Airbnb वर ॲक्सेसिबिलिटी

आमच्याबरोबर प्रवास करणे आम्ही अशा प्रकारे सोपे करत आहोत.

सुधारित सर्च फिल्टर्स

आणखी चांगला सर्च अनुभव देण्यासाठी आम्ही आमचे ॲक्सेसिबिलिटी फिल्टर्स सुलभ केले आहेत.
मोबाईल फोनवर 'आणखी फिल्टर्स'चा ओव्हरले दिसतो जो त्यासारख्या अनेक सर्च फिल्टर्सपैकी एक आहे. तिथे “ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये” असे शीर्षक असलेला एक विभाग आहे. त्या खाली ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांची “गेस्टसाठीचे प्रवेशद्वार आणि पार्किंग” यांसारख्या गटांमध्ये विभागणी केली आहे. तिथे चेकबॉक्सेस आहेत जिथे तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी वैशिष्ट्ये निवडू शकता.

ॲक्सेसिबिलिटीचा आढावा

वास्तव्यांच्या होस्ट्सनी सबमिट केलेल्या प्रत्येक ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्याच्या अचूकतेचा आम्ही आढावा घेतो.
एक मोबाईल फोन एका Airbnb लिस्टिंगच्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांचा एक ग्रुप दाखवतो आहे. पहिल्या वैशिष्ट्यामध्ये “गेस्ट्ससाठी पायऱ्यांशिवाय प्रवेशद्वार” असे लिहिले आहे, ज्यामध्ये खाली त्या वैशिष्ट्याशी संबंधित असलेल्या इमेजेस आहेत. खाली आणखी एक ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये “32 इंचापेक्षा जास्त रुंद गेस्ट प्रवेशद्वार” असे लिहिले असून खाली संबंधित इमेज आहे.

होस्ट्ससह थेट मेसेजिंग

होस्ट्सच्या वास्तव्याच्या किंवा अनुभवाच्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांविषयी अधिक माहितीसाठी त्यांच्याशी थेट बोला.
एका मोबाईल फोनवर होस्ट आणि गेस्टमधील मेसेजेस दाखवले गेले आहेत ज्यात होस्ट त्यांच्या लिस्टिंगचे वर्णन ती ॲक्सेसिबल आहे असे करतात आणि गेस्टना त्यांच्या जागेबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. गेस्टच्या मेसेजमध्ये असे लिहिले आहे: “हॅलो शिया, रॅम्प तुमच्या घराच्या पुढच्या प्रवेशद्वारावर आहे की मागच्या?” होस्टने प्रतिसादात असे लिहिले आहे: “हॅलो अ‍ॅडम, रॅम्प समोरच्या बाजूला आहे. धन्यवाद!”
एका ॲक्सेसिबल Airbnb घरात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या स्मितहास्य करत आहेत आणि हसत आहेत. कुटुंबातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीसमोर व्हीलचेअर आहे.

Airbnb चे डिजिटल ॲक्सेसिबिलिटी स्टेटमेंट ऐका

Airbnb वर डिजिटल ॲक्सेसिबिलिटी

Airbnb आमच्या वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन्ससाठी युरोपियन ॲक्सेसिबिलिटी ॲक्ट आणि वेब कंटेंट ॲक्सेसिबिलिटी गाईडलाईन्स (WCAG) 2.1 लेव्हल AA चे पालन करण्याचा प्रयत्न करते.

आम्ही कसे काम करतो

  • आमच्या डिझाईन आणि इंजिनिअरिंग प्रक्रियांमध्ये डिजिटल ॲक्सेसिबिलिटीच्या सर्वोत्तम पद्धती समाविष्ट करून
  • आमच्या कर्मचाऱ्यांना सतत अ‍ॅक्सेसिबिलिटीचे प्रशिक्षण आणि संसाधने देऊन
  • अंतर्गत आणि बाह्य क्वालिटी अ‍ॅशुरन्स टेस्टर्सचा सक्रीय सहभाग ठेवून
  • आमच्या वेबसाईटवर आणि अ‍ॅप्लिकेशन्समध्ये डिजिटल ॲक्सेसिबिलिटीशी संबंधित समस्यांचे निरीक्षण आणि निराकरण करण्यासाठी एक समर्पित क्रॉस-फंक्शनल टीम राखून
  • डिजिटल ॲक्सेसिबिलिटीशी संबंधित समस्यांवर आमच्या ग्राहक सपोर्ट एजंट्सना प्रशिक्षण देऊन

फीडबॅक

आम्ही Airbnb च्या डिजिटल ॲक्सेसिबिलिटी पद्धतींवरील तुमच्या फीडबॅकचे स्वागत करतो. कनेक्ट करण्यासाठी कृपया आम्हाला digital-accessibility@airbnb.com वर ईमेल करा. डिजिटल ॲक्सेसिबिलिटी व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रश्नांसाठी Airbnb कम्युनिटी सपोर्टशी संपर्क साधा.

समर्पित टीम्स

Airbnb मध्ये अशा टीम्स आहेत ज्या सर्वजण वापरू शकतील अशी उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतात. आमची उत्पादने ॲक्सेसिबिलिटी लक्षात घेऊन तयार केली गेली आहेत हे सुनिश्चित करण्यात मदत करण्यासाठी या टीम्स संपूर्ण कंपनीतील इंजिनिअर्स, डिझायनर्स आणि इतरांसह काम करतात.

आमची डिजिटल ॲक्सेस वैशिष्ट्ये

आम्ही सर्व ब्राऊझर्स आणि डिव्हाईसेसवर ॲक्सेसिबल अनुभव डिझाईन करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

ॲक्सेसिबिलिटीला समर्थन देण्यासाठी, आम्ही यांच्यासह काम करतो:

United Spinal Association चा लोगो
National Council on Independent Living चा लोगो
American Association of People with Disabilities चा लोगो
Red Costarricense de Turismo Accesible चा लोगो

आम्ही मदतीसाठी हजर आहोत

अधिक माहितीसाठी आमच्या मदत केंद्रावर जा.