तुमचे भाडे नियंत्रित करणे
आमच्या डेटानुसार वर्षातून किमान चार वेळा अपडेट केलेल्या किमतींच्या लिस्टिंग्जमध्ये नसलेल्यांच्या तुलनेत 30% पेक्षा अधिक रात्रींचे बुकिंंग झालेले आहे.*
एकाधिक लिस्टिंग्ज असलेले काही होस्ट्स आम्हाला सांगतात की, ते त्यांच्या किंमती वारंवार अपडेट करत नाहीत कारण त्यामध्ये वेळ जाऊ शकेल. विशिष्ट परिस्थितींमध्ये तुमचे रात्रीचे भाडे बदलण्याचा सवलती हा एक सोपा मार्ग आहे. आणि नियमांचे सेट्स तुम्हाला तुमचे भाडे धोरण कार्यक्षमतेने कस्टमाइझ करण्यात मदत करतात.
सवलती निवडणे
तुमच्या लिस्टिंग्जसाठी कोणती सवलत योग्य आहे हे निर्धारित करण्यासाठी, प्रत्येक सवलतीचे फायदे विचारात घ्या.
- जास्त दिवस राहिल्यावर सवलत: दोन दिवस ते 12 आठवड्यांपर्यंतच्या वास्तव्यांसाठी तुमचे भाडे कमी करा. यामुळे तुमच्या लिस्टिंग्जमध्ये वास्तव्याचा सरासरी कालावधी वाढू शकतो, टर्नओव्हर्स कमी होऊ शकतात आणि Airbnb सर्च रिझल्ट्समध्ये तुमच्या लिस्टिंगची रँकिंग सुधारण्यात मदत करू शकते.
- अखेरची सवलत: चेक इनची तारीख जवळ येताच तुमचे रात्रीचे भाडे कमी करा. हे कोणत्याही बुकिंग नसलेल्या रात्री भरण्यास आणि कमाई वाढवण्यात मदत करते.
- अर्ली बर्ड सवलत: चेक इनच्या एक ते 24 महिने आधी केलेल्या बुकिंग्जवर सवलत जोडा आणि आगामी हंगामांसाठी भरपूर बुकिंग्ज असणार याची खात्री करा.
- नवीन लिस्टिंग प्रमोशनः नवीन लिस्टिंग्जच्या पहिल्या तीन बुकिंग्जवर 20% ची सवलत द्या. बुक करण्यात आणि लवकरात लवकर रिव्ह्यू मिळवण्यात तुमच्या लिस्टिंग्जना मदत करा.
गेस्ट्सना सवलती कुठे मिळतील ते त्या सवलतीच्या टक्केवारीवर अवलंबून असते.
- 1% किंवा त्याहून अधिकः गेस्ट्सना तुमच्या लिस्टिंग्जवर (जर त्यांनी एकूण भाडे टॉगल चालू केले नसेल तर) आणि चेक आऊटच्या वेळेस लाइन-आयटम सवलतीचा ब्रेकडाऊन मिळेल.
- 10% किंवा त्याहून अधिक: गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये स्ट्राईकथ्रू भाड्यासह वरील सर्वकाही दिसून येते.
- 20% किंवा त्याहून अधिक: ज्या ज्या गेस्ट्सनी अलीकडेच तुमच्या भागातील लिस्टिंग्ज शोधल्या आहेत, त्यांना तुमच्या लिस्टिंग्ज Airbnb ईमेल्समध्ये तसेच वरील सर्व गोष्टींमध्ये दिसून येतात.
नोव्हेंबर 2023 पर्यंत, दीर्घकाळ वास्तव्यांसाठी बुक केलेल्या रात्रींपैकी सुमारे एक चतुर्थांश रात्री तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या ट्रिप्स होत्या. दीर्घकाळ वास्तव्यांमध्ये स्वारस्य असणारे गेस्ट्स सवलती असलेल्या लिस्टिंग्ज शोधतात.
भाडे आणि उपलब्धता नियम-संच वापरणे
तुम्हाला उपलब्ध असलेल्या सर्व तारखांना सवलत जोडायची नसल्यास, नियमांचे सेट्स तुम्हाला विशिष्ट घटकांनुसार तुमचे रात्रीचे भाडे आणि कॅलेंडर सेटिंग्ज ॲडजस्ट करण्याची परवानगी देतात. तुम्ही एक किंवा अनेक लिस्टिंग्जना नियमांचे सेट्स लागू करू शकता.
नियमांचे सेट्स कसे वापरावे हे ठरवताना वर्षाच्या वेळेचा विचार करा. उदाहरणार्थ, तुमच्या भागातील मागणी हंगामानुसार जर बदलत असेल. बुकिंग्ज सामान्यतः कमी होत असताना, तुम्ही तुमच्या सेटिंग्ज ॲडजस्ट करण्यासाठी एक नियमांचा सेट तयार करू शकता. अर्ली बर्ड्ससाठी आणि जास्त दिवसांच्या वास्तव्यावर तुम्ही सवलत देऊ शकता, तुमच्या वास्तव्याची कमाल लांबी वाढवा आणि त्याच दिवशीचे बुकिंग जोडून तुमच्या उपलब्ध असणाऱ्या तारखा बुक करण्याकरता गेस्ट्सना आकर्षित करा.
सवलतींव्यतिरिक्त, तुम्ही नियमांच्या सेटमध्ये या उपलब्धता सेटिंग्ज बदलू शकता.
- ट्रिप लांबी आवश्यकता: किमान आणि कमाल वास्तव्य सेट करा, जे तुम्ही दिवसानुसार कस्टमाइझ करू शकता.
- चेक इन आणि चेक आऊट आवश्यकता: गेस्ट्स चेक इन आणि चेक आऊट करणारे दिवस निवडा.
नियमांचे सेट ठरवणे
नियमांचे सेट्स वापरण्यासाठी, तुम्ही प्रोफेशनल होस्टिंग टूल्ससाठी ऑप्ट इन केले आहे याची खात्री करा. (जर तुमच्याकडे सहा किंवा अधिक लिस्टिंग्ज असतील, तर तुम्हाला आपोआप ऑप्ट इन केले जाईल.) हे टूल्स फक्त डेस्कटॉपवर उपलब्ध आहेत.
एक नवीन नियमांचा सेट तयार करण्यासाठी:
- तुमच्या मल्टी-कॅलेंडरवर जा.
- तुम्हाला नियमांचे सेट लागू करायच्या असलेल्या तारखा निवडा.
- पॅनेलमध्ये, नियमांची निवड करा.
- एक नवीन नियमांचा सेट तयार करा वर क्लिक करा.
- तुमच्या नियमांच्या सेटला नाव द्या (जसे की “पीक सीझन”).
- तुम्ही जोडू इच्छित असलेल्या नियमाच्यापुढे, कस्टमाइझ करा वर क्लिक करा.
- तुमचे भाडे आणि उपलब्धता नियम लिहा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
- नियम काढून टाकण्यासाठी, रद्द करा वर क्लिक करा.
विद्यमान नियमांच्या सेटमध्ये बदल करण्यासाठी:
- तुमच्या मल्टी-कॅलेंडरवर जा.
- नियमांच्या सेट्सवर क्लिक करा.
- तुम्हाला मॅनेज करायचे असलेल्या नियमांच्या सेटवर स्क्रोल करा, त्यानंतर बदल करा वर क्लिक करा.
सवलतींसाठी, नियमांचे सेट्सच्या आधी तुमच्या प्रति रात्र भाड्याचे नियमांचे सेट्स लागू होतील. स्मार्ट रेट चालू केल्यावरही नियमांचे सेट्स लागू होतील.
*जुलै 2022 पर्यंत, ॲक्टिव्ह लिस्टिंग्जच्या Airbnb डेटावर आधारित
तुम्ही API-कनेक्टेड सॉफ्टवेअर वापरत असल्यास, तुमच्या प्रोव्हायडरने ही वैशिष्ट्ये इंटिग्रेट केल्यास, तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधून ती ॲक्सेस करू शकाल. तसे नसल्यास, ते कधी उपलब्ध होतील हे जाणून घेण्यासाठी तुमच्या प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
पब्लिकेशननंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.