Airbnb च्या प्री-बुकिंग मेसेज वैशिष्ट्याचा जास्तीत जास्त लाभ घ्या
तुम्ही या भागात यायचे काय कारण आहे? तुम्ही कोणासोबत येत आहात? तुम्हाला काय वाटते, तुम्ही कधी पोहोचाल? बुकिंग मिळाल्यानंतर Airbnb होस्ट्सच्या मनात अनेक प्रश्न घिरट्या घालत असतात. आणि बरेचसे होस्ट्स, गेस्ट्सनी तातडीने बुकिंग करण्यापूर्वी, हे प्रश्न विचारून त्यांच्या संभाव्य गेस्ट्सना जाणून घ्यायला बघतात. अर्थात हे आवश्यक नाही, परंतु प्री-बुकिंग मेसेजमध्ये प्रश्न जोडल्याने संभाव्य गेस्ट्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यास, बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यास आणि सुरुवातीपासूनच गेस्ट्सशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यास मदत होऊ शकते.
या महिन्यात काही दिवसांनी, Airbnb एक सुधारित फीचर लॉन्च करत आहे: प्री-बुकिंग मेसेज. गेस्ट्सनी तात्काळ बुकिंग करण्यापूर्वी होस्ट्सनी गेस्टचे अभिवादन करून, त्यांना हवे ते सर्व प्रश्न विचारण्याचा हा एक योग्य मार्ग आहे. (तुम्हालाही भरपूर जागा मिळेल, कारण आम्ही कॅरेक्टरची संख्या वाढवली आहे. आणि जर तुम्ही सध्या वेलकम मेसेज वापरत असाल, तर तुम्हाला कोणताही बदल करण्याची गरज नाही.) तुमचे संभाव्य गेस्ट्स बुकिंग करत असताना तुमचा मेसेज वाचतील, आणि त्यांचे रिझर्व्हेशन कन्फर्म करण्यापूर्वी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील.
येथे Airbnb च्या प्री-बुकिंग मेसेज वैशिष्ट्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे काही मार्ग दिले आहेत.
सहकारी होस्ट्सकडून 5 प्री-बुकिंग मेसेज टिप्स
1. तुमच्या संभाव्य गेस्टचे आभार मानून सुरुवात करा
- “मला वाटते की विश्वास निर्माण करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि यामुळे गेस्ट्समध्ये एका चांगल्या वास्तव्याची अपेक्षा निर्माण होते,” असे मेडेलिन, कोलंबियातील होस्ट जुआन म्हणतात.
- “मी नेहमी बुकिंगच्या विनंतीसाठी त्यांचे आभार मानते आणि त्यांना लिस्टिंगचे तपशील आणि घराचे नियम काळजीपूर्वकपणे वाचून ते त्यांच्यादृष्टीने योग्य आहेत की नाहीत याची खात्री करायला सांगते.” —कॅथ, अल्बानी, ऑस्ट्रेलिया
- “हार्दिक शुभेच्छा! मी मनापासून काळजी घेत असलेल्या या जागेवर मी तुमचे स्वागत करतो. तुमच्यापैकी ज्यांना निसर्गाशी कनेक्ट व्हायला आवडते त्यांच्यासाठी हे एक हितकारी ठिकाण आहे.
- तुम्ही या जागेवर कोणत्या उद्देशाने आले आहात?
- तुम्ही कोणासोबत प्रवास करत आहात?
- तुम्ही किती वाजता पोहोचाल असे तुम्हाला वाटते?
- तुम्हाला कॉटेजमध्ये वास्तव्य का करायचे आहे?"- युआन, मेडेलिन, कोलंबिया
- “तुमच्या वास्तव्याबाबत आम्ही उत्सुक आहोत आणि आम्हाला जाणून घ्यायचे आहे की:
- तुम्ही डरहॅममध्ये येण्याचे नेमके कारण काय आहे?
- आम्ही तुमच्या चेक इनसाठी कितीची वेळ निश्चित करावी असे वाटते?
- तुमच्या सोबत कोण येत आहे?
- तुम्ही आमच्यासोबत नाश्ता करण्याचा विचार करत असाल, तर आहारातील तुमच्या काही आवडी-निवडी आम्हाला सांगून ठेवू शकाल का?
- तुम्हाला घराच्या नियमांबाबत काही प्रश्न विचारायचे आहेत का? आम्ही तुमच्याकडून जाणून घेण्यास उत्सुक आहोत!” —अॅलिस आणि जेफ, डरहॅम, नॉर्थ कॅरोलिना
2. सर्वात महत्वाचे काय आहे ह्याबद्दल विचारा
एका अशा सर्वोत्तम गोष्टीचा विचार करा ज्यामुळे तुमच्या वास्तव्याची जागा तुमच्यासाठी आणि तुमच्या गेस्ट्ससाठी सर्वोत्तम (किंवा तितकीशी उत्तम नसणारी) ठरेल आणि त्याबद्दल होस्ट्स विचारतात तशा प्रकारचे प्रश्न तुमच्या बुकिंग पूर्वीच्या मेसेजमध्ये विचारा:
- “माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की: कोणत्या कारणामुळे तुम्ही या जागेत यायचे ठरवलेत? यामुळे मला त्यांच्या भेटीची अधिक चांगल्या प्रकारे तयारी करण्यात मदत होते. जर ते माझ्या शहरापासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या डेस्टिनेशनला भेट देण्यासाठी येत असतील तर मी त्यांना अंतर आणि ड्राइव्ह करत येण्यासाठीचा वेळ समजून घेण्यात मदत करू इच्छित आहे. जर ते अॅनिव्हर्सरी किंवा काहीतरी खास साजरे करण्यासाठी येत असतील तर मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यांच्यासाठी लहानसे काहीतरी भेट म्हणून ठेवायचे आहे. जर ते इथल्या एखाद्या इव्हेंटसाठी येत असतील तर मी त्यांना सल्ला देऊ शकेन किंवा नंतर डिनरसाठी चांगली जागा सुचवू शकेन.“—एमिलीया, ऑरोनो, मेन
- “ते किती वाजता येत आहेत (अत्यंत महत्त्वाचे) याबाबत मी त्यांना विचारतो आणि माझ्याकडील लवकरात लवकर चेक-इन करण्याच्या वेळेबाबत आठवण करून देतो, तसेच त्यामध्ये प्रत्येक Airbnb वेगळा आहे आणि हॉटेलसारखे नाही हेदेखील सांगून ठेवेन."—अॅंजि, न्यूयॉर्क सिटी
3. गेस्ट्सना लिस्टिंग आणि घराचे नियम पुन्हा वाचण्यासाठी आमंत्रित करा
तुमचा बुकिंगपूर्वीचा मेसेज लिहिताना तो, गेस्ट्सनी लिस्टिंगबाबत कदाचित लक्षात घेतले नसावेत अशा महत्त्वपूर्ण तपशिलांची गेस्ट्सना आठवण करून देण्याच्या दृष्टीने लिहा. “मी स्वत:ला गेस्ट्सच्या भूमिकेत ठेवून पाहते,” फ्रेंच होस्ट मेरी लाइन म्हणते. “कधीकधी आपल्याला एखादे स्वप्नवत दिसणारे अपार्टमेंटच सापडले असावे असा आपल्याला आनंद होतो की आपण ते रिझर्व्ह करण्याची घाई करतो—एकदा तर मी एक अपार्टमेंट बुक केली आणि चादरी दिल्याच नसल्याचे माझ्या लक्षातही आले नाही! म्हणून, मला वाटते की होस्ट्सनी मला त्यांची लिस्टिंग पुन्हा वाचण्यासाठी आमंत्रित केले असते तर मी अशी चूक केली नसती." इतर होस्ट्स या सूचना देतात:
- “लिस्टिंग तीन मजली असून त्याला लिफ्ट नाहीये याची मी त्यांना आठवण करून देते, काही लोकांना ही गोष्ट इथे आल्यावर कळली होती!” —बीट्रीस, अनेसी, फ्रान्स
- “मी त्यांना इशारा देतो की या भागातील मर्यादित सेवेमुळे रात्री पाण्याची कमतरता भासू शकते आणि त्यांना गरज भासल्यास मी पाणी भरायला मदत करू शकतो.” —जुआन, मेडेलिन, कोलंबिया
- “मी शहरातल्या अशा मध्यवर्ती भागात राहते, जिथे थोड्याफार प्रमाणात घाण असू शकते, हे त्यांना माहीत आहे का हे मी त्यांना विचारते.” —हेलेन, ब्रिस्टल, इंग्लंड
- “त्यांना अपार्टमेंटची रचना समजली आहे का हे मी त्यांना विचारते आणिअपार्टमेंटला तलाव आणि गार्डन असे दोन्ही व्ह्यूज असल्यामुळे त्यांना कुठला व्ह्यू हवा आहे हे स्पष्ट करून घेते.” —ॲना, ओहरीड, मॅसेडोनिया
- “मी त्यांना घराच्या नियमांची आठवण करून देते ज्यात धूम्रपान न करणे, पाळीव प्राणी न आणणे, पार्टी न करणे आणि सहापेक्षा जास्त लोकांनी प्रॉपर्टीमध्ये न राहणे या नियमांचा समावेश आहे. मी त्यांना समजावते की या माहितीमुळे आमची लिस्टिंग त्यांच्या ग्रुपसाठी योग्य आहे की नाही हे ठरवायला आम्हाला मदत होईल.” —लिंडा आणि रिचर्ड, सॅन अँटोनियो, टेक्सास
4. तुमच्या गेस्ट्सबद्दल जाणून घ्या
तुमच्या आदरातिथ्यात गेस्ट्सच्या आवडीनुसार बदल करण्यासाठी आणि तुम्हाला गेस्ट्सची काळजी आहे हे त्यांना कळावे म्हणून, काही होस्ट्सनी पुढील प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला आहे:
- “ते कॉफी पितात का, त्यांना कॉफी कशी लागते—मिडियम किंवा डार्क रोस्ट—हे मी त्यांना विचारते आणि जर ते कॉफी पीत असतील तर ते येण्यापूर्वी मी ताजी रोस्ट केलेली कॉफी घेऊन येते. जर आसपासच्या परिसरात काही बांधकाम चालले असेल तर बुकिंग स्वीकारण्यापूर्वी मी त्यांना ते सांगते. जर गेस्ट कार घेऊन येणार असतील तर पार्किंगवरील निर्बंध, खर्च आणि रहदारीमुळे मी त्यांना तसं न करण्याचा सल्ला देते. अखेरीस, मी आमच्या सर्वात प्रसिध्द पर्यटन स्थळाचा उल्लेख करते आणि त्यांना किमान दोन महिने अगोदर त्याचे तिकीट खरेदी करण्यास सांगते. अशा प्रकारे, त्यांना समजते की मी त्यांच्या येण्यापूर्वीच त्यांच्या गरजांचा विचार करत आहे.” —डोना, सॅन फ्रान्सिस्को
- “प्रत्येकवेळी बुकिंग घेताना मी गेस्ट्सना तेच प्रश्न विचारतो आणि मुलांविषयी देखील विचारतो: तुम्ही किती वाजता पोहोचाल? तुम्हाला किती बेड्स लागतील? तुम्हाला कॉट किंवा हाय चेअरची गरज आहे का?” —जीन-पियर, मोनेस, फ्रान्स
- “आम्ही एका लहान शहरात राहतो जे शेती आणि पर्यटनासाठी ओळखले जाते, म्हणून मी नेहमी गेस्ट्सना विचारते की यापूर्वी ते आमच्या शहरात आले आहेत का. नसतील आले तर मी रेस्टॉरंट्स, कामकाजाच्या वेळा तसेच स्थानिक सुविधांविषयी काही माहिती देते. गरज भासल्यास, मी नेहमी गेस्ट्सना त्यांच्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन करायला मदत करते.” —डाफ्नी, माँटागू, दक्षिण आफ्रिका
5. तुमच्या होस्टिंगच्या शैलीविषयी सांगा
काही होस्ट्स प्री-बुकिंग मेसेजमध्ये बरेच प्रश्न विचारतात तर काहीजण काहीही विचारत नाहीत. होस्ट्सच्या मते, जेव्हा तुम्ही तुमच्या प्री-बुकिंग मेसेजमध्ये प्रश्न विचारता तेव्हा तुमच्या होस्टिंगच्या शैलीचा अंदाज यायला हवा - मग ती निवांत असेल किंवा कठोर. यामुळे गेस्ट्सना देखील ठरवता येते की त्यांची निवड योग्य आहे की नाही:
- 'मी कोणताही प्रश्न विचारत नाही. जर मी त्यांच्या प्रवासाचा उद्देश विचारला तर तो अविचार होईल. गेस्ट्स अपार्टमेंटमध्ये माझ्याबरोबर राहत नसल्यामुळे, मला त्याच्याशी काही देणघेणं नाही.” —इलोना, टोरेमोलिनोस, स्पेन
- “माझे बहुतेक गेस्ट्स त्यांच्या बुकिंगच्या विनंतीमध्ये बरीच माहिती देतात, परंतु त्यांचा सुरुवातीचा मेसेज संक्षिप्त असेल तर, मी हे अनिवार्य प्रश्न विचारते:
- तुम्ही लिस्टिंगचे संपूर्ण वर्णन वाचले आहे का, स्क्रोल करत खाली जाऊन घराचे नियम वाचले आहेत का?
- तुम्ही घराच्या नियमांचे पालन करण्यास आणि घराचा मान राखण्यास तयार आहात का?
- बुकिंग कन्फर्म करण्याआधी तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न विचारले आहेत का?
- तुमचा ETA कळवण्याचे महत्त्व तुम्हाला समजले आहे का आणि काही कारणास्तव तुम्ही त्यावेळी पोहोचू शकत नसल्यास, कृपया आम्हाला वेळेवर कळवाल का?
- तुमचे बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही तुमचा प्रवासाचा कार्यक्रम नीट वाचून तारखा आणि गेस्ट्सची संख्या योग्य असल्याची खात्री कराल का तसेच डोअर कोड्स आणि आगमनाच्या इतर माहितीची नोंद कराल का?” —सारा, सेयुलिता, मेक्सिको
- “पहिल्याच मेसेजमध्ये गेस्ट्सवर प्रश्नांचा भडिमार करायला मला आवडत नाही, पण मी अशा होस्ट्सची बाजू देखील समजू शकते ज्यांना अधिक माहिती हवी असते. मी फक्त सर्व गेस्ट्सचे संपूर्ण नाव देण्याची विनंती करते (डॉगी गेस्ट्ससह!). माझा अनुभव असा आहे की जे गेस्ट्स जास्त माहिती देत नाहीत त्यांच्याविषयी अनावश्यक काळजी किंवा चिंता करायची गरज नाही—संवाद साधण्याची प्रत्येकाची शैली वेगळी असते.” —सुझॅन, नॉर्थ कॅरोलिना
तुम्ही तुमचा प्री-बुकिंग मेसेज सेव्ह केला की संभाव्य गेस्ट्सनी तात्काळ बुकिंग केल्यावर त्यांना तो आपोआप मिळेल. एकदा प्री-बुकिंग मेसेज तयार केल्याने बुकिंग प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल, तुम्हाला अधिक मनःशांती लाभेल, तसेच गेस्ट्सना देखील कळेल की त्यांचा मुक्काम मस्त होणार आहे.
या लेखात दिलेल्या माहितीत लेख पब्लिश झाल्यानंतर बदल झाला असल्याची शक्यता आहे.