2024 अपडेट
भेदभावाविरुद्ध लढा देणे आणि सर्वांसाठी प्रवास अधिक खुला करणे
प्रोजेक्ट लाईटहाऊस
2020 मध्ये सुरू केलेले प्रोजेक्ट लाईटहाऊस हे आम्ही अमेरिकेत वापरत असलेले एक असे टूल आहे जे वेगवेगळ्या समजल्या गेलेल्या वंशांच्या युजर्सना Airbnb वापरताना येणाऱ्या अनुभवांमधील संभाव्य असमानता शोधण्यात आणि त्या दूर करण्यात मदत करते. प्रोजेक्ट लाईटहाऊस आम्ही अनेक अग्रगण्य नागरी हक्क आणि गोपनीयता संस्थांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केले आहे. अधिक जाणून घ्या
वास्तविक डेटा वापरत आहे
गेस्ट्स आणि होस्ट्स आमचा प्लॅटफॉर्म कसा वापरतात हे आम्ही तपासतो. सांख्यिकीय विश्लेषणांमुळे आम्हाला Airbnb सर्वांसाठी अधिक खुले करण्याच्या संधी शोधण्यात मदत होते.
गोपनीयतेचे संरक्षण करणे
आम्ही ट्रेंड्सचे एकंदरीत विश्लेषण करतो आणि विशिष्ट लोकांशी किंवा अकाऊंट्सशी समजुतीवर आधारित वंशाबद्दलची माहिती जोडत नाही.
सतत सुधारणा करणे
आमची टीम Airbnb ला अधिक खुले आणि समान बनवण्याचे नवीन मार्ग ओळखण्याचे प्रयत्न सतत करत असते.
आमचे चालू असलेले काम
तात्काळ बुकिंग अधिक लोकांसाठी ॲक्सेसिबल करणे
तात्काळ बुकिंग—एक असे वैशिष्ट्य ज्यामुळे होस्ट्सनी रिझर्व्हेशनची विनंती मंजूर करणे आवश्यक राहत नाही, गेस्ट्सना त्याशिवाय लिस्टिंग बुक करता येते—हे एक महत्त्वाचे टूल आहे जे बुकिंग्ज अधिक वस्तुनिष्ठपणे होण्यासाठी सपोर्ट करून त्यायोगे बुकिंग प्रक्रियेमधील संभाव्य भेदभाव कमी करण्यात मदत करू शकते. अलीकडील बदलांमुळे Airbnb वर सकारात्मक ट्रॅक रेकॉर्डची अधिक समग्र व्याख्या करता येते आणि त्यामुळे तात्काळ बुकिंगद्वारे रिझर्व्हेशन्स यशस्वीरीत्या बुक करणाऱ्या गेस्ट्सची संख्या वाढण्यात मदत झाली आहे.
होस्ट्सना बुकिंगच्या विनंत्यांना प्रतिसाद देण्यात मदत करणे
होस्ट्सना बुकिंगच्या विनंत्यांना वेळेवर प्रतिसाद देण्यात मदत करणाऱ्या नवीन पायऱ्यांमुळे बुकिंगच्या यशाचा दर देखील वाढला. या बदलांमध्ये होस्ट्ससाठी प्रलंबित रिझर्व्हेशनच्या विनंत्या अधिक ठळकपणे दाखवणे समाविष्ट आहे. यामुळे पूर्वी अनुत्तरीत राहणाऱ्या रिझर्व्हेशनच्या विनंत्यांची संख्या कमी झाली आणि याचा परिणाम म्हणून, राहण्याच्या जागेचे यशस्वीरीत्या बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सची संख्या वाढली.
Airbnb वर सकारात्मक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी गेस्ट्सना मदत करणे
रिव्ह्यूज मिळालेल्या गेस्ट्सचे बुकिंग यशस्वी होण्याचा रेट जास्त असतो. आम्ही आता गेस्ट्सना त्यांच्या रिझर्व्हेशनमध्ये Airbnb अकाऊंट्स असणारे सह-प्रवासी जोडणे सुलभ केले आहे, ज्यामुळे हे सह-प्रवासी त्यांनी वास्तव्य बुक केलेले नसतानाही रिव्ह्यूज मिळवू शकतात.
होस्ट्स आणि गेस्ट्सना त्यांच्या पूर्ण वास्तव्यादरम्यान सपोर्ट करणे
आम्ही होस्ट्स आणि गेस्ट्सना, त्यांचे कायदेशीर नाव कन्फर्म केल्यानंतर, त्यांच्या प्रोफाईलवर त्यांची पसंतीची नावे प्रदर्शित करण्याची परवानगी देणारे एक नवीन वैशिष्ट्य सादर केले आहे. रिव्ह्यूमध्ये चुकीच्या सर्वनामांद्वारे ओळखले जाणे रिपोर्ट करणाऱ्या होस्ट्स किंवा गेस्ट्ससाठीची प्रक्रियादेखील आम्ही सुधारत आहोत. जर होस्ट किंवा गेस्टने ही चिंता व्यक्त केली तर सर्वनाम युजरच्या पसंतीच्या नावाद्वारे बदलले जाते.
आमची धोरणे आणि प्रक्रिया मजबूत करणे
बुकिंगची विनंती नाकारण्याच्या स्वीकार्य आणि अस्वीकार्य कारणांबद्दल होस्ट्सना माहिती देण्यात मदत करण्यासाठी, होस्ट्सने रिझर्व्हेशनची विनंती नाकारण्याची प्रक्रिया आम्ही सुधारली आहे. आम्ही आमचे भेदभाव-विरोधी धोरण अधिक प्रभावी बनवण्यासाठी अपडेट केले आहे आणि जातीय भेदभावाविरुद्ध नवीन संरक्षणे समाविष्ट केली आहेत. शेवटी, होस्टनी विद्यमान रिझर्व्हेशन कॅन्सल करताना निष्पक्षता वाढवण्यात मदत करण्यासाठी आम्ही अनेक बदलांची अंमलबजावणी करत आहोत.
Airbnb वर उपलब्ध असलेल्या आर्थिक सबलीकरणाच्या संधींबद्दल अधिक माहिती शेअर करणे
आम्ही Airbnb उद्योजकता अकॅडमीचा विस्तार करत आहोत, जी Hispanic Wealth Project, American Indian Alaska Native Tourism Association, Brotherhood Crusade, आणि United Spinal Association यांच्यासह इतर संस्थांच्या भागीदारीत विविध आणि ऐतिहासिकदृष्ट्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या कम्युनिटीजमधील लोकांना आमच्या प्लॅटफॉर्मवरील होस्टिंगचा परिचय करून देते. आम्ही Operation HOPE च्या 1 Million Black Businesses (1MBB) उपक्रमामध्ये देखील भाग घेणे सुरू ठेवत आहोत, जो कृष्णवर्णीय उद्योजकांना त्यांचे बिझनेसेस सुरू करण्यासाठी, वाढवण्यासाठी किंवा स्केल करण्यासाठी सपोर्ट आणि प्रशिक्षण देतो.
चालण्या-फिरण्यासाठी विशेष गरजा असलेल्या गेस्ट्ससाठी आमची वचनबद्धता सुरू ठेवणे
आमचे ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्य सर्च फिल्टर्स गेस्ट्ससाठी त्यांच्या गरजा पूर्ण करणारी वास्तव्ये शोधणे आणि बुक करणे सुलभ करतात. ॲक्सेसिबिलिटी रिव्ह्यूद्वारे, आम्ही होस्ट्सनी सबमिट केलेले प्रत्येक ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्य अचूकतेसाठी तपासतो.
भेदभावाशी लढण्यासाठीची आमची वचनबद्धता
2016 मध्ये पहिल्या काही सिव्हिल राईट्स ऑडिट्सपैकी एक ऑडिट, 2019 मध्ये अतिरिक्त अपडेट, 2020 मध्ये प्रोजेक्ट लाईटहाऊसची घोषणा आणि प्रोजेक्ट लाईटहाऊस डेटाचा आमचा 2022 चा प्रारंभिक रिलीझ यासह अनेक उपाययोजनांद्वारे भेदभावाविरोधात लढण्याच्या इतिहासाला अनुसरून होणारे हे काम आहे. या अपडेट्समध्ये Airbnb वर यशस्वी होण्यासाठी सर्वांना सपोर्ट करणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि प्रयत्नांचा समावेश आहे.
Airbnb कम्युनिटीचे नियम
2016 पासून, Airbnb चा वापर करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही Airbnb कम्युनिटीच्या नियमांना सहमती देऊन इतरांशी आदराने आणि विवेकबुद्धीने किंवा निःपक्षपातीपणाने वागण्यास वचनबद्ध राहण्यास सांगितले आहे. सहमती न देणाऱ्या व्यक्तीला आमच्या प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस नाकारला जातो किंवा प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जाते.
मी कम्युनिटीमधील प्रत्येकाशी—त्यांचा वंश, धर्म, मूळ देश, वांशिकता, त्वचेचा रंग, दिव्यांगता, लिंग, लिंग ओळख, लैंगिक अभिमुखता किंवा वय हे काहीही असो—आदराने आणि विवेकबुद्धीने किंवा निःपक्षपातीपणाने वागेन.
2024 चा रिपोर्ट वाचा
2024 च्या प्रोजेक्ट लाईटहाऊस अपडेट मध्ये प्रोजेक्ट लाईटहाऊसचे प्रमुख निष्कर्ष आणि आमचा संपूर्ण डेटा सेट आणि आम्ही 2016 पासून केलेली प्रगती समाविष्ट आहे.
आमच्या पार्टनर्सना भेटा
प्रोजेक्ट लाईटहाऊसमध्ये आम्हाला सल्ला देणाऱ्या या भागीदारांसह, आम्ही आघाडीच्या नागरी हक्क गटांशी आणि गोपनीयता संस्थांशी सल्लामसलत आणि सहयोग करतो.