Airbnb वर बिझनेस कसा सुरू करावा
हायलाइट्स
तुम्ही किती कमाई करू शकता याचा अंदाज लावा
तुमचा बिझनेस कसा चालवायचा ते शिका
Airbnb वर यशस्वी होस्ट होण्यासाठी तुम्हाला बिझनेस चालवण्याचा अनुभव असण्याची गरज नाही. कोलंबस, ओहायो मधील सुपरहोस्ट्स ब्रायन आणि कॅथरीन असे सांगत आहेत—त्यांनी Airbnb वर त्यांच्या अतिरिक्त बेडरूमचे लिस्टिंग तयार करून सुरुवात केली त्याआधी त्यांना आदरातिथ्य किंवा बिझनेस यांचा अनुभव मुळीच नव्हता.
“आठ वर्षांनंतर, आम्ही चार वेगवेगळ्या प्रॉपर्टीज होस्ट करतो आणि एक बेड आणि ब्रेकफास्ट उघडणार आहोत,” ब्रायन म्हणतात.
जर तुम्ही तुमचे घर किंवा इतर जागा गेस्ट्ससाठी देण्याचा विचर करत आहात आणि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे की Airbnb वर होस्टिंगचा बिझनेस कसा सुरू करावा, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. सुरू करण्यासाठी आम्ही काही सोपी पावले सांगत आहोत, यामध्ये तुम्ही किती कमाई करू शकता इथपासून कशाप्रकारची दैनंदिन कामे करावी लागतील इथपर्यंत सर्व माहिती आहे.
तुमच्या मार्केटचा अंदाज घ्या
आधी Airbnb वरील तुमच्या जागेसारख्या इतर जागा आणि तुमच्या भागातील बेड अँड ब्रेकफास्ट्स पाहून घ्या. ते काय ऑफर करतात याचा अंदाज घ्या—आणि त्यांच्याकडे काय नाही जे तुम्ही ऑफर करू शकता.
अशा गेस्ट्सबद्दल विचार करा जे तुमची जागा बुक करू शकतात. तुमच्या भागात सुट्टीवर बरेच बिझनेस प्रवासी किंवा कुटुंबे येतात का? तुमच्या भागात नॅशनल पार्क्स किंवा ऐतिहासिक स्थळे यासारखी स्थानिक आकर्षणे आहेत का? तुमचे डिझाइन, तुमच्या जागेतील सुविधा आणि तुम्ही ऑफर करत असलेला बुकिंगचा कालावधी यांच्याबद्दल निर्णय घेण्यात ही माहिती तुमच्या कामास येऊ शकेल.
तुम्ही होस्टिंग सुरू करण्यापूर्वी, कमी कालावधीसाठी जागा भाड्याने देताना तुमच्या भागातील कोणते कायदे आणि कर लागू होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. Airbnb तुम्हाला कायदेशीर मार्गदर्शन किंवा कराबद्दल सल्ला देऊ शकत नाही, पण आम्ही होस्टिंगसंबंधी कायद्याबद्दल माहिती शोधण्यात तुमची मदत करू शकतो.तुमच्या कमाईच्या संभाव्यतेचा अंदाज लावा
तुम्ही थोडी-फार मार्केट रिसर्च केल्यानंतर आम्ही तुमच्या कमाईचा अंदाज काढण्यात तुमची मदत करू शकतो. तुमच्या कमाईचे लक्ष्य ठरवताना तुम्ही तुमचे खर्च आणि तुमच्या भाड्याच्या स्ट्रॅटेजीबद्दलही विचार केला पाहिजे:
तुमच्या खर्चांची यादी करा
तुमच्या संभाव्य फायद्याचा अंदाज घेण्यासाठी तुमच्या ठळक खर्चांचा अंदाज करा—सजावट, वायफाय, तुमच्या जागेला बुकिंगसाठी तयार करण्याच्या इतर गोष्टी—तसेच सतत सुरू असणारे खर्च जसे की अंथरुण-पांघरुण, बाथरूममधील सामान, स्वच्छतेचा खर्च किंवा कर्जाचे हप्ते. देखरेखीचा खर्च विसरू नका, जसे की डागडुजी करणे किंवा कौलांवर किंवा चिमनीवर होणारा वार्षिक खर्च.
तुमची भाडे ठरवण्याची स्ट्रॅटेजी सेट करा
तुमची भाड्याची स्ट्रॅटेजी सेट करताना याची माहिती काढा की त्या भागातील इतर ठिकाणी वर्षाच्या निरनिराळ्या वेळी भाडे किती असते आणि तुमच्या भाड्यासोबत त्याची तुलना करा. तुम्ही तुमचे भाडे वर्षाच्या निरनिराळ्या वेळी, वीकेंडला आणि मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी मागणीप्रमाणे भाडे ॲडजस्ट करू शकता.
लक्षात ठेवा, की तुमच्या प्रति रात्रा भाड्याशिवाय गेस्ट्सना सेवा शुल्क आणि तुम्ही जोडलेले इतर शुल्कही द्यावे लागतात. तुम्हाला काही फाइव्ह-स्टार रिव्ह्यू मिळाल्यानंतर तुम्ही तुमचे भाडे वाढवू शकाल, तेव्हा सुरुवातीला भाडे कमी ठेवताना काळजी करू नका.
स्मार्ट रेटबद्दल विचार करा
तुमचे भाडे ऑटोमेट करण्यासाठी तुम्ही स्मार्ट रेट चालू करू शकता. स्मार्ट रेटच्या टूलमध्ये सीझन आणि मागणीसकट 70 पेक्षा जास्त घटकांचा विचार केला जातो—आणि तुम्ही प्रति रात्रीसाठी किमान भाडे सेट करू शकता, म्हणजे तुमचे भाडे त्या रकमेपेक्षा कमी कधीही होणार नाही.
तुम्ही कसे होस्ट कराल ते ठरवा
Airbnb वर होस्ट करण्याचे बरेच निरनिराळे मार्ग आहेत आणि काही होस्ट होस्टिंगसाठी इतरांपेक्षा जास्त वेळ देऊ शकतात. तुमची उपलब्धता कितपत असू शकते याचा विचार करा आणि कोणते टूल आणि सेवा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात ते पहा.
ब्रायन आणि कॅथरीनने होस्टिंग सुरू केले तेव्हा सर्व कामे तेच करत असत असे ब्रायन सांगतात—अगदी कपडे धुण्यापासून डागडुजीच्या कामांपर्यंत सर्वकाही. शेवटी त्यांनी त्यापैकी काही सेवांसाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला.
तुम्हीसुद्धा या आणि इतर टूल्सचा वापर करून तुमच्या बिझनेसची काही कामे ऑटोमेट करू शकता, जसे की शेड्युल केलेले मेसेजेस, झटपट उत्तरे आणि तात्काळ बुकिंग.
तुम्ही केव्हा आणि किती वेळा Airbnb वर होस्ट कराल हे तुम्हीच ठरवता. कॅलेंडर आणि बुकिंग सेटिंग्ज वापरून तुम्ही तुमची उपलब्धता सेट करू शकता, वास्तव्याचा किमान आणि कमाल कालावधी सेट करू शकता आणि अशी अनेक कामे करू शकता.
अद्वितीय गेस्ट अनुभव तयार करा
तुमच्या गेस्ट्ससाठी अविस्मरणीय अनुभव तयार करण्याच्या तुमच्या क्षमतेवर होस्ट म्हणून तुमचे यश अवलंबून असते.
तुम्हाला तुमच्या जागेमध्ये कशा प्रकारचे गेस्ट पाहिजे आहेत ते ठरवा—जसे की पाळीव प्राणी आणणारे लोक, जोडपे, संपूर्ण कुटुंब किंवा ऑफिसमध्ये न जाता काम करणारे लोक—आणि त्यांच्या गरजांसाठी साजेशा सुविधा उपलब्ध करून द्या. असे वर्णन करा ज्याने तुमची लिस्टिंग लोकांच्या नजरेत भरेल आणि तुमच्या गेस्ट्सना ते विशेष आहोत असे वाटेल, जसे की स्वागतपर पत्र किंवा स्थानिक विशेष वस्तू.
“आम्ही एका स्थानिक कलाकाराकडून आमच्या घरांचे बाहेरून देखावे स्केच करून घेतले आणि त्यांचे पोस्टकार्ड तयार केले, आमचे गेस्ट हे पोस्टकार्ड वापरू शकतात किंवा स्वतःच्या घरी पाठवू शकतात” कॅथरीन म्हणतात.
तुमच्या जागेचे मार्केटिंग करा
तुमची जागा लिस्ट करणे संपूर्णपणे विनामूल्य आहे आणि तुम्हाला फक्त रिझर्वेशन कन्फर्म झाल्यावरच सेवा शुल्क द्यावे लागते. आम्हाला ही प्रक्रिया साधी आणि सोपी करायची आहे: फक्त ही सोपी पावले उचला.
कॅथरीनचे म्हणणे आहे की Airbnb वर राहण्याच्या जागा ब्राउझ करताना चांगले फोटो आणि लिस्टिंगचे छानसे शीर्षक लोकांच्या नजरेत आधी भरतात. काही होस्ट्स स्मार्टफोन वापरून चांगल्या गुणवत्तेचे फोटो घेतात, तरीही तुम्ही व्यावसायिक फोटोग्राफर कडून हे करवून घेण्याबद्दल विचार करू शकता.लक्षात ठेवा की कोणत्याही प्रकारची जागा कोणासाठी तरी अगदी योग्य असू शकते. तुमच्या लिस्टिंगचे तपशील आणि फोटोज योग्य त्या अपेक्षा सेट करतात याची खात्री करा.
Airbnb कडून सपोर्ट मिळवा
Airbnb प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या होस्ट्सना सपोर्ट करते ज्याने तुम्ही संपूर्ण आत्मविश्वासाने होस्टिंग करू शकता.
- होस्ट्ससाठी AirCover फक्त Airbnb वर उपलब्ध असून यामध्ये संपूर्ण संरक्षण आहे, हे नेहमी लागू असणारे, नेहमी विनामूल्य कव्हर आहे.
- इतर होस्ट्ससोबत कनेक्ट होण्यासाठी कम्युनिटी सेंटर वर जा किंवा तुमच्या स्थानिक होस्ट क्लब मध्ये सामील व्हा.
- तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास किंवा तुम्हाला सुरुवात करण्यासाठी मदत हवी असल्यास तुम्ही सुपरहोस्टला विचारू शकता.
- रिसोर्स सेंटर मध्ये होस्टिंगबद्दल आणखी सल्ले मिळवा.
- आमची स्वतंत्र ग्राहक सपोर्ट टीम 24/7 उपलब्ध आहे.
हायलाइट्स
तुम्ही किती कमाई करू शकता याचा अंदाज लावा
तुमचा बिझनेस कसा चालवायचा ते शिका