पुन्हा डिझाईन केलेली प्राईसिंग टूल्स, आता तुमच्या Airbnb कॅलेंडरमध्ये

अपडेट केलेले भाडे विवरण आणि सुधारित सवलती तुम्हाला भाडे मॅनेज करण्यात मदत करू शकतात.
Airbnb यांच्याद्वारे 3 मे, 2023 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
25 मे, 2023 रोजी अपडेट केले

संपादकाची टीपः हा लेख Airbnb 2023 च्या समर रिलीझचा भाग म्हणून प्रकाशित झाला होता. पब्लिकेशननंतर कदाचित माहितीमध्ये बदल झालेला असू शकेल. आमच्या नवीनतम उत्पादनाच्या रीलीजबद्दलअधिक जाणून घ्या.

होस्टकडून मिळालेल्या फीडबॅकमुळे आम्हाला सर्व प्राईसिंग टूल्स तुमच्या कॅलेंडरमध्ये एकत्र आणण्यासाठी प्रेरित केले. तुम्ही तुमचे भाडे ॲडजस्ट करू शकता, तुमची उपलब्धता बदलू शकता आणि तुम्ही एका सोयीस्कर जागी सेट केलेल्या कोणत्याही सवलती किंवा प्रमोशन्स रिव्ह्यू करू शकता. 

तुम्ही तुमचे भाडे मॅनेज करण्यासाठी मदत करण्यासाठी कोणतेही साधन वापरत असलात तरीही, गेस्ट किती भाडे भरतील आणि तुमची कमाई किती ते आम्ही तुम्हाला दाखवू. डिस्काउंट सेट करणे देखील आम्ही सुलभ केले आहे. फक्त स्लायडर हलवा आणि तुमच्या सवलतीप्रमाणे तुमच्या सरासरी साप्ताहिक किंवा मासिक भाड्यामध्ये बदल होईल.

अपडेट केलेली भाड्याची विवरणे

एक होस्ट म्हणून, तुम्ही नेहमीच तुमचे भाडे नियंत्रित करता. गेस्ट सर्चमध्ये तुमचे भाडे कसे दिसते हे जाणून घेणे उपयुक्त आहे, कारण तुम्ही सेट केलेले रात्रीचे भाडे हे गेस्टने भरायचे एकूण भाडे नाही. 

स्थानिक नियमांनुसार जिथे करांचाही समावेश करावा लागतो त्या प्रदेशांव्यतिरिक्त इतर ठिकाणी गेस्टच्या एकूण भाड्यात करांपूर्वीची सर्व शुल्क समाविष्ट आहेत. एकूण भाडे समजून घेणे हे तुम्हाला चांगले मूल्य ऑफर करण्यात आणि तुमच्या कमाईच्या उद्दिष्टांना सहाय्य करण्यात मदत करू शकते.

येत्या काही आठवड्यांमध्ये, आम्ही अपडेट केलेले भाडे विवरण टूल आणत आहोत. त्या तारखांच्या गेस्टच्या एकूण भाड्याचा तपशील मिळविण्यासाठी फक्त आपल्या कॅलेंडरवर कितीही रात्रींची निवड करा. भाड्याच्या विवरणामध्ये तुम्हाला रात्रीचे भाडे, शुल्क, काही सवलती किंवा प्रमोशन्स असल्यास, कर आणि तुमची कमाई लिस्ट केलेली असेल.

तुमचे भाडे अपडेट करण्यासाठी तुमच्या कॅलेंडरवर एक तारीख निवडा आणि गेस्टच्या भाड्याचे आणि तुमच्या कमाईचे विवरण मिळवा.

तुमच्या कॅलेंडरमधून, कोणतीही मोकळी तारीख किंवा तारखांची श्रेणी निवडा. तुमच्या रात्रीच्या भाड्याच्या खाली, तुम्हाला त्या रिझर्व्हेशनसाठी गेस्ट एकूण किती भाडे देईल हे दाखवणारे एक बटण सापडेल. बटणावर टॅप किंवा क्लिक केल्यावर भाडे आणि कमाईचे विवरण समोर येते.

सुधारित साप्ताहिक आणि मासिक सवलती

साप्ताहिक आणि मासिक वास्तव्यासाठी सवलतीऑफर केल्याने तुम्हाला काम कमी मॅनेज करावे लागते आणि अधिक कमाई करण्यास मदत होऊ शकते. तुम्ही आम्हाला सांगितले आहे की सवलतींचा तुमच्या भाड्यावर आणि कमाईवर कसा परिणाम होतो हे शोधणे आव्हानात्मक आहे.

जेव्हा तुम्ही सवलत सेट करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या लिस्टिंगवर आणि तुमच्या भागातील तशाच प्रकारच्या लिस्टिंग्जच्या मागणीवर आधारित एक सूचना मिळेल. रक्कम बदलण्यासाठी, स्लायडर हलवा. हे सवलत दर्शवण्यासाठी तुमचे सरासरी साप्ताहिक किंवा मासिक भाडे आणि कमाई त्वरित अ‍ॅडजस्ट करेल.

सवलत स्लायडर वापरण्यासाठी, तुमच्या भाड्याच्या टॅबमधील सवलतींवर स्क्रोल करा, त्यानंतर साप्ताहिक किंवा मासिक निवडा. टक्केवारी चिन्हाच्या पुढे संख्या टाकूनही तुम्ही सवलत ॲड करू शकता.

या साधनांबद्दलआमच्या भाडयासंबंधी शिक्षण मालिकेत अधिक जाणून घ्या. Airbnb 2023 समर रिलीजमधील ही आणि इतर नवीन साधने वापरणे सुरू करण्यासाठी अर्ली ॲक्सेससाठी ऑप्ट इन करा, ज्यामध्ये होस्ट्ससाठी 25 अपग्रेड्स आहेत.

Airbnb
3 मे, 2023
हे उपयुक्त ठरले का?