एका शिक्षिकेच्या मते तिच्याकडील जास्तीची रूम होस्ट केल्याने तिला खूप काही शिकायला मिळते

होस्टिंगमुळे त्या दुसऱ्या बेडरूमचा खर्च उचलू शकतात—आणि त्यांना जगभरातील लोकांना भेटण्याची संधी मिळते.
Airbnb यांच्याद्वारे 13 एप्रि, 2022 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • ही मिडल स्कूल टीचर म्हणते की शिकवणे, प्रवास करणे आणि होस्ट करणे यातून ती खूप काही शिकली आहे

  • तिला लोकांना भेटायला आवडते आणि तिच्या होस्टिंगची काही कमाई ती प्रवासासाठी वापरते

  • ती म्हणते की अध्यापनाचे व्यग्र वेळापत्रक असताना, होस्टिंगमध्ये मिळणारी लवचिकता तिच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे

न्यूयॉर्क सिटी पब्लिक स्कूल टीचर असलेल्या, सुपरहोस्ट टिफनीला उन्हाळ्यात प्रवास करणे नेहमीच आवडते. शिक्षण आणि प्रवास या दोन्ही माध्यमातून तिला नवीन लोकांना भेटण्याची आणि इतर संस्कृतींबद्दल शिकण्याची संधी मिळते. अनेक वर्षांपासून तिला हे खूप कमी पैशात करावे लागले होते.

2012 मध्ये खासगी रूम होस्ट करण्यास सुरुवात केल्यापासून, टिफनीकडे जगभरातील लोकांना भेटताना आता दोन बेडरूमचे अपार्टमेंट आणि उन्हाळ्याचा प्रवास परवडण्याजोगे पुरेसे अतिरिक्त कॅश फ्लो आहे.

“होस्टिंगमुळे मला न्यूयॉर्क सिटीमधील दोन बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहणे शक्य झाले आहे ,” टिफनी सांगते. “शिक्षकाच्या पगारावर बरेच लोक असे म्हणू शकत नाहीत. आणि यामुळे मला मी जिथे काम करतो ज्याला मी माझी कम्युनिटी मानतो त्याच्या आसपासच्या परिसरात राहणे परवडत आहे."

शिक्षकाची मानसिकता

रूममेट गेल्यानंतर टिफनीने प्रथम एक खाजगी रूम लिस्ट केली आणि तिच्या लक्षात आले की तिला गेस्ट्सचे नियमित रोटेशन पसंत आहे. एक शिक्षिका असल्याने, तिला होस्टिंगची कल्पना आवडली. अखेरीस, ती तिच्या माध्यमिक शाळेच्या वर्गाची अनुभवी होस्ट होती.

“शिकवण्यातून तुम्ही खूप काही शिकता,” टिफनी म्हणतात. “तुम्ही लोकांच्या भावना आणि स्वभाव हाताळण्याबद्दल बरेच काही शिकता. ते निःसंशयपणे होस्टिंगमध्येही मदत करते. लोकांना आनंद देणाऱ्या गोष्टी समजून घेणे इतकेच हे आहे.”

जेव्हा तिचे भाडे वाढले तेव्हा तिने ती वॉशिंग्टन हाईट्समध्ये ईएसएल शिकवते त्या शाळेजवळ दोन बेडरूमचे अपार्टमेंट घेतले. तिची खाजगी रूम होस्ट करण्यातून होणार्‍या तिच्या अतिरिक्त कमाईतून तिचे अर्धे भाडे कव्हर होते.

प्रवासासाठी सहाय्य—इतरांसाठी आणि तिच्या स्वतःसाठी

टिफनी गेस्ट्सना न्यूयॉर्कला भेट देण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या बाजारपेठेच्या तुलनेत, प्रति रात्र भाडे कमी ठेवतात—जेव्हा ही कथा प्रकाशित केली गेली तेव्हा त्यांचा दर $48 होता. आणि होस्टिंगद्वारे त्या अजूनही स्वतःला प्रवास करणे परवडण्याइतकी कमाई करतात.

“प्रवास किफायतशीर बनवण्यावर मी मनापासून विश्वास ठेवते,” त्या म्हणतात. “कारण प्रवासाने जीवनच बदलून जाते. आणि होस्टिंग जोरात सुरू झाले. माझे कॅलेंडर अनेक महिने भरलेले असते. ही माझी अतिरिक्त कमाईच झाली आहे”.

होस्टिंग सोयीस्कर असल्यामुळे, टिफनी स्वत:च्या वेळापत्रकानुसार आपले कॅलेंडर ब्लॉक करू शकतात. त्यांनी आपल्या लिस्टिंगच्या वर्णनात हेदेखील स्पष्ट केले आहे की गेस्ट्ससाठी फर असलेले रूममेट्सदेखील असतील: त्यांची काली नावाची मांजर आणि चुग्झी आणि सिप्झी नावाचे दोन कुत्रे.

हाती घेतलेले काम पूर्ण करणे

शाळेला सुट्टी असताना टिफनी प्रवास करत असतील किंवा त्यांच्या गेस्ट्सद्वारे अप्रत्यक्षपणे अनुभव घेत असतील, त्या म्हणतात की जगभरातील लोकांना भेटणे ही Airbnb वरील होस्टिंगची खरी समृद्धी आहे.

“मला जीवन मनोरंजक ठेवण्याच्या या क्षमतेचे खरोखर कौतुक वाटते कारण मला भेटणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांची मोठी संख्या,” टिफनी म्हणतात. “जेव्हा आपण वेगवेगळ्या संस्कृतीतील आणि पार्श्वभूमीतील लोकांबरोबर मिसळत असतो आणि संवाद साधत असतो तेव्हा आपले जीवन बरेच समृद्ध होत असते. त्यासाठीच मी प्रवास करत असते”.

आणि अतिरिक्त कमाईमुळे “मला ज्या प्रकारे जगायचे आहे ते एक्स्प्लोर करता येते आणि तसे जगता येते,” त्या पुढे म्हणतात. “Airbnb होस्ट असल्यामुळे मला पंख पसरवण्याची थोडीशी संधी मिळाली आहे. मला अशी काही मोकळीक आणि फायदे मिळाले आहेत, जे न्यूयॉर्क सिटीमधल्या प्रत्येकाला मिळत नाहीत.”

तुमची स्वतःची वास्तव्याची जागा होस्ट करण्यात इंटरेस्टेड आहात?
होस्टिंग करून पहा

हायलाइट्स

  • ही मिडल स्कूल टीचर म्हणते की शिकवणे, प्रवास करणे आणि होस्ट करणे यातून ती खूप काही शिकली आहे

  • तिला लोकांना भेटायला आवडते आणि तिच्या होस्टिंगची काही कमाई ती प्रवासासाठी वापरते

  • ती म्हणते की अध्यापनाचे व्यग्र वेळापत्रक असताना, होस्टिंगमध्ये मिळणारी लवचिकता तिच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे

Airbnb
13 एप्रि, 2022
हे उपयुक्त ठरले का?