटसमुळे त्यांच्या निवासस्थानाच्या गुणवत्तेबाबत त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सुपरहोस्ट्स नसलेल्या होस्ट्सपेक्षा ते 60% अधिक कमाई करतात.* तसेच सुपरहोस्ट्सना स्वतंत्र कम्युनिटी सपोर्टचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो, विशेष इव्हेंट्ससाठी आमंत्रणे, ट्रॅव्हल कूपन्स मिळतात आणि सर्च रिझल्ट्समध्ये बूस्ट मिळतो.

13 लाखांहून अधिक होस्ट्स सुपरहोस्ट्स बनले आहेत—आणि तुम्हीसुद्धा तुमची बुकिंग्ज जास्तीत जास्त वाढवून आणि उत्कृष्ट आदरातिथ्य देऊन सुपरहोस्ट बनू शकता.** तुमच्या कॅलेंडरमध्ये काही छोटे बदल करणे, तुमची लिस्टिंग रिफ्रेश करणे आणि कम्युनिकेशनची अधिक काळजी घेणे यामुळे मोठा फरक पडू शकतो.

आवश्यकतांची पूर्तता करा

सुपरहोस्ट हे अकाऊंट सुस्थितीत असलेल्या लिस्टिंगचे मालक असणे आवश्यक आहे आणि मागील 365 दिवसांमध्ये त्यांनी हे चार निकष पूर्ण केले पाहिजेत:

  • पर्याप्त बुकिंग्ज मिळवा. कमीतकमी 10 रिझर्व्हेशन्स होस्ट करा किंवा अशी तीन रिझर्व्हेशन्स होस्ट करा, ज्यात तीन वास्तव्यांमध्ये एकूण किमान 100 रात्री असतील.
  • कॅन्सलेशन्स टाळा. अडथळा आणणाऱ्या प्रमुख घटना किंवा इतर वैध कारणे यांमुळे होणार्‍या कॅन्सलेशन्सचा अपवाद वगळता 1% पेक्षा कमी कॅन्सलेशन दर कायम राखा.
  • गेस्ट्सना प्रतिसाद द्या. 90% किंवा त्याहून अधिक प्रतिसाद दर कायम राखा. तुमचा प्रतिसाद दर हा तुम्ही 24 तासांच्या आत प्रतिसाद दिलेल्या नवीन गेस्ट चौकशांची टक्केवारी आहे.
  • आदरातिथ्याला प्राधान्य द्या. एकंदर रेटिंग 4.8 किंवा त्याहून अधिक कायम राखा.

स्पष्टपणे आणि झटपट प्रतिसाद देणे, कॅन्सलेशन्स टाळणे आणि आदरातिथ्याला प्राधान्य देणे हे देखील तुमच्या घराला सर्च रिझल्ट्समध्ये नजरेत भरण्यास आणि तुमची कमाई वाढवण्यास मदत करू शकते.

या निकषांची पूर्तता करण्यात आणि सुपरहोस्ट स्टेटसचा लाभ घेण्यास सुरुवात करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही सल्ले दिले आहेत.

तुमचे कॅलेंडर अप टू डेट ठेवा

तुमच्या कॅलेंडरमध्ये अधिक रात्री खुल्या केल्याने तुमची लिस्टिंग अधिक सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यात मदत होते आणि सुपरहोस्ट निकष पूर्ण करण्यासाठी पुरेशी वास्तव्ये होस्ट करण्याच्या तुमच्या संधी वाढतात.

तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरवर जा आणि ब्लॉक केलेल्या रात्री पहा, ज्या राखाडी रंगात दिसतात. तुम्ही होस्ट करू शकता अशा कोणत्याही ब्लॉक केलेल्या रात्री खुल्या करा.

अल्पकालीन वास्तव्यांना परवानगी दिल्याने देखील तुमची लिस्टिंग अधिक सर्च रिझल्ट्समध्ये दिसू शकते. तुम्ही आठवड्याच्या दिवसानुसार तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कस्टमाईझ करू शकता. उदाहरणार्थ, जर आठवड्याच्या शेवटी गेस्ट्सची मागणी जास्त असेल, तर तुम्ही आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये एका रात्रीच्या वास्तव्यास परवानगी देऊ शकता, परंतु जेव्हा गेस्ट्स शुक्रवारची किंवा शनिवारची रात्र बुक करतात तेव्हा नाही.

गेस्ट्सना अधिक लवचिकता ऑफर करणे आणि चेक इनच्या जवळ बुकिंग करण्याची सुविधा देणे देखील अधिक बुकिंग्ज आकर्षित करण्यात मदत करते. गेस्टचे बुकिंग आणि त्यांचे आगमन या दरम्यान तुम्हाला किती वेळ हवा आहे यावर अवलंबून, कमीत कमी त्याच दिवसाइतका किमान लीड वेळ निवडा.

तुम्ही तुमच्या किमान लीड वेळेपेक्षा कमी नोटिसवर आलेल्या विनंत्यांना देखील परवानगी देऊ शकता. तुम्हाला या विनंत्यांचा आढावा घेण्यास आणि मंजूर करण्यास सांगितले जाईल.

स्पर्धात्मक भाडे ठेवा

जवळपासच्या इतर मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जपेक्षा कमी भाडे असलेल्या लिस्टिंग्जना सर्च रिझल्ट्समध्ये सहसा उच्च रँकिंग मिळते. तुम्हाला किमान 10 वास्तव्ये होस्ट करण्यात मदत करण्यासाठी तुमचे प्रति रात्र भाडे तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत ॲडजस्ट करण्याचा विचार करा.

तुमच्या भागातील मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची भाडी पाहण्यासाठी, तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरवर जा आणि 31 दिवसांपर्यंत तारखेची रेंज निवडा.

तुम्हाला तुमच्या भागाच्या नकाशावर मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची सरासरी भाडी दिसतील. कोणत्या लिस्टिंग्ज मिळत्या-जुळत्या आहेत हे ज्या घटकांवरून ठरवले जाते त्यांच्यामध्ये लोकेशन, आकार, वैशिष्ट्ये, सुविधा, रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि गेस्ट्सनी तुमच्या लिस्टिंग्जचा विचार करताना बघितलेल्या इतर लिस्टिंग्जचा समावेश होतो.

तुम्ही रोज रात्री एकसारखे भाडे ऑफर करत असल्यास, अधिक गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी तुमचे वीकडे आणि वीकेंडचे दर ॲडजस्ट करण्यावर विचार करा. रात्रींच्या आधारे वेगवेगळे भाडे ठेवल्याने, तुम्हाला जास्तीत जास्त बुकिंग्ज आणि कमाई मिळवण्यात मदत होऊ शकते.

सवलत जोडा

सवलती जोडणे हा गेस्ट्सच्या नजरेत भरण्याचा आणखी एक मार्ग आहे. तुम्ही या सुविधा ऑफर करून वेगवेगळ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करू शकता:

  • साप्ताहिक आणि मासिक सवलती. सात किंवा त्याहून जास्त रात्रींच्या वास्तव्यांसाठी साप्ताहिक सवलती किंवा 28 किंवा त्याहून जास्त रात्रींच्या वास्तव्यांसाठी मासिक सवलती ऑफर करा. यामुळे तुमच्या सर्व लिस्टिंग्जमध्ये वास्तव्याचा सरासरी कालावधी वाढू शकतो आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करावी लागू शकते.
  • अर्ली बर्ड सवलत. चेक इनच्या 1 ते 24 महिने आधी केलेल्या बुकिंग्जवर सवलत जोडा आणि जास्त गर्दीच्या सीझन्सपूर्वी भरपूर बुकिंग्ज असतील याची खात्री करा.

गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर 10% किंवा त्याहून अधिकच्या साप्ताहिक किंवा मासिक सवलतींकडे तसेच 3% किंवा त्याहून अधिकच्या अर्ली बर्ड सवलतींकडे लक्ष वेधून घेणारा एक विशेष कॉलआऊट दिसतो. तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.

स्मार्ट रेट चालू केल्यावर अर्ली बर्ड सवलत उपलब्ध नसते आणि वास्तव्यांच्या कालावधींनुसार सवलती देताना स्थानिक नियम आणि कायद्यांचे पालन करणे आवश्यक असते याची नोंद घ्या.

फाईव्ह-स्टार आदरातिथ्याचा अनुभव देण्यावर भर द्या

गेस्ट्सना वेगवान, स्पष्ट कम्युनिकेशन महत्त्वाचे वाटते आणि सुपरहोस्ट निकषांनुसार होस्ट्सना किमान 90% प्रतिसाद दर राखणे आवश्यक आहे. झटपट उत्तरे सेट अप केल्याने तुम्ही गेस्ट्सना सहज आणि कार्यक्षमरित्या प्रतिसाद देऊ शकता.

झटपट उत्तरे म्हणजे लहान मेसेज टेम्प्लेट्स असतात जे होस्ट्सना वारंवार विचारल्या जाणाऱ्या विशिष्ट विषयांशी संबंधित असतात. तुम्ही ते आधीच लिहून ठेवू शकता किंवा त्यात बदल करू शकता जेणेकरून तुम्ही गेस्टसोबत चॅटींग करत असताना ते पाठवू शकाल.

फाईव्ह-स्टार रिव्ह्यूज मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवणे म्हणजे गेस्ट्सच्या गरजांचा अंदाज घेणे आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा त्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.

  • पर्सनल टच द्या. लहानशा कृती, जसे की तुमची आवडती स्थानिक कॉफी ऑफर करणे किंवा हस्तलिखित स्वागतपत्र देणे, गेस्ट्सना खास वाटण्यात खूप मदत करू शकतात.
  • गेस्ट्सना घरी असल्यासारखे वाटण्यात मदत करा. तुमची जागा आणि तुम्ही ऑफर करत असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. लवकर चेक इन करण्याची परवानगी देणे आणि टॉवेल्स व्यवस्थित घड्या घालून एकावर एक ठेवणे यासारख्या गोष्टी एकंदर चांगले रेटिंग आणि उत्कृष्ट रेटिंगमधील फरक ठरू शकतात.
  • संपर्कात रहा. गेस्ट्सना कळवा की ते तुमच्याशी किंवा तुमच्या को-होस्टशी कधीही संपर्क साधू शकतात. गेस्ट्स मेसेजेस पाठवतात तेव्हा तुम्हाला अलर्ट मिळण्यासाठी तुमची नोटिफिकेशन्स सेट करा.

तुमच्या लिस्टिंगच्या आकर्षकतेवर लक्ष केंद्रित करा

तुमचे लिस्टिंग पेज नियमितपणे रिफ्रेश केल्याने तुम्हाला तुमच्या जागेसाठी योग्य गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होऊ शकते.

उत्तम फोटोंमुळे लोकांचे लक्ष वेधले जाते, त्यांनी काय अपेक्षा ठेवाव्यात हे स्पष्ट होते आणि गेस्ट्सचा तुमचे घर बुक करण्याबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला सुपरहोस्ट स्टेटस गाठण्यास मदत करण्यासाठी तुमच्या लिस्टिंगचे फोटो अपडेट करण्यावर विचार करा.

  • तुमचे फोटो प्लॅन करा. तुमच्या घराचे अनोखे तपशील, लोकप्रिय सुविधा आणि ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये दाखवणारे फोटो काढण्यावर लक्ष केंद्रित करा. गेस्ट्स वापरू शकतील अशी प्रत्येक रूम आणि भाग वेगवेगळ्या कोनांमधून कॅप्चर करा.
  • आडवे, हाय-रिझोल्युशन फोटो अपलोड करा. फोटो किमान 800 पिक्सल्स x 1,200 पिक्सल्सचे असावेत. फाईलचा आकार मोठा असेल तर चांगले असते, सुमारे 10 मेगाबाईट्सपर्यंत.
  • व्यावसायिक मदत मिळवा. एखादा प्रोफेशनल फोटोग्राफर नेमण्याबद्दल विचार करा. Airbnb तुम्हाला जगभरातील निवडक शहरांमध्ये प्रोफेशनल फोटोग्राफर्सशी कनेक्ट करू शकते.
  • एक फोटो टूर तयार करा. Airbnb ची टूल्स तुम्ही अपलोड केलेल्या फोटोंची रूमनुसार आपोआप क्रमवारी लावतात जेणेकरून गेस्ट्सना तुमच्या घराचा लेआऊट समजण्यात मदत होते. तुम्ही फोटो हलवू शकता, काढून टाकू शकता आणि जोडू शकता, प्रत्येक रूमचे तपशील जोडू शकता आणि प्रत्येक फोटोसाठी कॅप्शन लिहू शकता.

तुमच्या लिस्टिंगचे लेखी वर्णन हे ती कशी दिसते तितकेच महत्त्वाचे आहे. तुमचे शीर्षक, वर्णन आणि सुविधा गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या वास्तव्याबाबत स्पष्ट अपेक्षा सेट करण्यासाठी अधिक संधी प्रदान करतात.

  • एक संक्षिप्त, वर्णनात्मक शीर्षक समाविष्ट करा. तुमचे शीर्षक तुमच्या घराचा आणि आजूबाजूच्या परिसराचा एक अनोखा, अचूक दृष्टीकोन प्रदान करते याची खात्री करा. उदाहरणार्थ, “उफीझीजवळ शांत स्टुडिओ” हे शीर्षक काही शब्दांत सांगते की ती जागा फ्लोरेन्स, इटलीमधील एक शांततापूर्ण, मध्यवर्ती अपार्टमेंट आहे.
  • लिस्टिंगचे स्पष्ट, मनमोकळे वर्णन उत्तम प्रकारे कार्य करते. गेस्ट्स तुमच्या जागेत काय पाहण्याची, ऐकण्याची आणि अनुभव घेण्याची अपेक्षा करू शकतात त्याचे वर्णन करणारे ठोस तपशील समाविष्ट करा. उदाहरणार्थ, तुम्ही असे म्हणू शकता की मागच्या अंगणाला कुंपण आहे, मुलांना आणि पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी भरपूर जागा आहे.
  • तुम्ही ऑफर करत असलेली प्रत्येक सुविधा जोडा. तुम्ही कोणत्या लोकप्रिय सुविधा जोडू किंवा सुधारू शकता याचा विचार करा, जसे की लॉकबॉक्सला स्मार्ट लॉकने बदलणे किंवा तुमचे वायफाय अपग्रेड करणे. गेस्ट्स ज्या सुविधा सर्वाधिक सर्च करतात त्यामध्ये सेल्फ चेक इन, वायफाय, वॉशर, ड्रायर, टीव्ही किंवा केबल आणि बार्बेक्यू क्षेत्र यांचा समावेश आहे.***

*ऑक्टोबर 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुपरहोस्ट्स असलेल्या आणि नसलेल्या होस्ट्सच्या सरासरी कमाईच्या आधारे.

**7 ऑक्टोबर 2024 पर्यंत Airbnb च्या अंतर्गत डेटाच्या आधारे.

***1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीत जगभरात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सुविधांच्या मोजमापाच्या Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार.

तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.

होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.

होस्टिंग टिप्स स्थानिक कायद्याच्या अधीन आहेत.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
6 जाने, 2025
हे उपयुक्त ठरले का?