कम्युनिकेशन सोपे करणे

तुमचा बिझनेस मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी मेसेजेस शेड्यूल करा आणि झटपट उत्तरे पाठवा.
Airbnb यांच्याद्वारे 4 जाने, 2024 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
4 जाने, 2024 रोजी अपडेट केले

शेड्युल केलेले मेसेजेस आणि झटपट उत्तरे तुमचा वेळ वाचवू शकतात. हे मेसेजेस लिहिताना लक्षात ठेवा की, ते वेळेवर आणि कमी असल्यास गेस्ट्सने ते वाचण्याची अधिक शक्यता असते.

शेड्युल केलेले मेसेजेस

वास्तव्य बुक करणे, चेक इन आणि चेक आऊट करणे यासारख्या विशिष्ट कृती केल्यानंतर, गेस्ट्सना शेड्युल केलेले मेसेजेस आपोआप पाठवा.

अशा वेळेस शेड्युल केलेल्या मेसेजेसचा विचार करा.

  • बुकिंग चौकशी किंवा विनंती: गेस्ट्सनी संपर्क साधल्यावर लगेच (किंवा जास्तीत जास्त 24 तासांच्या आत) प्रतिसाद द्या.
  • बुकिंग कन्फर्मेशन: बुकिंग केल्याबद्दल गेस्ट्सचे आभार माना आणि तुम्ही कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध आहात हे त्यांना कळवा.
  • चेक इन करण्यापूर्वी: सुमारे 24 ते 48 तास आधी, गेस्ट्सना चेक इन सूचना कुठे सापडतील याची आठवण करून द्या आणि आत जाण्यासाठी कोणत्याही टिप्स असल्यास शेअर करा. 
  • चेक इननंतर: गेस्ट्स आल्यानंतर थोड्या वेळाने सर्व काही कसे चालले आहे हे विचारा.
  • चेक आऊट करण्यापूर्वी: उशीरा चेक आऊट्स टाळण्यासाठी, गेस्ट्स निघण्यापूर्वीच्या रात्री तुमच्या चेक आऊटच्या वेळेचे रिमाइंडर पाठवा.
  • चेक आऊटनंतर: गेस्ट्सना धन्यवाद द्या आणि त्यांना रिव्ह्यू देण्यास सांगा. शक्य तितक्या लवकर त्यांना रिव्ह्यू द्या.

झटपट उत्तरे

एकाच टॅपने सामान्य प्रश्नांची उत्तरे द्या किंवा झटपट उत्तरे तयार करून क्लिक करा. तुम्ही तुमच्या सर्व लिस्टिंग्जमध्ये समान झटपट उत्तर वापरू शकता.

गेस्ट, रिझर्व्हेशन आणि लिस्टिंगचा तपशील आपोआप भरणाऱ्या शॉर्टकोड्ससह तुमची उत्तरे पर्सनलाईझ करा. शॉर्टकोड्स वापरण्यापूर्वी तुमच्या लिस्टिंगचे सर्व तपशील पूर्ण असल्याची खात्री करा.

शॉर्टकोड्सची काही उदाहरणे:

  • गेस्टचे नाव
  • चेक इनची तारीख
  • चेक इनची वेळ
  • चेक आऊटची तारीख
  • चेक आऊटची वेळ
  • चेक इन पद्धत
  • चेक आऊट सूचना
  • दिशानिर्देश
  • गाईडबुक
  • सुविधा सूची
  • घराचे नियम
  • वायफायचे नाव
  • वायफायचा पासवर्ड

तुम्ही API-कनेक्टेड सॉफ्टवेअर वापरत असल्यास, तुमच्या प्रोव्हायडरने ही वैशिष्ट्ये इंटिग्रेट केल्यास, तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधून ती ॲक्सेस करू शकाल. तसे नसल्यास, ते कधी उपलब्ध होतील हे जाणून घेण्यासाठी तुमच्या प्रोव्हायडरशी संपर्क साधा.

पब्लिकेशननंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.

Airbnb
4 जाने, 2024
हे उपयुक्त ठरले का?