Airbnb वर होस्ट कसे व्हावे

आत्मविश्वासाने होस्टिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली उत्तरे मिळवा.
Airbnb यांच्याद्वारे 16 नोव्हें, 2022 रोजी
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • तुमची जागा तयार करून एक आकर्षक लिस्टिंग तयार करा

  • तुम्ही कधी आणि कसे होस्ट करणार आहात यावर नियंत्रण ठेवा

जर तुम्ही होस्टिंगबद्दल विचार करत असाल परंतु गेस्ट्सना कसे आकर्षित करावे किंवा एक चांगला गेस्ट अनुभव कसा तयार करावा याची खात्री नसल्यास, तुम्ही एकटे नाहीत. Airbnb वर होस्ट बनणे हा नवीन लोकांशी कनेक्ट होण्याचा आणि अतिरिक्त पैसे कमावण्याचाएक मजेदार, फायदेशीर मार्ग आहे आणि सुरुवातीला बरेच प्रश्न असणे ही सामान्य गोष्ट आहे.

होस्टिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते येथे आहे.

1. तुमची जागा योग्य आहे का याचे मूल्यांकन करा

Airbnb वर लिस्ट करण्यासाठी कोणतीही जागा खूप छोटी किंवा खूप अद्वितीय नाही! प्रत्येक जागेसाठी एक गेस्ट आहे—तुम्ही फक्त स्पष्ट अपेक्षा सेट केल्या पाहिजेत तुमच्या जागेची वैशिष्ट्यांचे प्रामाणिकपणे आणि अचूकपणे वर्णन करून, अरुंद दरवाज्यांपासून अत्यंत साध्या जिन्यांपर्यंत.

तुम्ही होस्टिंग सुरू करण्यापूर्वी, कमी कालावधीसाठी जागा भाड्याने देताना तुमच्या भागातील कोणते कायदे आणि कर लागू होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. Airbnb तुम्हाला कायदेशीर मार्गदर्शन किंवा कराबद्दल सल्ला देऊ शकत नाही, पण आम्ही होस्टिंगसंबंधी कायद्याबद्दल माहिती शोधण्यात तुमची मदत करू शकतो.

2. गेस्ट्ससाठी तुमची जागा तयार करा

“माझा एक सिद्धांत आहे की तुमचे पाहुणे तुम्ही कोण आहात याचे प्रतिबिंब असतात,” कॅलिफोर्नियाच्या बिग बेअरचे सुपरहोस्ट जेक म्हणतात. “तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या घरात ओतता आणि ते समान जीवनशैली आणि अभिरुची असलेल्या लोकांना आकर्षित करते.”

तुमच्याकडे व्हिन्टेज चित्रपटांच्या पोस्टर्सचे निवडक कलेक्शन आहे का? किंवा कूल कलेच्या इतिहासावरील पुस्तकांचा ढीग? त्यांचा तोरा मिरवा! वैयक्तिक तपशील जोडल्यास तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यासमदत होऊ शकते.

तुमच्या गेस्ट्ससाठी एक उत्तम अनुभव तयार करण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही तुमची जागा चकाचक करत असताना पसारा आवरा आणि टॉयलेट पेपर, साबण आणि टॉवेल्स यासारख्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करा. छोटे बारकावे, जसे की स्थानिक वाईनची बाटली किंवा चॉकलेट्सचा डबा, यामुळे देखील गेस्ट्सना खास वाटू शकते.

3. तुमची जागा लिस्ट करा

तुमची जागा लिस्ट करणे पूर्णपणे विनामूल्य आहे. Airbnb रिझर्व्हेशन कन्फर्म झाल्यावरच सेवा शुल्क आकारते. ही फी तुमच्या बुकिंग उपबेरीजच्या साधारणपणे 3% इतकी असते आणि यामुळे आम्हाला Airbnb चालवण्याचा खर्च कव्हर करण्यात मदत होते, जसे 24/7 ग्राहक सपोर्ट, होस्ट प्रोटेक्शन्स, आणि बरेच काही.

आम्ही तुमची जागा लिस्ट करणे सोपे बनवण्याचा प्रयत्न करतो—तुम्ही फक्त 10 सोप्या पायऱ्यांमध्ये तुमची लिस्टिंग सेट अप करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असल्यास आम्ही नेहमीच मदत करण्यासाठी येथे असतो आणि इतर होस्ट्सशी संपर्क साधण्याचे अनेक मार्ग आहेत.

“काही मार्केट्समध्ये, तुम्हाला माझ्यासारख्या सुपरहोस्ट ॲम्बेसेडर सह कनेक्ट करता येईल,” ईस्ट वेनाटची, वॉशिंग्टनचे सुपरहोस्ट मागली म्हणतात. “तुमच्यासाठी ही प्रक्रिया शक्य तितकी विनासायास करण्यात मदत करण्यासाठी आम्ही येथे आहोत.”

तुम्ही तुमचे लिस्टिंग तपशील जोडत असताना, तुमच्या फोटोजकडे विशेष लक्ष द्या, कारण बुकिंग करण्यापूर्वी गेस्ट्सच्या लक्षात येणारी ती पहिली गोष्ट असते. काही होस्ट्स व्यावसायिक छायाचित्रकारांकडून काम करून घेतात तर इतर त्यांच्या स्मार्टफोनचा वापर उत्तम फोटो घेण्यासाठी करतात जे त्यांच्या जागेचा तपशील आणि आत्मा खरोखर कैद करतात.

4. तुम्ही कसे होस्ट कराल ते ठरवा

तुम्ही कधी आणि कसे Airbnb वर होस्ट करता यावर तुमचे नेहमीच पूर्ण नियंत्रण असेल. आमचे कॅलेंडर आणि बुकिंग सेटिंग्ज वापरून तुम्ही तुमची जागा अनुपलब्ध असल्याचे दिवस स्वतः ब्लॉक करू शकता, विशिष्ट चेक इन आणि चेक आऊट वेळा निवडू शकता, किमान किंवा जास्तीत जास्त किती रात्री गेस्ट राहू शकतात आणि अशी इतर अनेक कामे करू शकता.

इंग्लंडच्या ईस्ट ससेक्सच्या होस्ट ल्युसीने सांगितले की,“आम्ही सुरुवातीलाच निर्णय घेतला की आमच्याकडे किमान बुकिंग तीन दिवसांचे असेल”. “याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे कमी उलाढाल होती, परंतु यामुळे मला ते सर्व अतिरिक्त होस्टिंगचे बारकावे देण्यासाठी वेळ मिळाला जे करण्यात मला खरोखर आनंद आहे.”

गेस्ट्सच्या अपेक्षा सेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या घराचे नियम देखील वापरू शकता आणि तुमच्या जागेत कशाची परवानगी आहे—आणि कशाची नाही—हे स्पष्ट सांगू शकता.

5. तुमचे भाडे सेट करा आणि पैसे मिळवा

तुम्ही Airbnb वर किती भाडे आकारता ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचे भाडे धोरण ठरवताना, तुमच्या प्रदेशातील इतर लोक किती भाडे आकारतात, तुम्ही ऑफर करत असलेल्या सुविधा आणि वर्षाच्या वेळेचा विचार करा. हे तुम्हाला आणि तुमच्या गेस्ट्ससाठी योग्य वाटणारे भाडे शोधण्यात मदत करू शकते.

Airbnb तुमच्या अकाऊंटच्या पेमेंट्स आणि पेआऊट्स विभागात तुमची पेआऊट पद्धत सेट करणे सोपे करते. तुम्ही कुठे आहात यावर अवलंबून पेआऊट पद्धतींमध्ये बँक ट्रान्सफर किंवा डायरेक्ट डिपॉझिट, Payoneer डेबिट कार्ड्स, PayPal आणि Western Union यांचा समावेश आहे.

सपोर्ट आणि रिसोर्सेस कुठे मिळतील

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या होस्टिंग प्रवासामध्ये एकटे नाही. Airbnb होस्ट्सना सपोर्ट करते अनेक पद्धतीने, यासहः

तुम्ही कोण आहात किंवा तुमच्याकडे कोणत्या प्रकारची जागा आहे हे महत्त्वाचे नाही, तुमच्यासाठी Airbnb कम्युनिटीमध्ये जागा आहे. “Airbnb बद्दल जे सांगण्यासारखे आहे ते म्हणजे आम्हा सर्वांकडे देण्यासारख्या वेगवगेळ्या गोष्टी आहेत,” मागली म्हणतात. "म्हणून, गुड लक आणि हॅपी होस्टिंग!"

या लेखात आणि व्हिडिओमध्ये फीचर केलेले होस्ट्स Airbnb कर्मचारी नाहीत किंवा ते Airbnb च्या निर्देशानुसार काम करत नाहीत. होस्ट क्रिएटर्स म्हणून, त्यांनी त्यांचे विचार शेअर करण्यासाठी आणि हा व्हिडिओ तयार करण्यासाठी Airbnb सोबत भागीदारी केली. कोणतीही मते, किस्स्यांमधील माहिती किंवा गेस्ट्सच्या प्रतिक्रिया सत्य आहेत, त्यांची स्वतःची आहेत आणि ती Airbnb ची अधिकृत विधाने नाहीत.

हायलाइट्स

  • तुमची जागा तयार करून एक आकर्षक लिस्टिंग तयार करा

  • तुम्ही कधी आणि कसे होस्ट करणार आहात यावर नियंत्रण ठेवा

Airbnb
16 नोव्हें, 2022
हे उपयुक्त ठरले का?