अमेरिकेतील होस्ट्स स्वच्छ उर्जा इनसेंटिव्ह्जसाठी पात्र ठरू शकतात

इलेक्ट्रिकवर स्विच करणे तुम्हाला पैसे वाचवण्यात, उत्सर्जन कमी करण्यात आणि गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत करू शकते.
Airbnb यांच्याद्वारे 11 मे, 2023 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
11 मे, 2023 रोजी अपडेट केले

यूएस मधील होस्ट्स आता ऊर्जा-कार्यक्षम घरगुती सुधारणा करण्यासाठी फेडरल इनसेंटिव्ह्जसाठी पात्र ठरू शकतात. 2022 चा महागाई कपात कायदा स्वच्छ विजेकडे वळणाऱ्या घरकुलांना सूट, कर क्रेडिट्स आणि कमी किमतीच्या वित्तपुरवठा देऊ करते.

तुमच्या प्रॉपर्टीच्या जुन्या सिस्टीम्स आणि उपकरणांना नवीन, अधिक कार्यक्षम उपकरणांनी बदलल्याने तुम्हाला ऊर्जा खर्चावर पैसे वाचवण्यात मदत होऊ शकते आणि तुमचे कार्बन उत्सर्जन कमी करू शकते.

पैसे वाचवणे

तुम्हाला एकाच वेळी सर्व काही अपडेट करण्याची गरज नाही. यापैकी बरेच फेडरल इनसेंटिव्ह्स 2032 पर्यंत उपलब्ध आहेत आणि काही राज्ये आणि स्थानिक युटिलिटी कंपन्या अतिरिक्त प्रोग्राम्स ऑफर करतात. Energy Star प्रोग्रामने (पर्यावरण संरक्षण एजन्सीद्वारे प्रशासित केलेली सार्वजनिक-खाजगी भागीदारी) तुम्ही कुठे राहता यावर आधारित उपलब्ध सवलतींचे संकलन केले आहे.

तुमची जागा भाड्याची किंवा मालकीची असो, तुम्ही फेडरल इनसेंटिव्ह्ससाठी पात्र ठरू शकता, जे तुमच्या घराच्या उत्पन्नाच्या पातळीनुसार बदलतात. तुम्ही कशासाठी पात्र असाल याचा अंदाज घेण्यासाठी, हा ऑनलाईन कॅल्क्युलेटर वापरून बघा.

कार्बन उत्सर्जन कमी करणे

ईपीए नुसार कार्बन उत्सर्जनाचा सर्वात मोठा मानवनिर्मित स्त्रोत उष्णता, वीज आणि वाहतुकीसाठी तेल किंवा वायू जाळण्यापासूनचा आहे. तुमच्या घराच्या ऊर्जेचा अपव्यय आणि वापर कमी करण्यासाठी फेडरल इनसेंटिव्ह्जचा उपयोग अपग्रेड्ससाठी केला जाऊ शकतो, यासहः

  • हवामानाच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी केलेली उपाययोजना (वेदारायझेशन): इन्सुलेशन जोडणे, अनावश्यक थंड किंवा गरम हवा थांबवणे आणि वायूवहन सुधारणे
  • सौर पॅनेल्स: छतावर पॅनेल्स आणि बॅटरी इन्स्टॉल करणे, जेणेकरून ते जनरेट करणारी विद्युत ऊर्जा स्टोअर करून कधीही वापरण्यासाठी तयार असेल
  • उपकरणे: सामान्य उपकरणे, जसे की फर्नेस, कपड्यांचे ड्रायर किंवा गरम पाण्याचा बॉयलर वीज वाचवणार्‍या इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये अपडेट करणे

गेस्ट्सना आकर्षित करणे

तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनामध्ये तुमच्या जागेची उर्जा कार्यक्षमता हायलाईट केल्याने पर्यावरणास अनुकूल प्रवासामध्ये स्वारस्य असलेल्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होऊ शकते. तुम्ही ऑफर करत असलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेण्याचा विचार करा, मग ती सर्व इलेक्ट्रिक उपकरणे असो, सौर उर्जा असो किंवा ईव्ही चार्जिंग असो.

“इलेक्ट्रिक कार चालवणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू वाढत आहे, आणि त्यामुळे EV चार्जर असणे फायदेशीर ठरणार आहे,” ओशनसाईड, कॅलिफोर्नियामधील सुपरहोस्ट, खोई म्हणतात. ते त्यांच्या काँडोवर 240-व्होल्ट EV चार्जर ऑफर करतात आणि ऑफ-पीक वापराला प्रोत्साहित करतात. “गेस्ट्सना रात्री येता येऊन आणि चार्ज करण्यासाठी जागा शोधण्याची गरज न भासता प्लग इन करता येणे सोयीचे वाटते.”

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.

Airbnb
11 मे, 2023
हे उपयुक्त ठरले का?