तुमचे Airbnb लिस्टिंग गेस्ट्ससाठी तयार आहे का?
रिमाइंडर्सची ही चेकलिस्ट तुम्हाला तुमची जागा तयार करण्यात मदत करू शकते.
Airbnb यांच्याद्वारे 19 जुलै, 2022 रोजी
19 जुलै, 2022 रोजी अपडेट केलेवाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
फार चांगले आदरातिथ्य म्हणजे पाहुण्यांना स्वच्छ, नीटनेटकी आणि चांगली देखभाल केलेली जागा उपलब्ध करून देणे. तुम्ही कमी दिवसांसाठी होस्टिंग करत असलात किंवा दीर्घ मुदतीसाठी, नेहमीची कामे करत असलात किंवा हंगामी, स्वतः कामे करत असलात किंवा व्यावसायिक लोकांकडून करवून घेत असलात, तुम्ही ही चेकलिस्ट वापरून तुमची जागा गेस्ट्ससाठी तयार करण्यासाठी आणि जागेला चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवण्यासाठी मदत मिळवू शकता.
सर्व वास्तव्यांसाठी
सर्व रूम्स:
- सर्व आवश्यक स्वच्छता पूर्ण झाली आहे
- लॉक बॉक्स किंवा डोअर कोड बदलला आहे
- सुरक्षा आयटम्स आहेत आणि ते चालू किंवा पूर्ण आहेत, जसे की:
- स्मोक अलार्म
- कार्बन मोनॉक्साईड अलार्म
- अग्निशमन उपकरण
- प्रथमोपचार किट
- फर्निशिंग्जचे नुकसान तपासले आहे—आणि त्यांची दुरुस्ती केली आहे किंवा रिप्लेस केले आहे
- लाँड्री मशीन्स स्वच्छ आहेत आणि लिंट ट्रॅप्स रिकामे केले आहेत
- सर्व बॅटरी रिचार्ज केल्या आहेत (आणि अतिरिक्त उपलब्ध केल्या आहेत)
- होस्टचे वैयक्तिक सामान लपवलेले आहे
बेडरूम्स:
- सर्व बेड्सवर प्रत्येक गेस्टसाठी किमान 1 उशी आहे
- सर्व बेड्ससाठी अतिरिक्त लिनन्स उपलब्ध आहेत
- गेस्ट्सना सामान, कपडे किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी जागा उपलब्ध आहे
बाथरूम्स:
- शॉवर शेल्फ्स आणि कॅडीज साबणाचे डाग किंवा गंजमुक्त आहेत
- अतिरिक्त टॉवेल्ससह सर्व टॉवेल धुतलेले आहेत
- बाथरूममधील इतर वस्तू गेस्टच्या वापरासाठी उपलब्ध आहेत, जसे की:
- टॉयलेट पेपर
- साबण
- शॅम्पू
- कंडिशनर
- हेअर ड्रायर
किचन:
- सर्व वस्तू स्वच्छ आहेत आणि गेस्टच्या वापरासाठी उपलब्ध आहेत, जसे की:
- कुकवेअर आणि भांडी
- प्लेट्स, वाट्या, ग्लासेस, मग्ज आणि फ्लॅटवेअर
- मीठ, मिरपूड आणि खाद्यतेल
- कॉफी/चहा आणि कॉफी मेकर किंवा चहाची किटली
- डिश टॉवेल्स, फडके किंवा स्पंज आणि साबण
- मागील गेस्टने सोडलेले कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेये काढून टाकली आहेत
होम ऑफिस:
- वायफाय कनेक्शन चालू आहे, पासवर्ड आणि रिसेट सूचना राऊटरच्या शेजारी आहेत
- कॉम्प्युटर मॉनिटर, प्रिंटर आणि कॉर्ड्स आहेत आणि त्या चालू आहेत
- टीव्ही रिमोट आणि इतर कंट्रोल्स सहज सापडतील अशा जागी आहेत
- सर्व डिव्हाईसेस वैयक्तिक अकाऊंट्समधून (होस्ट किंवा मागील गेस्टच्या) लॉग आउट केलेली आहेत
- घड्याळे स्थानिक वेळेनुसार अचूक सेट केली आहेत
आऊटडोर भाग:
- पोर्च आणि इतर लाइटिंग मार्गाला प्रकाशित करतात
- पॅटिओमधील फर्निचर गंज, धूळ आणि कोळ्यांच्या जाळ्यांपासून मुक्त आहे
- ग्रिल स्वच्छ आहे आणि त्यात गॅस किंवा कोळशाचा साठा आहे
- पूल किंवा जकूझी वापरण्यासाठी तयार आहे
- सीझनल गिअर स्वच्छ आणि ॲक्सेस करण्यास सोपे आहे, जसे की
- : प्रवेशद्वारांवरील डोअरमॅट्स
- बर्फ हटवण्यासाठी फावडे
- छत्री स्टँड
दीर्घकाळ वास्तव्यांसाठी आणि रूटीन देखभालीसाठी
- स्वच्छता पुरवठा उपलब्ध आहे, तसेच एक पोछा, झाडणी आणि डस्टपॅन
- घरगुती प्रणाली कार्यक्षमतेने कार्यरत आहे, यासह:
- स्मार्ट लॉक (पूर्णपणे चार्ज, हाईड-अ-की बॅकअपसह)
- हीटिंग आणि कूलिंग, थर्मोस्टॅट आणि एअर फिल्टर्स
- केबल टीव्ही, इंटरनेट आणि वायफाय
- प्लंबिंग (सर्व ड्रेन्स आणि टॉयलेट्स)
- अलार्म्स आणि सिक्युरिटी डिव्हाईसेस
- पूल किंवा जकूझी फिल्टर आणि हीटर
- गार्डन स्प्रिंकलर्स आणि टाइमर्स
- सर्व उपकरणे स्वच्छ आणि कार्यरत आहेत, कोणतेही गहाळ किंवा खराब झालेले भाग नाहीत, यासह:
- ओव्हन, स्टोव्हटॉप आणि रेंज हूड आणि फिल्टर
- मायक्रोवेव्ह
- डिशवॉशर
- रेफ्रिजरेटर, फ्रीजर आणि बर्फाचे ट्रेज
- वॉशर आणि ड्रायर
- वॉटर हीटर
- फायरप्लेस, पोकर आणि स्पेडसह
- सीलिंग आणि बाथरूम फॅन्स
- गॅरेजच्या दरवाज्याचे ओपनर
- सेवा शेड्युल्स अप टू डेट आहेत, तसेच तुम्ही तुमच्या गाईडबुकमध्ये ऑफर करत असलेल्या किंवा शिफारस करत असलेल्या पर्यायी सेवांविषयी कोणतीही माहिती, यासह:
- कचरा आणि रीसायकलिंग कलेक्शन
- रस्त्याची स्वच्छता
- गार्डनर्स
- मेल (तुम्ही साईटवर राहत नसल्यास स्थगित केलेले)
- फ्रीज रीस्टॉक करणे
- ऑफिस सप्लाय रीस्टॉकिंग, जसे की प्रिंटर इंक आणि पेपर
- लाँड्री सेवा आणि ड्राय क्लीनिंग
- बेबीसिटिंग
- पाळीव प्राणी सांभाळणे
Airbnb
19 जुलै, 2022
हे उपयुक्त ठरले का?