वेळ वाचवण्यासाठी झटपट उत्तरे वापरणे
होस्ट्सना अनेकदा वेगवेगळ्या गेस्ट्सच्या त्याच त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात: तुमचे घर जूनमध्ये उपलब्ध आहे का? तुम्ही मला दिशानिर्देश पाठवू शकता का? वायफायचा पासवर्ड काय आहे?
मेसेजेस टॅबमधील झटपट उत्तरांच्या सहाय्याने तुम्ही तुमची उत्तरे पुन्हा वापरू शकता आणि प्रत्येक वेळी झटपट प्रतिसाद देऊ शकता.
झटपट उत्तर म्हणजे काय?
झटपट उत्तर म्हणजे एक लहान, पूर्व-लिखित मेसेज असतो जो तुमच्या मेसेजिंग सेटिंग्जमध्ये टेम्प्लेट म्हणून सेव्ह केला जातो.
गेस्टच्या नावासारख्या तपशिलांसाठी असलेले प्लेसहोल्डर्स तुमच्या लिस्टिंगमधून किंवा रिझर्व्हेशनमधून माहिती काढून घेऊन प्रत्येक मेसेज पर्सनलाईझ करतात.
तुमची स्वतःची झटपट उत्तरे तयार करा किंवा Airbnb च्या टेम्पलेट्समध्ये बदल करा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या आऊटडोर ग्रिलबद्दल वारंवार प्रश्नांची उत्तरे देत असल्यास, तुमचा स्टँडर्ड प्रतिसाद झटपट उत्तर म्हणून सेव्ह करून पहा.
तुम्ही झटपट उत्तरे लगेच पाठवू शकता किंवा नंतर ऑटोमॅटिक डिलिव्हरीसाठी शेड्युल करू शकता.
मी झटपट उत्तर कसे पाठवू?
गेस्टला झटपट उत्तर लगेच पाठवण्यासाठी:
- मेसेजेस टॅबवर जा.
- तुम्हाला ज्या संभाषणाला उत्तर द्यायचे आहे ते निवडा.
- मेसेज लिहाच्या शेजारील अधिक चिन्हावर (+) टॅप करा.
- झटपट उत्तर पाठवा निवडा.
- एक झटपट उत्तर निवडा, जे तुमच्या संभाषणात दिसते.
- मेसेजमध्ये बदल करा किंवा तो जसा आहे तसा पाठवा.
- मेसेज पाठवण्यासाठी बाणावर (↑) टॅप करा.
मेसेजेस टॅबमध्ये सुचवलेली उत्तरेदेखील आहेत, ज्यात गेस्टचा प्रश्न समजून घेऊन तुमच्या झटपट उत्तरांपैकी एक उत्तर सुचवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. सुचवलेले उत्तर तुमच्या संभाषणात दिसून येते, जिथे फक्त तुम्हीच ते पाहू शकता. सुचवलेले उत्तर पाठवण्यापूर्वी तुम्ही ते बदलू शकता किंवा वेगळा प्रतिसाद लिहू शकता.
मी झटपट उत्तर कसे शेड्युल करू?
सर्व गेस्ट्सना एक झटपट उत्तर ऑटोमॅटिक पद्धतीने पाठवण्यासाठी:
- मेसेजेस टॅबवर जा.
- तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या सेटिंग्ज आयकॉनवर टॅप करा.
- झटपट उत्तरे मॅनेज करा वर टॅप करा.
- तुम्हाला शेड्युल करायचे असलेले झटपट उत्तर निवडा आणि पुढील वर टॅप करा.
- या वेळेसाठी शेड्युल करा वर टॅप करा आणि मेसेज गेस्ट्सना कधी मिळावा अशी तुमची इच्छा आहे ते निवडा, जसे की गेस्टनी बुक केल्यानंतर 5 मिनिटांनी किंवा चेक इनच्या 1 दिवस आधी सकाळी 10:00 वाजता.
जेव्हा शेड्युल केलेले झटपट उत्तर पाठवण्याची वेळ जवळ येईल, तेव्हा तुम्हाला गेस्टसोबतच्या तुमच्या संभाषणात रिमाइंडर दिसेल. तुम्ही आधीच शेअर केलेली माहिती त्यात पुन्हा येत असल्यास तो मेसेज ॲडजस्ट करा किंवा पाठवू नका.
झटपट उत्तरे वापरण्यासाठी सल्ले
झटपट उत्तर संक्षिप्त आणि एकाच विषयाशी संबंधित असते तेव्हा ते उत्तम प्रकारे कार्य करते. तुम्हाला यासारख्या सामान्य विषयांसाठी मेसेजेस टॅबमध्ये पूर्व-लिखित टेम्प्लेट्स आढळतील.
- लिस्टिंगची उपलब्धता: गेस्ट्सना कळवा की ते तुमच्या कॅलेंडरमधील कोणत्याही खुल्या तारखा बुक करू शकतात.
- झोपण्याची व्यवस्था: तुमच्या जागेत असलेल्या बेडरूम्स, बेड्स आणि बाथरूम्सची संख्या कन्फर्म करा.
- लवकर चेक इन: तुमच्या नेहमीच्या चेक इनच्या वेळेपूर्वी येण्यासाठी गेस्टची विनंती स्वीकारा.
- दिशानिर्देश आणि वाहतूक: घराचा किंवा मीटिंग पॉईंटचा पत्ता, तेथे पोहोचण्यासाठीच्या सूचनांसह कन्फर्म करा.
- वायफाय: तुमच्या घराचे किंवा लोकेशनचे वायफाय नेटवर्क आणि पासवर्ड द्या.
- उशीरा चेक आऊट: तुमच्या नेहमीच्या चेक आऊटच्या वेळेनंतर निघण्यासाठीची गेस्टची विनंती स्वीकारा.
तुम्ही कोणतेही पूर्व-लिखित टेम्प्लेट पाठवण्यापूर्वी ते कस्टमाईझ करू शकता किंवा तुमचे स्वतःचे तयार करू शकता. यासारख्या महत्त्वाच्या क्षणांसाठी झटपट उत्तरे शेड्युल करण्याचा प्रयत्न करा.
- बुकिंग कन्फर्मेशन: गेस्टचे बुकिंग कन्फर्म झाल्यावर स्वागतपर नोट पाठवा.
- चेक इन करण्यापूर्वी: चेक इनच्या 24 ते 48 तासांपूर्वी, जेव्हा त्यांच्या ट्रिपचे सर्व तपशील उपलब्ध होतील तेव्हा त्यांचा पाठपुरावा करा.
- पहिल्या रात्रीनंतर: त्यांचे वास्तव्य अधिक आरामदायक करण्याच्या दृष्टीने त्यांना अजून काही हवे आहे का ते विचारण्यासाठी संपर्क साधा.
- चेक आऊटपूर्वी: गेस्ट्स निघणार असतील त्याआधीच्या संध्याकाळी चेक आऊटची वेळ आणि सूचना शेअर करा.
- निघाल्यानंतर: गेस्ट्स तुमच्यासोबत राहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्या आणि त्यांनी चेक आऊट केल्यानंतर 24 ते 48 तासांनंतर फीडबॅकची विनंती करा.
तुमच्या झटपट उत्तरांमध्ये फोटोज किंवा व्हिडिओज जोडल्यामुळे स्वतःचा परिचय करून देण्यात आणि तुमच्या घराबद्दलचे महत्त्वाचे तपशील शेअर करण्यात मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, व्हिज्युअल गाईडमुळे गेस्ट्सना आत जाणे, एअर कंडिशनिंग किंवा हीट ॲडजस्ट करणे किंवा हॉट टब चालू आणि बंद करणे सोपे होऊ शकते.
बुकिंग्ज कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही कधीही मेसेजेसमध्ये फाईल्स अटॅच करू शकता. फोटोज PNG किंवा JPG फॉरमॅटमध्ये (50 मेगाबाईट्सपर्यंत) आणि व्हिडिओज MP4 किंवा MOV फॉरमॅटमध्ये (100 मेगाबाईट्स आणि 60 सेकंदांपर्यंत) पाठवा.
युजरचा अनुभव लोकेशननुसार बदलू शकतो. या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.
