Airbnb वर पैसे कसे कमावायचे
तुमच्याकडे—किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडे—शहराबाहेर असताना भाड्याने द्यायला एखादी स्पेअर रूम, दुसरे घर किंवा अपार्टमेंट असेल तर, Airbnb तुमची जागा लिस्ट करणे आणि जगभरातील लोकांबरोबर कनेक्ट करणे सोपे करते. पण तुम्ही Airbnb वर पैसे कसे कमवाल?
- तुमची जागा लिस्ट करून सुरुवात करा—हे विनामूल्य आहे आणि Airbnb तुमच्या प्रति रात्र भाड्याची केवळ एक लहान टक्केवारी गोळा करते
- तुम्हाला कोणत्या प्रकारचे होस्ट व्हायचे आहे ते निवडा (यावर अधिक माहिती खाली आहे)
- तुम्हाला किती शुल्क आकारायचे आहे ते निवडा
तुमच्यासाठी होस्टिंग योग्य आहे की नाही याची अजूनही खात्री नाही? या 5 होस्ट्सनी त्यांच्यासाठी होस्टिंग काय आहे आणि होस्टिंगच्या टिप्सही शेअर करण्यासाठी त्यांचे दरवाजे खुले केले आहेत.
एलिस: हौशी होस्ट
अटलांटामधील एक यशस्वी छायाचित्रकार आणि लघु बिझनेस मालक असणाऱ्या सुपरहोस्ट एलिस या एक नवीन क्रिएटिव्ह उपक्रमाच्या शोधात होत्या. अधूनमधून त्यांच्या लहानशा घराचे होस्टिंग, हे ती इच्छा पूर्ण करण्याचा एक मार्ग बनला आणि त्यामुळे त्यांना घराचे पेमेंटदेखील करण्याची मुभा मिळाली.
जेव्हा एलिस आणि त्यांचे पती झाडी झुडपातील त्यांच्या छोट्या घराचा आनंद घेत नाहीत, तेव्हा ते या आरामदायी जागेत गेस्ट्सना होस्ट करतात. हे छोटे घर आता या जोडप्यासाठी पैसे कमावण्याचा आणखी एक मार्ग आहे, जी त्यांच्या प्रवासासाठी आणि दुसऱ्या छोट्या घरासाठी गुंतवणूक आहे.
एलिस यांच्या होस्टिंग टिप्स:
- फक्त सुरू करा—तुम्ही कधीही 100% तयार असत नाही, परंतु तुम्ही विनामूल्य तुमची जागा लिस्ट करू शकता
- खर्चात कपात करण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांना त्यांची कौशल्ये शेअर करण्यास सांगा—जसे की एखादा गळत असलेला नळ दुरुस्त करणे किंवा सजावट करण्यात मदत करणे
- तुम्ही तुमच्या जागेजवळ राहत नसल्यास, चेक इन्स हाताळण्यात तुम्हाला मदत करू शकेल अशी एखादी व्यक्ती शोधा
शिन्या: एक पार्ट टाईम होस्ट
ओसाका, जपान येथील होस्ट सल्लागार बोर्डाचे सदस्य आणि पार्ट-टाइम सुपरहोस्ट शिन्या यांच्यासाठी, होस्टिंग हा त्याच्या कुटुंबाच्या नैसर्गिक फायबर्स बिझनेसचे संचालक म्हणून पूर्णवेळेच्या नोकरीतून एक स्वागतार्ह ब्रेक आहे.
“होस्टिंग मला खूप रिफ्रेशिंग वाटते,” शिन्या म्हणतात. “यामुळे मला जगभरातील लोकांशी संपर्क साधता येतो—मला माझ्या नेहमीच्या कामात असे काही करता येत नाही.”
दुसर्या एका फॅमिली होमचे नूतनीकरण केल्यानंतर शिन्या यांनी 2016 मध्ये होस्टिंगला सुरुवात केली. हे घरही त्यांच्या त्याच प्रॉपर्टीवर आहे, ज्यामुळे त्यांना ऑफिसच्या जबाबदार्या सांभाळून दोन गेस्ट्सच्या दरम्यान जागा सहजपणे तयार करता येते.
“मी नेहमीच्या कामानंतर माझ्या फावल्या वेळेचा उपयोग गेस्ट्सना प्रतिसाद देण्यासाठी करतो आणि त्यांना आवश्यक असलेले सर्व काही आहे याची खात्री करतो,” शिन्या म्हणतात. “गेस्ट्सना त्यांची काळजी घेतली जात आहे असे वाटणे महत्त्वाचे आहे आणि यातून मला खूप आनंद मिळतो.”
शिन्या यांच्या होस्टिंग टिप्स:
- अधिक गेस्ट्सना आकर्षित करण्यासाठी आणि बुकिंग्ज वाढवण्यासाठी तुमच्या जागेतच तुमची सुरुवातीची कमाई गुंतवा
- ज्या आठवड्यांमध्ये तुम्ही दोन गेस्ट्सच्या दरम्यान स्वतः स्वच्छता करू शकणार नाही, त्यावेळी स्वच्छतेसाठी एखाद्या व्यक्तीला नियुक्त करा
- गेस्ट्सच्या मेसेजेसना सहजपणे प्रतिसाद देण्यासाठी Airbnb ॲप वापरा
स्टार: एक पूर्ण-वेळ होस्ट
शार्लोट, नॉर्थ कॅरोलिना येथील सुपरहोस्ट स्टार ही फायनान्स आणि रिअल इस्टेटमधील धावपळीचे करिअर आणि बाल संगोपन यांच्यात संतुलन साधण्याच्या प्रयत्नात थकून गेली होती आणि एक बदल शोधत होती. वीकेंड्स आरामात जावेत म्हणून सतत स्थानिक रीट्रीटमध्ये जाणारी स्टार आणि तिचा नवरा ब्रायन यांनी स्वतःलाच विचारले, “आपल्यालाच अशी जागा निर्माण करता येणे शक्य आहे का?”
या जोडप्याने वर्षानुवर्षे घरांची रिनोव्हेशन्स करून आणि रिअल इस्टेटची खरेदी-विक्री करून कमावलेल्या अनुभवाचा बळावर ही जोखीम घेण्याचे ठरवले आणि त्यांच्या प्रॉपर्टीजपैकी एक Airbnb वर लिस्ट केली. आज Old Haigler Inn हे त्यांचे बुटीक हॉटेल आणि रीट्रीट स्पेस यशाकडे वाटचाल करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांची 5 घरे शार्लोट क्षेत्रात लिस्ट केलेली आहेत.
अखेरीस स्टार त्यांच्या होस्टिंग बिझनेससाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी फायनान्समधली आपली नोकरी सोडू शकली. “जिथे कुटुंबं कनेक्ट होऊ शकतील अशी जागा मी त्यांना देऊ शकते, ही जाणीव मला सुख देते,” स्टार तिच्या वाढत्या व्यवसायाबद्दल सांगते.
स्टार यांचे होस्टिंग सल्ले:
- तुम्ही काय आकारता ते तुमच्यावर अवलंबून असल्याने, सुरुवात कमी आकारण्यापासून करा आणि तुम्हाला काही चांगले रिव्ह्यूज मिळाल्यानंतर त्यास वाढवा
- तुमच्या प्रदेशात इतर होस्ट्स किती शुल्क आकारतात ते शोधा
- गेस्ट्स दरम्यान तुमची जागा तयार करण्यासाठी किती खर्च येईल याची गणना करा आणि त्यानुसार शुल्क जोडा
पार्थ: को-होस्ट
“मला नेहमीच प्रवाशांना होस्ट करायचे होते आणि त्यांना शहर दाखवायचे होते, म्हणून मी विचार केला, ‘Airbnb वापरून का पाहू नये?’” कॉनास, लिथुआनिया येथील होस्ट पार्थ म्हणतात. “माझ्या अपार्टमेंटचे लोकेशन अतिशय उत्तम आहे आणि माझ्याकडे एक गेस्ट रूम आहे.”
पार्थला हा अनुभव इतका आवडला की, जेव्हा एका मैत्रिणीने त्याला तिच्या अनेक प्रॉपर्टीजसाठी को-होस्ट व्हायला आवडेल का असे विचारले तेव्हा, त्याने उत्साहाने होकार दिला. “माझे कामाचे वेळापत्रक खूप लवचिक आहे, म्हणून मी माझ्या को-होस्टिंग जबाबदार्या आवश्यकतेनुसार सांभाळू शकतो—जसे की स्वच्छता कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, गेस्ट्सशी संवाद साधणे,” ते म्हणतात.
पार्थ आता को-होस्टिंगवर लक्ष केंद्रित करत आहेत—ते आता स्वतःची जागा लिस्ट करत नाहीत—आणि ही संधी मिळाल्याबद्दल ते आभारी आहेत. “मला Airbnb च्या माध्यमातून अनेक कमालीच्या लोकांना भेटता येते,” ते म्हणतात. “मी नेहमीच इतरांना सांगत असतो, होस्टिंग कम्युनिटीचा भाग होण्यासाठी तुम्हाला तुमची स्वतःची जागा लिस्ट करण्याची गरज नाही.”
पार्थ यांच्या होस्टिंग टिप्स:
- लिस्टिंगचे वर्णन प्रामाणिकपणे लिहा, जेणेकरून गेस्ट्स योग्य अपेक्षा ठेऊ शकतील आणि चांगले रिव्ह्यू मिळण्यास मदत होईल
- कर आणि स्थानिक नियम याबाबत मदत करण्यासाठी प्रशिक्षित व्यावसायिकांना विचारा
- तुमची पेमेंट्स, किंवा ज्यांना आम्ही पेआऊट्स म्हणतो ती मिळवण्यासाठी एक पेआऊट पद्धत निवडा (Airbnb तुमच्या गेस्ट्सच्या शेड्युल केलेल्या चेक इन वेळेनंतर 24 तासांनी तुमचे पेआऊट पाठवते, परंतु तुम्ही कोणती पेआऊट पद्धत निवडली आहे आणि तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून ते मिळण्यास 7 दिवस लागू शकतात)
बर्ट: एका अनुभवाचे होस्ट
Airbnb वर होस्ट बनण्यासाठी तुम्हाला एखादी प्रत्यक्षातील जागा लिस्ट करण्याची गरज नाही. जगभरातील व्यक्ती अनुभवांचे होस्ट्स म्हणून Airbnb कम्युनिटीमध्ये सामील होत आहेत. या व्यक्ती गेस्ट्सना राहण्यासाठी जागा देत नाहीत—ते प्रवाशांना स्थानिक संस्कृतीशी एकरूप होता येईल अशा मजेदार, आकर्षक ॲक्टिव्हिटीज होस्ट करतात.
“माझ्या अनुभवाचे नाव आहे ग्रॅमी विजेत्यासह संगीत मार्गदर्शन,” बर्ट म्हणतात. “मी माझ्या संगीत स्टुडिओमध्ये एकावेळी एकाच व्यक्तीसह सेशन होस्ट करतो जिथे मी लोकांना त्यांची संगीत निर्मिती आणि अभियांत्रिकीची कौशल्ये, रॅपिंग शैली, गायक/गीतकार क्षमता, डीजेईंग कौशल्य सुधारण्यासाठी मदत करतो आणि इतर बरेच काही करतो.”
एका अनुभवाचा होस्ट असल्याने बर्ट स्वतःचे उत्पन्न वाढवताना इतरांना त्यांची सर्जनशील क्षमता वाढवण्यात मदत करू शकतो.
“Airbnb वर तुमच्या स्वतःच्या आवडीची गोष्ट करणे हे खरोखर तुमचा स्वतःचा बिझनेस चालवण्यासारखे आहे,” बर्ट म्हणतात. परंतु सामान्यतः जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करता तेव्हा तुम्हाला बिझनेस लायसन्स किंवा कर्ज मिळवावे लागते, तुमच्याकडे थोडे भांडवल असावे लागते आणि बऱ्याच लोकांसाठी हे मर्यादा आणणारे ठरू शकते. पण Airbnb वर तुम्ही एक कल्पना आणि $10 [USD] घेऊन सुरू करू शकता.
Airbnb वर होस्ट म्हणून पैसे कसे कमवायचे याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का?