प्रोफेशनल होस्ट्ससाठी अपग्रेड्स

तुमच्या कनेक्ट केलेल्या सॉफ्टवेअरमधून दैनंदिन कामे मॅनेज करा आणि लिस्टिंगची गुणवत्ता ट्रॅक करा.
Airbnb यांच्याद्वारे 26 मार्च, 2024 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
26 मार्च, 2024 रोजी अपडेट केले

एडिटरची टीपः हा लेख Airbnb 2023 समर रिलीजचा भाग म्हणून प्रकाशित झाला होता. त्याच्या पब्लिकेशननंतर कदाचित माहितीमध्ये बदल झालेला असू शकेल. अधिक जाणून घ्या आमच्या नवीनतम उत्पादन रिलीजबद्दल.

Airbnb 2023 समर रिलीज होस्ट्ससाठी 25 अपग्रेड्स, तसेच API - कनेक्टेड सॉफ्टवेअर वापरणाऱ्या होस्ट्ससाठी अतिरिक्त आठ अपग्रेड्ससादर करते. आपल्या लिस्टिंग्जची गुणवत्ता अधिक सहजतेने ट्रॅक करण्यात आणि आपल्या दैनंदिन होस्टिंग ऑपरेशन्सना सपोर्ट करण्यात मदत करण्यासाठी हे डिझाइन केले आहेत.

तुमच्या सॉफ्टवेअर प्रोव्हायडरने त्यांना इंटिग्रेट केले असल्यास, तुम्ही थेट तुमच्या सॉफ्टवेअरमधून सर्व आठ अपग्रेड्स ॲक्सेस करू शकाल. तसे नसल्यास, ते कधी उपलब्ध होतील हे जाणून घेण्यासाठी तुमच्या सॉफ्टवेअर प्रोव्हायडरशी संपर्क साधा.

चेक आऊटच्या सूचना

तुम्ही घराचे स्टँडर्ड नियम कसे लिहाल त्याचप्रमाणे तुमच्या सॉफ्टवेअरमधून तपशीलवार चेक आऊट सूचनाही ॲड करा. या सामान्य कामांमधून निवड करून त्वरित चेक आऊट लिस्ट तयार करा: 

  • वापरलेले टॉवेल्स गोळा करा
  • कचरा फेकून द्या
  • उपकरणे बंद करा
  • लॉक अप करा
  • किल्ल्या परत द्या

तुम्ही प्रत्येक कामासाठी तपशील जोडू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही असे निर्दिष्ट करू शकता की गेस्ट्सनी कचरा एका डब्यात आणि रिसायकल होणार्‍या वस्तू दुसर्‍या डब्यात टाकाव्या. तुम्ही अतिरिक्त विनंत्या देखील लिहू शकता, जसे की वापरानंतर ग्रिल कव्हर करणे. 

चेक आऊटच्या एक दिवस आधी आम्ही तुमची चेक आऊट वेळ आणि सूचनांसह गेस्ट्सना एक ऑटोमॅटिक रिमाइंडर पाठवू. तुमच्या घराच्या नियमांप्रमाणे, गेस्ट्स तुमची जागा बुक करण्यापूर्वी तुमच्या चेक आऊट सूचना वाचू शकतात. एकदा त्यांनी चेक आऊट केले की, ते निघाले आहेत हे ते एकाच टॅपने किंवा क्लिकने गेस्ट्स तुम्हाला कळवू शकतात.

रिव्ह्यू टॅग्ज

Airbnb 2022 विंटर रिलीजमध्ये, आम्ही गेस्ट्स आणि होस्ट्सना एकमेकांसाठी अधिक तपशीलवार अभिप्राय देण्याची क्षमता जोडली. तुम्ही दोघेही स्टार रेटिंग जोडू शकता-आणि काय चांगले होते किंवा काय आणखी चांगले होऊ शकले असते हे निर्दिष्ट करू शकता-अनेक कॅटेगरीजमध्ये. उदाहरणार्थ, गेस्ट्सनी तुमच्या कम्युनिकेशनला पाच स्टार्सचे रेटिंग दिल्यास ते “नेहमी प्रतिसाद देणारे” किंवा “उपयुक्त सूचना” असे रिव्ह्यू टॅग्ज निवडू शकतात. 

तुम्ही आता तुमच्या कनेक्ट केलेल्या सॉफ्टवेअरमधून ही वैशिष्ट्ये ॲक्सेस करू शकता. तुम्ही गेस्ट्सचे अधिक तपशीलवार रिव्ह्यूज देऊ शकाल आणि गेस्ट्सना काय आवडले आणि काय सुधारले जाऊ शकते याबद्दल फीडबॅक मिळवू शकाल.

लिस्टिंगच्या समस्या

तुमच्या लिस्टिंग्सपैकी एक होस्ट्ससाठीच्या मुख्य नियमांचे पालन करत नसल्यास, तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये समस्या असलेल्या अलीकडील ट्रिप्सचा लॉग सापडेल. उदाहरणार्थ, जर गेस्टने चेक इनला दोन स्टार्सचे रेटिंग दिले कारण त्यांना आत जाता आले नाही, तर तुमचा होस्टिंग नित्यक्रम सुधारण्यासाठी सुचवलेल्या अपडेट्ससह ते येथे लॉग केले जाईल.

येथे दिसणाऱ्या लिस्टिंग समस्या म्हणजे कमी रेटिंग्ज, ग्राहक सेवेवरील गेस्ट फीडबॅक किंवा होस्टकडून कॅन्सलेशन. तुमच्या लिस्टिंगचे सस्पेंशन किंवा ती डिलीट होण्याचा धोका आहे का हे देखील लॉगवरून तुम्हाला समजते.

मुख्य नियमांच्या नोटिफिकेशन्स

तुमच्या लिस्टिंग्सपैकी एक होस्ट्ससाठीच्या मुख्य नियमांचे पालन करत नसल्यास किंवा त्यांना ताकीद मिळाली असल्यास किंवा त्यांना सस्पेंशनचा किंवा काढण्याचा धोका असल्यास आम्ही तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअर प्रदात्याद्वारे ईमेल आणि पुश नोटिफिकेशन पाठवू. हे नोटिफिकेशन तुम्हाला लिस्टिंग समस्यांच्या लॉगवर पाठवेल, जे तुम्हाला कोणत्या समस्यांचे निराकरण कसे करावे या सूचनांसह, कोणत्या समस्या रिपोर्ट केल्या गेल्या ते दाखवते. 

सस्पेंशननंतर लिस्टिंग कधी रिॲक्टिव्हेट केली जाऊ शकते तसेच लिस्टिंग काढण्याविरुद्ध दाद कशी मागता येते याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही थेट Airbnb वर अपील करू शकता.

कॅटेगरीजची माहिती

Airbnb कॅटेगरी गेस्ट्सना जगभरात राहण्यासाठी लाखो अनोख्या जागा शोधण्यात मदत करतात. 60 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कॅटेगरीज त्यांची शैली, लोकेशन किंवा एखाद्या अ‍ॅक्टिव्हिटीच्या निकटतेनुसार जागांचे वर्गीकरण करतात.

आता तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधून तुमच्या प्रत्येक लिस्टिंग्ज कोणत्या Airbnb कॅटेगरीमध्ये आहेत ते शोधू शकता. होस्ट्सकडून या सोयीची सर्वाधिक मागणी होती आणि तुम्हाला तुमच्या लिस्टिंग्ज Airbnb वर कशा दाखवल्या जातात हे याद्वारे समजून घेता येईल.

अनुपालन नोटिफिकेशन्स

तुम्हाला आवश्यक कम्प्लायन्स फॉर्म पूर्ण करायचा असेल किंवा बिझनेसची इतर माहिती द्यायची असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या कनेक्ट केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये एक नोटिफिकेशन येईल. अतिरिक्त माहिती आवश्यक असल्यास तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये मेसेजेस देखील प्राप्त करू शकाल. स्थानिक कायद्यांचे पालन करण्यासाठी

आम्हाला Airbnb वर होस्ट्सची बिझनेस माहिती गोळा करणे आणि त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. हे अपडेट तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरमधून कम्प्लायन्स आवश्यकतांविषयी जागरूक आणि त्यांची पूर्तता करण्याची अनुमती देते.

परवानगी असलेल्या पाळीव प्राण्यांची संख्या

तुम्ही आम्हाला सांगितले की होस्टिंगसह तुम्हाला किती पाळीव प्राणी येऊ देणे सोयीस्कर आहे हे तुम्हाला नेमके स्पष्ट करायचे आहे. आता तुम्ही स्वागत करू इच्छित असलेल्या पाळीव प्राण्यांची जास्तीत जास्त पाच पर्यंत संख्या सहजपणे प्रविष्ट करू शकता.

नवीन लिस्टिंगचे प्रमोशन

तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधून गेस्ट्सना नवीन लिस्टिंग प्रमोशन देऊ इच्छित असल्याचेही आम्ही ऐकले आहे. तुम्ही नवीन लिस्टिंग तयार करता तेव्हा तुमच्या पहिल्या तीन बुकिंग्जवर 20% सवलतीचे प्रमोशन आपोआप लागू करा.

Airbnb
26 मार्च, 2024
हे उपयुक्त ठरले का?