गुणवत्ता राखणे
उच्च रेटिंग्ज आणि रिव्ह्यूजमुळे अधिक बुकिंग्ज आणि कमाई होऊ शकते. चेक आऊट केल्यानंतर, गेस्ट्स त्यांच्या एकूण वास्तव्याला तसेच स्वच्छता, अचूकता, चेक इन, कम्युनिकेशन, लोकेशन आणि मूल्याला रेट करू शकतात.
जरी केवळ रेटिंग्ज पंचतारांकित वास्तव्याचे मोजमाप नसले, तरी प्रत्येक वेळी या सहा कॅटेगरीजमध्ये योग्य रेटिंग मिळवणे महत्त्वाचे आहे.
अचूकता
तुमचे फोटो, सुविधा आणि वर्णन तुमच्या वास्तविक जागेशी जुळतील अशी गेस्ट्सची अपेक्षा असते. तुमच्याकडे पूलसारखी हंगामी सुविधा असल्यास, पूल बंद झाल्यावर लिस्टिंग अपडेट करायला विसरू नका.
20 लिस्टिंग्ज असलेली समांथा, बेलफास्ट, मेनमधील एक सुपरहोस्ट, अपडेटेड फोटोंसह लिस्टिंगचे तपशीलवार वर्णन करून अपेक्षा सेट करते. “आम्ही अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे गेस्ट्सना कशाची अपेक्षा करावी ते कळते,” त्या म्हणतात. त्या हंगामानुसार त्यांचे फोटो बदलण्याचा आणि दर महिन्याला त्यांची लिस्टिंग्ज अपडेट करण्याचा प्रयत्न करतात.
चेक इन
आवश्यक असल्यास, प्रत्येक लिस्टिंगसाठी स्टेप-बाय-स्टेप तपशील आणि फोटोंसह चेक इनच्या सूचना द्या. जेथे स्मार्ट लॉक इंटिग्रेशन उपलब्ध आहे, तेथे प्रत्येक गेस्टच्या वास्तव्यासाठी एक युनिक कोड आपोआप तयार करण्याकरता, तुमच्या Airbnb अकाऊंटशी सुसंगत स्मार्ट लॉक्स कनेक्ट करा.
कोरिन, पर्सेलविल, व्हर्जिनियामधील 36 लिस्टिंग्ज असलेल्या एक सुपरहोस्ट, प्रत्येक लिस्टिंगसाठी घरांची माहिती आणि आगमन सूचनांसह एक छोटा मेसेज तयार करतात. चेक इनच्या तीन दिवस आधीसाठी त्या हा मेसेज शेड्यूल करतात. यामुळे शेवटच्या क्षणीचे प्रश्न टाळण्यास आणि चेक इन सुरळीतपणे पार पडण्याची खात्री करण्यास मदत होते.
स्वच्छता
तुम्ही तुमच्या लिस्टिंग्जसाठी एक सविस्तर टर्नओव्हर चेकलिस्ट तयार करू शकता, जेणेकरून क्लीनर्स काहीही दुर्लक्षित होऊ न देण्यासाठी नेहमी त्याच नित्यक्रमाचे पालन करतील. कोरिनकडे एक संपूर्ण चेकलिस्ट आहे, जी त्यांनी प्रत्येक लिस्टिंगनुसार बदलली आहे.
त्या मोठ्या प्रमाणात आवश्यक वस्तूंची खरेदी करतात आणि मध्यवर्ती लोकेशनवर पुरवठा ठेवतात. “काहीही कमी असल्याचा रिपोर्ट आल्यास, आम्ही पुढील क्लीनच्या वेळी आयटम पुन्हा भरण्यासाठी शेड्युल करतो,” असे कोरिन म्हणतात.
कम्युनिकेशन
तुमचा प्रतिसाद दर तुम्ही चौकशी आणि रिझर्व्हेशनच्या विनंत्यांना किती लवकर उत्तर देता हे मोजतो. वेळ वाचवण्यासाठी झटपट उत्तरे आणि शेड्यूल केलेले मेसेजेस वापरा.
“मी फायर पिट आणि हॉट टब ऑपरेशन्स आणि खास आकर्षणांपासूनचे अंतर यासारख्या गोष्टींबद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांशी संबंधित काही झटपट उत्तरे तयार ठेवली आहेत,” असे शिकागोमधील सात लिस्टिंग्ज असेलेले एक सुपरहोस्ट कोरी म्हणतात.
लोकेशन
लिस्टिंग मध्यवर्ती असो किंवा मुख्य मार्गापासून थोडे लांब, लिस्टिंगच्या वर्णनात त्याचे लोकेशन स्पष्ट करा. तुम्ही तुमच्या शीर्षक आणि फोटोच्या कॅप्शन्समध्ये लोकेशनबद्दल अपेक्षादेखील सेट करू शकता.
होस्ट सल्लागार बोर्डाचे सदस्य आणि बँकॉकमधील पाच लिस्टिंग्जच्या होस्ट आणि 44 लिस्टिंग्जच्या को-होस्ट असलेल्या सुपरहोस्ट तातिया म्हणतात,“माझे पहिले लिस्टिंग शहराच्या मध्यापासून खूप दूर होते.” “जेव्हा गेस्ट्स बँकॉकमध्ये गर्दीच्या वेळी ट्रॅफिकमध्ये अडकले, मला कमी रेटिंग्ज मिळाले. गेस्टच्या अपेक्षा मॅनेज करण्यासाठी माझ्या लिस्टिंगच्या वर्णनामध्ये बदल करण्यास मला थोडा वेळ लागला.”
मौल्यवान
स्वच्छता, अचूकता, चेक इन, कम्युनिकेशन आणि लोकेशन या सर्वांचा तुमच्या लिस्टिंग्जच्या एकूण मूल्यावर परिणाम होतो. जर तुम्ही या सर्व पाच गोष्टींना बरोबर साध्य केले आणि तुमचे डिझाईन आणि सुविधा अपडेटेड राहिल्या, तर गेस्ट्सना असे वाटण्याची अधिक शक्यता आहे की त्यांनी त्यांच्या वास्तव्यासाठी योग्य किंमत दिली आहे.
“माझा विश्वास आहे की, चित्रे आणि संपूर्ण वर्णन अनुभवात्मक आणि मूल्याची कहाणी दोन्ही सांगू शकतात,” असे कोरी म्हणतात. “मला माझे पूर्णपणे स्टॉक केलेले किचन, गॅदरिंग्जसाठी आऊटडोअर जागा आणि प्रत्येक घरासाठी माझ्या आदर्श प्रवाशांना अनुकूल असे डिझाईन्स दाखवायला आवडतात.”
सर्व सहा कॅटेगरीजमधील तुमची कामगिरी ट्रॅक करण्यासाठी, तुमचा इनसाईट्स टॅब तुमच्या प्रत्येक गेस्टकडून आलेले तपशील ऑफर करतो.
गुणवत्तेसाठी ओळखले जाते
तुम्ही जर पंचतारांकित वास्तव्याच्या जागा ऑफर करत असाल, गेस्ट्सच्या मेसेजेसना पटकन प्रतिसाद देत असाल आणि कॅन्सलेशन टाळण्यासाठी तुमचे कॅलेंडर आणि बुकिंग सेटिंग्ज अपडेट करत असाल, तर तुम्ही सुपरहोस्ट बनण्याच्या मार्गावर आहात. सरासरी, आम्ही पाहिले आहे की, सुपरहोस्ट बॅज सुपरहोस्ट्ससाठी वाढीव 4% अधिक कमाई करू शकतो.*
*2021 आणि 2022 मधील सुपरहोस्ट मूल्यांकनांनुसार
तुम्ही API-कनेक्टेड सॉफ्टवेअर वापरत असल्यास, तुमच्या प्रोव्हायडरने ही वैशिष्ट्ये इंटिग्रेट केल्यास, तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधून ती ॲक्सेस करू शकाल. तसे नसल्यास, ते कधी उपलब्ध होतील हे जाणून घेण्यासाठी तुमच्या प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
पब्लिकेशननंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.