तुमची युटिलिटी बिले कमी करू शकतील अशा ऊर्जा बचतीच्या टिप्स

छोट्या बदलांमुळे मोठी बचत होऊ शकते आणि अपव्यय कमी होऊ शकतो.
Airbnb यांच्याद्वारे 14 डिसें, 2022 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
14 डिसें, 2022 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • ड्राफ्ट्स थांबवा आणि कमी फ्लो असलेले फिक्स्चर्स इन्स्टॉल करा

  • मोठी उपकरणे अपडेट करा आणि लहान उपकरणे अनप्लग करा

  • तुमच्या शाश्वततेच्या प्रयत्नांबद्दल गेस्ट्सना सांगा

ऊर्जेच्या किमती वाढत असताना, गेस्ट्ससाठी तुमची जागा आरामदायी ठेवणे महागडे ठरू शकते. होस्ट म्हणून, तुम्ही गेस्ट्सना त्यांचे हीटिंग, कूलिंग आणि पाण्याच्या वापराबद्दल जागरूक राहण्यास सांगू शकता, परंतु तुमची युटिलिटी बिले कमी करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू नये. तुमच्या जागेची उर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी पावले उचलणे हा एक चांगला उपाय आहे. यामुळे मोठी बचत होऊ शकते आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.

होस्ट्सच्या प्रॉपर्टीज अपडेट करण्यासाठी सल्ला आणि संसाधने देण्याकरता Airbnb शाश्वतता तज्ञांसह काम करत आहे. सुरुवात करण्यासाठी, लोकांना त्यांचा उर्जा वापर आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यात मदत करण्यात माहिर असलेली यूकेची संस्था एनर्जी सेव्हिंग ट्रस्ट कडून या टिप्स वापरून पहा.

ड्राफ्ट्स थांबवा आणि कमी फ्लो असलेले फिक्स्चर्स इन्स्टॉल करा

गेस्ट्स सामान्यपणे अशा जागेची अपेक्षा करतात जिथे गरम पाणी तत्काळ उपलब्ध असेल आणि ते जागेला गरम किंवा थंड ठेवू शकतील. तुमच्या प्रॉपर्टीचे इन्सुलेशन आणि पाण्याची व्यवस्था सुधारून—तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करू शकता—आणि आपल्या खर्चात कपात करू शकता.

  • हवा गळती रोखण्यासाठी खिडक्या, दारे, चिमणी, पाईप्स आणि इलेक्ट्रिकल आऊटलेट्स भोवतीच्या फटींचे ड्राफ्ट-प्रूफिंग करणे हा कोणत्याही प्रकारच्या घरात ऊर्जा वाचवण्याचा एक स्वस्त, प्रभावी मार्ग आहे. फिल्म, काल्क, फोम गॅस्केट्स, रोलर शेड्स आणि जड पडदे किंवा पडदा लाईनर इन्सुलेट करणे हे सर्व गळती थांबवण्यात मदत करू शकतात.
  • उष्णता टिकवून ठेवण्यासाठी जुन्या वॉटर हीटर्सचे इन्सुलेशन करणे आणि जेव्हा तुमची जागा वापरली जात नाही तेव्हा पाणी गरम करणे टाळण्यासाठी टायमर जोडणे ऊर्जा वाचवण्यात मदत करू शकते.
  • कमी पाणी वापरणारे टॉयलेट वॉल्व्हज, नळ आणि शॉवरहेड्स या साधारण प्लंबिंगच्या वस्तू बदलल्यास पाण्याचा वापर कमी करण्यात मदत करू शकतात. एरेटेड शॉवरहेड्स उच्च दाब राखण्यासाठी पाण्यात हवा मिसळतात आणि प्रति शॉवर 4.25 गॅलन (16 लिटर) पर्यंत पाण्याचा वापर कमी करतात. तुम्ही हे करत असताना, गळती टाळण्यासाठी पाणी कुठे गळते का हे नियमितपणे तपासा आणि तसे असल्यास ते दुरुस्त करा.
  • मशीन कमी तपमानावर किंवा "इको" मोडवर सेट करून डिशवॉशर आणि वॉशर/ड्रायरमध्ये फक्त पूर्ण भार घेऊन साफ केल्याने पाणी आणि वीज दोन्ही वाचवू शकतो. पुढच्या गेस्टसाठी तुमची जागा तयार करताना, जेव्हा शक्य होईल तेव्हा भांडी लावा आणि लिनन्स हवेत सुकत घाला.

न्यूगेल, वेल्समधील सुपरहोस्ट आणि होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या ॲना त्यांचे कॉटेज पाहुण्यांसाठी आरामदायक ठेवण्याकरता इन्सुलेटिंग सजावट वापरतात. बोर्डाच्या शाश्वतता समितीवर काम करणाऱ्या अ‍ॅना म्हणतात, “आम्ही जुन्या फ्लॅगस्टोनच्या फरशांवर गालिचे टाकले आहेत आणि थंड हवेचे प्रवाह रोखण्यासाठी सुंदर जाड पडदे लावले आहेत.” “या दोन्ही गोष्टींमुळे आमच्या रूम्सचे सौंदर्य कमालीचे खुलले असून आम्हाला ऊर्जा वाचवण्यात देखील मदत होते.

मोठी उपकरणे अपडेट करा आणि लहान उपकरणे अनप्लग करा

बऱ्याच गेस्ट्सना आवश्यक सामग्रीचा साठा असलेले चांगले सुसज्ज किचन आणि विश्वसनीय वायफायसारख्या सुविधा हव्या असतात. तुम्ही तुमच्या आदरातिथ्याशी तडजोड न करता तुमचा विजेचा वापर कमी करू शकता.

  • इनकॅन्डेसेंट आणि हॅलोजेन लाईट बल्ब बदलून LED लाईट बल्ब वापरल्याने तुम्हाला दर वर्षी प्रति बल्ब $4 ते $16 USD पर्यंत वाचवता येतात.
  • तुलनेने कमी किमतीचे आणि लावण्यास सोपे असलेले लाईटिंग सेन्सर्स आणि कंट्रोल्स जोडणे त्यामुळे लाईट्स चुकीने सुरू नसल्याचे सुनिश्चित करण्यात मदत होऊ शकते. गेस्टच्या उपस्थितीची जाणीव झाल्यावर मोशन सेन्सर लाईट्स ऑटोमॅटिक चालू आणि बंद करून वीज वाचवू शकतात.
  • मुदत संपलेली मोठी उपकरणे बदलून त्याऐवजी उर्जेची बचत करणारी उपकरणे वापरल्यास वीज वाचवू शकते. उच्च रेटिंग असलेला रेफ्रिजरेटर वापरल्याने, त्याच्या सामान्य जीवनकालपर्यंत तुमच्या विजेच्या बिलांवर लक्षणीय परिणाम होऊ शकते.
  • जेव्हा ते वापरात नसतात तेव्हा फोन चार्जर्ससारखे लहान डिव्हाइसेस अनप्लग केल्याने वीजपुरवठ्यावर होणारा अतिरिक्त भार टाळता येतो. दुसरा पर्याय म्हणजे त्यांना पॉवर स्ट्रिप किंवा स्मार्ट स्विचशी जोडणे जेणेकरून तुमची जागा वापरात नसताना तुम्ही ते रिमोट पद्धतीने बंद करू शकता. विविध डिव्हाइसेस सतत स्टँडबाय मोडमध्ये न ठेवता ते काढून टाकल्याने तुमच्या मासिक विजेच्या बिलांमध्ये सुमारे 5% ची बचत होऊ शकते.
ॲना म्हणतात, “साफसफाई करण्यात आणि कपडे धुण्यात खूप वीज खर्च होते.” “ऊर्जा बचतीच्या दृष्टीने एक चांगले रेटिंग असलेले वॉशर आणि ड्रायर वापरणे माझ्यासाठी खरोखर महत्त्वाचे आहे.”

तुमची गोष्ट गेस्ट्सबरोबर शेअर करा

तुम्ही तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनामध्ये शेअर केलेली कथा तुमच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना सहाय्य करण्यात आणि तुमच्या गेस्ट्सच्या अनुभवाला आकार देण्यात मदत करू शकते.

ॲना म्हणतात, “मला वाटते की आपल्या लिस्टिंगमध्ये पर्यावरणाबद्दल आपल्या नैतिक जवाबदारीला स्पष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” “तुम्ही शाश्वतता आणि त्यासाठी तुम्ही करत असलेल्या गोष्टींना तुम्ही कसे महत्त्व देता याचे तुम्ही वर्णन करू शकता आणि नंतर तुमच्याइतकीच पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या गेस्ट्ससह योग्यपणे मॅच केले जाईल.”

मोकळेपणाने कम्युनिकेशन साधल्याने देखील गेस्ट्सना तुमच्या कृतींचे अनुसरण करण्यास प्रोत्साहन मिळेल. ॲना म्हणतात, “आम्हाला नक्कीच वाटते की आमच्या गेस्ट्सना एक सुंदर, आरामदायक वास्तव्याचा अनुभव मिळावा.” “परंतु तुम्ही ऊर्जा कशी संवर्धित करण्याचा प्रयत्न करीत आहात याबद्दल तुमच्या लिस्टिंगमध्ये अपेक्षा सेट केल्याने निष्काळजीपणा टाळण्यास मदत होते, उदारहणार्थ घरी हीटिंगचे तापमान खूप जास्त ठेऊन नंतर दिवसभरासाठी बाहेर जाणे.”

या काही सोप्या पायऱ्या आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जागेवर उर्जेची बचत करू शकता. सौर पॅनेल्स लावणे, खिडक्या बदलणे आणि इन्सुलेशन सुधारणे यासारखी मोठी पावले तुम्हाला अधिक बचत करण्यात मदत करू शकतात. तुम्ही केलेले बदल सवलती, कर कपात आणि इतर इनसेंटिव्ह्जसाठी पात्र ठरू शकतात.

शाश्वत होस्टिंग करण्याबद्दल अधिक जाणून घ्या

हायलाइट्स

  • ड्राफ्ट्स थांबवा आणि कमी फ्लो असलेले फिक्स्चर्स इन्स्टॉल करा

  • मोठी उपकरणे अपडेट करा आणि लहान उपकरणे अनप्लग करा

  • तुमच्या शाश्वततेच्या प्रयत्नांबद्दल गेस्ट्सना सांगा

Airbnb
14 डिसें, 2022
हे उपयुक्त ठरले का?