सवलती आणि नियमांचे सेट्स एकत्र करणे
तुम्ही एकापेक्षा जास्त सवलती ऑफर करता, सवलती आणि नियमांचे सेट एकत्र करता किंवा कस्टम प्रमोशन ऑफर करता तेव्हा तुमचे रात्रीचे भाडी कसे मोजले जाते हे अनेक घटकांवर अवलंबून असते.
सवलतींची प्राधान्ये कशी ठरवली जातात
तुम्ही एकाच कालावधीसाठी एकापेक्षा जास्त सवलती सेट केल्यास, प्रति रात्र फक्त एक सवलत लागू होईल. सर्वाधिक प्राधान्याची सवलत नेहमी लागू होईल आणि इतरांना ओव्हरराईड करेल.
सवलतींना या क्रमाने प्राधान्य दिले जाते:
- नवीन लिस्टिंगचे प्रमोशन
- कस्टम प्रमोशन
- जास्त दिवस राहिल्यावर सवलत
- अर्ली बर्ड सवलत
- अखेरची सवलत
उदाहरणार्थ:
- जुलैमध्ये तुमचे कस्टम प्रमोशन तुमच्या $120 USD च्या प्रति रात्र भाड्यावर 20% सवलत देते.
- तुमची मासिक जास्त दिवस राहिल्यावर सवलत तुमच्या $120 USD च्या प्रति रात्र भाड्यावर 30% सवलत देते.
- जुलैचा संपूर्ण महिना बुक करणाऱ्या गेस्टला तुमचे कस्टम प्रमोशन किंवा 20% सवलत मिळते, कारण तुमचे प्रमोशन तुमच्या मासिक जास्त दिवस राहिेल्यावरच्या सवलतीला ओव्हरराईड करते.
- तुमचे गेस्ट प्रति रात्र $96 USD देतात.
सवलती आणि नियमांचे सेट्स एकत्र करणे
एक नियमांचा सेट नेहमीच सर्वप्रथम लागू होतो. तुमच्या नियमांच्या सेटमधील किंमत वापरून कोणतीही अतिरिक्त सवलत मोजली जाते.
उदाहरणार्थ:
- जुलैमध्ये तुमचा नियमांचा सेट प्रति रात्र भाडे $120 USD ऐवजी $100 USD ऑफर करते.
- तुमचे कस्टम प्रमोशन 20% ची सूट देते.
- तुमच्या गेस्टला प्रति रात्र $100 USD वर 20% सूट मिळते, कारण तुमचा नियमांचा सेट तुमच्या कस्टम प्रमोशनच्या आधी लागू होतो.
- तुमचे गेस्ट प्रति रात्र $80 USD देतात.
नॉन-रिफंडेबल सवलत जोडणे
इतर सर्व सवलतींची गणना केल्यानंतर 10% नॉन-रिफंडेबल सवलत तुमच्या प्रति रात्र भाड्यावर लागू होते.
उदाहरणार्थ:
- जुलैमध्ये तुमच्या नियमांचा सेट प्रति रात्र भाडे $120 USD ऐवजी $100 USD ऑफर करते.
- तुमचे कस्टम प्रमोशन तुमच्या नियमांच्या सेटच्या भाड्यावर 20% किंवा प्रति रात्र $80 USD ची सूट देते.
- तुमचे गेस्ट नॉन-रिफंडेबल पर्यायाची निवड करतात आणि तुमच्या $80 USD च्या सवलतीच्या दरावर 10% सूट मिळवतात.
- तुमचे गेस्ट प्रति रात्र $72 USD देतात.
कस्टम प्रमोशन्सची गणना कशी केली जाते
तुम्ही कस्टम प्रमोशन सेट अप करता तेव्हा, तुमचे रात्रीचे भाडे तुमच्या 60 दिवसांच्या सरासरी भाड्यावर आधारित असते. तुम्ही प्रमोशन कालावधीसाठी सेट केलेली सर्व रात्रीची भाडी कमीपासून जास्तपर्यंत रांगेत असतात आणि मध्यभागी येणारे भाडे सरासरी भाडे मानतात.
उदाहरणार्थ:
- तुम्ही तुमच्या जागेचे भाडे 30 दिवसांसाठी $100 USD आणि मागील 60 दिवसांसाठी $125 USD इतके ठेवले आहे.
- Airbnb तुमची सरासरी किंमत, $ 112.50 USD मिळवण्यासाठी त्या दोन भाड्यांच्या सरासरीची गणना करते.
- तुमचे प्रमोशन तुमच्या सरासरी भाड्यावर ($ 112.50 USD) 20% ची सूट देते.
- तुमचे गेस्ट प्रति रात्र $90 USD देतात.
एका रात्रीसाठी 60 दिवसांच्या सरासरी भाडयाची माहिती उपलब्ध नसल्यास, ती कस्टम प्रमोशनसाठी किंवा अखेरच्या सवलतीसाठी पात्र ठरणार नाही. हे आवश्यक आहे की ती तारीख:
- सध्या अनब्लॉक आहे
- मागील 60 दिवसांपैकी 28 दिवस अनब्लॉक केलेली होती
- 90दिवसांपेक्षा कमी दिवसांवर आहे
काही भौगोलिक प्रदेशांमधील प्रमोशन्ससाठी स्ट्राइकथ्रू स्टाईलिंगसारखी काही मर्चंडायझिंग वैशिष्ट्ये प्रदर्शित केली जाऊ शकत नाहीत. कनेक्टेड API सॉफ्टवेअरद्वारे वास्तव्याच्या लांबीच्या रेकॉर्ड्सवर आधारित भाडे मॉडेल वापरून लिस्टिंग्जवर प्राधान्याची सवलत लागू होत नाही.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.