Airbnb होस्ट्सकडून किती शुल्क आकारते?
सेवा शुल्कामुळे Airbnb ला होस्ट्सना सपोर्ट करण्यात आणि पेमेंट प्रोसेसिंग, मार्केटिंग आणि ग्राहक सेवा यांसारख्या गोष्टींचा खर्च भरून काढण्यात मदत होते.
ते म्हणजे तुमच्या प्रति रात्र भाड्यातील काही टक्के रक्कम आणि त्याव्यतिरिक्त तुम्ही जोडलेले कोणतेही शुल्क असतात, जसे की स्वच्छता शुल्क. तुमच्या पेआऊटची गणना करण्यासाठी तुमच्या भाड्यातून सेवा शुल्क वजा केले जाते. Airbnb वर शुल्क रचनेचे दोन प्रकार आहेत: विभाजित शुल्क आणि सिंगल शुल्क.
विभाजित शुल्क
होस्ट्स आणि गेस्ट्स, दोघेही त्यांचे स्वतःचे सेवा शुल्क देतात. तुमच्या पेआऊटची गणना करण्यासाठी तुमच्या भाड्यामधून 3% होस्ट शुल्क वजा केले जाते.* याशिवाय, गेस्ट्स तुमच्या भाड्याव्यतिरिक्त 14.1% ते 16.5% सेवा शुल्क देतात. याचा अर्थ तुम्ही एक भाडे सेट करता पण गेस्ट्स दुसरे भाडे देतात. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे भाडे $100 USD इतके सेट केल्यास, तुम्ही $97 कमावता आणि तुमचे गेस्ट्स सुमारे $115 देतात.
सिंगल शुल्क
तुमच्या पेआऊटची गणना करण्यासाठी तुमच्या भाड्यामधून एकच सेवा शुल्क वजा केले जाते. हे साधारणपणे 14 ते 16% असते.** याचा अर्थ असा की गेस्ट्सना दिसणारे आणि ते जे पेमेंट करतात तेच भाडे तुम्ही सेट करता. उदाहरणार्थ, 15.5% चे सिंगल शुल्क असल्यास, तुम्ही तुमचे भाडे $115 इतके सेट केले तर, तुम्ही $97.18 कमावता आणि तुमचे गेस्ट्स $115 देतात.
बहुतेक हॉटेल लिस्टिंग्ज आणि सर्व्हिस अपार्टमेंट्ससारख्या पारंपारिक आदरातिथ्य लिस्टिंग्जसाठी सिंगल शुल्क आवश्यक आहे. प्रॉपर्टी मॅनेजमेंट किंवा चॅनेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरणारे बहुतेक होस्ट्सदेखील सिंगल शुल्कावर आहेत.
Airbnb सेवा शुल्क का आकारते?
सेवा शुल्कामुळे Airbnb चे कार्य सुरळीतपणे चालवण्यात आणि होस्ट्सना सपोर्ट करण्यात मदत होते. ते यासारख्या गोष्टींचा खर्च कव्हर करतात:
- गेस्ट्सच्या पेमेंट्सचे प्रोसेसिंग
- गेस्ट्सकडे लिस्टिंग्जचे मार्केटिंग
- 24/7 ग्राहक सपोर्ट
मला सेवा शुल्क कुठे दिसून येईल?
भाडे विवरण पाहण्यासाठी तुमच्या कॅलेंडर वरील कोणतेही बुकिंग किंवा तुमच्या कमाई डॅशबोर्ड वरील कोणताही व्यवहार उघडा. तुम्हाला तुमचे सेवा शुल्क तिथे त्यासाठी असलेल्या ओळीमध्ये दिसेल.
सेवा शुल्काबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी मदत केंद्रावर जा, जिथे या विषयांवरील लेख आहेत:
*काही होस्ट्स अधिक पैसे देतात, ज्यात इटली आणि ब्राझीलमध्ये लिस्टिंग्ज असलेल्या काही होस्ट्सचा समावेश आहे.
** अत्यंत कठोर कॅन्सलेशन धोरणे असलेल्या होस्ट्सना जास्त शुल्क द्यावे लागू शकते.
काही देश आणि प्रदेशांमध्ये, प्रदर्शित केलेल्या एकूण भाड्यात कर समाविष्ट केलेले असतात. करांसह एकूण भाडे हे नेहमीच चेक आऊटच्यापूर्वी दर्शवले जाते.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.
