सेटिंग्ज आणि उपलब्धता अपडेट करणे

तुमच्या सर्व लिस्टिंग्जमध्ये एकाच वेळी बदल करा आणि सुव्यवस्थित रहा.
Airbnb यांच्याद्वारे 4 जाने, 2024 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
4 जाने, 2024 रोजी अपडेट केले
सेटिंग्ज आणि उपलब्धता अपडेट करणे
कार्यक्षमतेने होस्टिंग करण्यासाठी
सेटिंग्ज आणि उपलब्धता अपडेट करणे

अनेक लिस्टिंग्जमधील तुमच्या कॅलेंडर आणि सेटिंग्जवर ताबा ठेवण्यासाठी सुसूत्रबद्ध असण्याची आवश्यकता असते. Airbnb प्रोफेशनल होस्टिंग टूल्स तुम्हाला एकाच वेळी अनेक लिस्टिंग्ज अपडेट करण्यात मदत करतात.

मल्टी-कॅलेंडर वापरणे

मल्टी-कॅलेंडर तुम्हाला तुमच्या सर्व लिस्टिंग्जची उपलब्धता एकाच ठिकाणी पाहायला आणि मॅनेज करायला देते. विविध बुकिंगचे पर्याय ऑफर केल्याने अधिक गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होते. 28 रात्री किंवा त्याहून अधिक काळ, तसेच अल्पकालीन वास्तव्यासाठी खुल्या असलेल्या लिस्टिंग्जनी 2022 मध्ये केवळ अल्पकालीन वास्तव्य स्वीकारलेल्या लिस्टिंग्जपेक्षा सरासरी 45% जास्त कमाई केली.*

तुमच्या लिस्टिंग्जना अधिक सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यात मदत करणारी काही सेटिंग्ज येथे आहेत. 

  • उपलब्धता विंडो: तुमचे कॅलेंडर 24 महिन्यांपर्यंत उघडा आणि भविष्यामध्ये भरपूर बुकिंग्ज असतील याची खात्री करण्यासाठी अर्ली बर्ड सवलत जोडा. 
  • त्याच दिवशीचे बुकिंग: गेस्ट्सना चेक इनच्या दिवशी बुकिंग करण्याची आणि अखेरची सवलत जोडण्याची परवानगी द्या. अधिक प्रवाशांना सामावून घ्या, जसे की एका ड्राईव्हच्या अंतरावर असणारे.
  • ट्रिपची किमान लांबी: तुमच्या लिस्टिंग्ज अल्पकालीन वास्तव्याच्या सर्चेसमध्ये दिसण्यास आणि तुमचे कॅलेंडर भरण्यास मदत करण्यासाठी तुमचा किमान वास्तव्य कालावधी कमी करा. 
  • ट्रिपची कमाल लांबी: तुमचा वास्तव्याचा कमाल कालावधी 28 रात्री किंवा त्याहून अधिक वाढवा, ज्यामुळे दीर्घकाळ वास्तव्याच्या सर्चेससाठी तुमच्या लिस्टिंग्ज पात्र ठरतात.

दीर्घकालीन वास्तव्ये Airbnb वर लोकप्रिय आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्ये बुक झालेल्या सर्व रात्रींपैकी, 28 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या रिझर्व्हेशन्सचे प्रमाण 18% होते.**

मोठ्या प्रमाणात बदल करणे

प्रत्येक लिस्टिंगमध्ये एकेक करून जाण्याऐवजी, मोठ्या प्रमाणात बदल करून तुमची उपलब्धता या कॅटेगरीजमध्ये ॲडजस्ट करा:

  • ट्रिपचा कालावधी
  • जास्त दिवस राहिल्यावर सवलत
  • कॅन्सलेशन धोरण

मोठ्या प्रमाणात बदल करून तुम्ही तुमच्या लिस्टिंग्जचे इतर पैलू या कॅटेगरीजमध्ये ॲडजस्ट करू शकता:

  • सुविधा
  • प्रॉपर्टीचा प्रकार
  • फी आणि शुल्क
  • लोकेशन
  • चेक इन पद्धत
  • स्टँडर्ड घराचे नियम
  • लोकेशनचा तपशील

मोठ्या प्रमाणात बदल करण्यासाठी:

  1. तुम्ही प्रोफेशनल होस्टिंग टूल्सना ऑप्ट इन केले आहे याची खात्री करा, जे फक्त डेस्कटॉपवर उपलब्ध आहेत.

  2. तुमच्या लिस्टिंग्जवर जा आणि तुम्हाला ज्या लिस्टिंग बदलायच्या आहेत त्या निवडा.

  3. बदल करा वर क्लिक करा.

  4. तुमचे बदल करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.

*जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीतील ॲक्टिव्ह लिस्टिंग्जच्या Airbnb डेटावर आधारित

**Airbnb 2023 च्या Q3 कमाईच्या सारांशानुसार

तुम्ही API-कनेक्टेड सॉफ्टवेअर वापरत असल्यास, तुमच्या प्रोव्हायडरने ही वैशिष्ट्ये इंटिग्रेट केल्यास, तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधून ती ॲक्सेस करू शकाल. तसे नसल्यास, ते कधी उपलब्ध होतील हे जाणून घेण्यासाठी तुमच्या प्रोव्हायडरशी संपर्क साधा.

पब्लिकेशननंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.

सेटिंग्ज आणि उपलब्धता अपडेट करणे
कार्यक्षमतेने होस्टिंग करण्यासाठी
सेटिंग्ज आणि उपलब्धता अपडेट करणे
Airbnb
4 जाने, 2024
हे उपयुक्त ठरले का?