अखेरच्या क्षणी बुकिंग्ज मिळवण्याचे सहा मार्ग

सवलती जोडणे आणि अल्पकालीन वास्तव्यांना परवानगी देणे तुमचे कॅलेंडर भरण्यात मदत करू शकते.
Airbnb यांच्याद्वारे 11 नोव्हें, 2024 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
11 नोव्हें, 2024 रोजी अपडेट केले

अगदी सर्वात लोकप्रिय लिस्टिंग्जमध्ये देखील कधीकधी अनपेक्षित ओपनिंग्ज असतात. शेवटच्या क्षणी बुकिंग्ज आकर्षित करण्यासाठी आणि तुमची कमाई जास्तीत जास्त वाढवण्यासाठी या सहा टिप्स विचारात घ्या.

1. अखेरची सवलत जोडा

अखेरच्या सवलतींमुळे गेस्ट्सना बुकिंग करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. चेक इनच्या 1 ते 28 दिवस आधी बुक केलेल्या रिझर्व्हेशन्सवर त्या लागू होतात.

तुमच्या 60 दिवसांच्या सरासरी भाड्याच्या 10% किंवा त्याहून अधिक सवलतींसाठी, गेस्ट्सना तुमच्या लिस्टिंग पेजवर आणि सर्च रिझल्ट्समध्ये एक विशेष कॉलआउट दिसतो. तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.

अखेरची सवलत जोडण्यासाठी:

  • तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील भाडे टॅबवर जा.
  • अधिक सवलती अंतर्गत, अखेरच्या सवलती उघडा.
  • 1 ते 28 दरम्यानची आगमनापूर्वीच्या दिवसांची संख्या लिहा.
  • तुम्ही ऑफर करू इच्छित असलेली टक्केवारी सवलत लिहा.

रिझर्व्हेशन्स केव्हा बुक केली जातात त्या आधारे तुम्ही सवलत ॲडजस्ट करू शकता, उदाहरणार्थ, तारीख जसजशी जवळ येते तसतशी ती वाढत जाते.

स्मार्ट रेट चालू केल्यावर ही सवलत उपलब्ध नसते याची नोंद घ्या.

2. अल्पकालीन वास्तव्यांना परवानगी द्या

अचानक ठरवलेल्या सुट्टीवर जाऊ इच्छित असलेल्या गेस्ट्सकडे प्रवासासाठी फक्त एक किंवा दोन दिवस असू शकतात. तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कमी केल्याने त्यांना अल्पकालीन वास्तव्ये बुक करण्याचा पर्याय मिळतो आणि यामुळे तुम्हाला अखेरच्या क्षणीच्या प्रवाशांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कमी करण्यासाठी:

  • तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील उपलब्धता टॅबवर जा.
  • ट्रिपचा कालावधी अंतर्गत, किमान रात्री वर टॅप करा.
  • तुमच्यासाठी योग्य असलेल्या रात्रींच्या संख्येनुसार ट्रिपच्या किमान कालावधीमध्ये बदल करा.

3. तुमच्या भागातील मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करा

Airbnb चे मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करा हे टूल तुम्हाला बुकिंग नसलेल्या रात्रींसाठी स्पर्धात्मक भाडे सेट करण्यात मदत करू शकते. त्याच तारखांसाठी तुमच्या भागातील मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जचे सरासरी भाडे तपासा आणि तुमचे प्रति रात्र भाडे ॲडजस्ट करण्याचा विचार करा.

मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करण्यासाठी:

  • तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील भाडे टॅबवर जा.
  • 31 दिवसांपर्यंतची तारखेची रेंज निवडा.
  • मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज पहा वर टॅप करा.

तुमच्या भागाचा नकाशा लोकेशन, आकार आणि सुविधा यासारख्या घटकांच्या आधारे जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जचे सरासरी भाडे दाखवेल. बुक झालेल्या किंवा बुकिंग नसलेल्या लिस्टिंग्ज दाखवण्यासाठी नकाशावरील बटणे वापरा.

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि सुपरहोस्ट फेलिसिटी म्हणतात, “माझे भाडे स्पर्धात्मक आहे की नाही हे मी नेहमीच तपासत असते, म्हणून मला पाहायचे असते की माझ्या भागातील इतर होस्ट्स प्रति रात्र किती भाडे घेत आहेत.”

4. तुमचे प्रति रात्र भाडे ॲडजस्ट करा

बुकिंग नसलेल्या रात्रींसाठी तुमचे भाडे तात्पुरते कमी केल्याने गेस्ट्सना तुमचे घर बुक करण्यास प्रोत्साहन मिळू शकते. जवळपासच्या इतर मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जपेक्षा कमी भाडे असलेल्या लिस्टिंग्जना सर्च रिझल्ट्समध्ये सहसा उच्च रँकिंग मिळते. तुम्ही अधिक गेस्ट्सचे स्वागत केल्यावर तुमची कमाईची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमचे भाडे नंतर कधीही ॲडजस्ट करू शकता.

5. ॲडव्हान्स नोटिसचा कालावधी कमी करा

कमी गर्दीच्या सीझनमध्ये तुमचे कॅलेंडर भरण्यासाठी गेस्ट्सना चेक इनच्या जवळ बुकिंग करू देण्याचा विचार करा. गेस्टचे बुकिंग आणि त्यांचे आगमन या दरम्यान तुम्हाला किती वेळ हवा आहे यावर अवलंबून, तुम्ही त्याच दिवसाइतका कमी लीड वेळ निवडू शकता.

“प्रवास करताना काय-काय होते हे मला समजते आणि शेवटच्या क्षणी त्या निवासस्थानाची आवश्यकता असते, म्हणून एखादी व्यक्ती बुकिंगची विनंती केव्हा पाठवू शकते यावर मर्यादा घालायला मला आवडत नाही,” लिटिल रॉक, अर्कान्सासमधील एक सुपरहोस्ट मिरांडा म्हणते. “जरी अगदी पुढच्या दिवशी कोणीही बुकिंग केले नसले तरीही, माझी जागा स्वच्छ आणि राहण्यासाठी तयार असेल याची मी खात्री करते.”

तुमचा किमान लीड वेळ बदलण्यासाठी:

  • तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील उपलब्धता टॅबवर जा.
  • ॲडव्हान्स नोटिस उघडा.
  • तुमच्यासाठी योग्य असलेल्या दिवसांची संख्या निवडा.

तुम्ही तुमच्या किमान लीड वेळेपेक्षा कमी नोटिस कालावधीत आलेल्या विनंत्यांना देखील परवानगी देऊ शकता. तुम्हाला या विनंत्यांचा आढावा घेण्यास आणि मंजूर करण्यास सांगितले जाईल.

6. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना विचारा

सोशल मीडिया, ईमेल किंवा टेक्स्टद्वारे तुमच्या वैयक्तिक ओळखीच्या लोकांशी संपर्क साधा आणि तुमचे घर उपलब्ध आहे हे त्यांना कळवा. तुमच्या नेटवर्कमधील एखाद्याला उत्स्फूर्त ट्रिप बुक करण्याची इच्छा होऊ शकते.

इतर कोणत्याही वास्तव्याच्या जागेच्या होस्टिंगप्रमाणेच, स्पष्ट कम्युनिकेशन हे महत्त्वाचे आहे, खासकरून अखेरच्या क्षणीच्या बुकिंग्जसाठी. एखाद्या गेस्टने चेक इनसाठी 48 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना रिझर्व्हेशन बुक केल्यास, ते तुमच्या ठरलेल्या चेक इन कालावधीच्या बाहेरची चेक इन वेळ निवडू शकतात. तुमची लिस्टिंग तात्काळ बुकिंग करण्यायोग्य असल्यास, तुम्हाला बुकिंगची चौकशी प्राप्त होईल. स्पष्ट चेक इन सूचनांसह तयार रहा आणि तुम्हाला दोन वास्तव्यांच्या दरम्यान आणखी वेळ हवा असल्यास त्यांना कळवा.

होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.

हा लेख पब्लिश केल्यानंतर त्यातील माहितीमध्ये बदल झालेला असू शकतो.

Airbnb
11 नोव्हें, 2024
हे उपयुक्त ठरले का?