तुमची जागा आणखी चांगली करण्याचे 10 मार्ग
हायलाइट्स
रंगाच्या ताज्या हातापासून ते नवीन शीट्सपर्यंत, अगदी लहान अपडेट्सचाही मोठा प्रभाव पडू शकतो
स्वच्छतेसाठीचा वेळ कमी करण्यात, प्रतिबंधात्मक देखभाल सुरु ठेवण्यात आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकतील असे बदल करा
सुधारणेला कुठे वाव आहे हे ओळखण्यासाठी तुमच्या जागेमध्ये रहा—आणि तुम्ही अपडेट्स केल्यानंतर, तुमची लिस्टिंग अपडेट करा
सोप्या, परवडण्यासारख्या अपग्रेड पासून डागडुजीच्या मोठ्या कामांपर्यंत, तुमच्या जागेला रिफ्रेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्यासारख्या होस्ट्सकडून मिळालेल्या घरामध्ये सुधारणा करण्याच्या कल्पना आम्ही येथे शेअर करत आहोत. तुम्ही ही कामे लगेच सुरू करण्याच्या तयारीत असलात किंवा काही काळानंतर, तुम्हाला यातून तुमच्यासाठी प्रेरणा नक्कीच मिळतील!
1. लहान अपडेट्सचा मोठा प्रभाव पडू शकतो हे लक्षात ठेवा
कधीकधी, रूमला नवे स्वरूप देण्यासाठी रंगाचा एक ताजा हात किंवा काही दैनंदिन स्वच्छतेची उत्पादने पुरेशी असतात. मॉन्ट्रियल, कॅनडा येथील सुपरहोस्ट हॅरोल्ड काही “हलके नूतनीकरण” करण्याची योजना आखत आहेत. ते “जास्त वापरल्या जाणाऱ्या भागातील भिंती धुतील, तसेच गेस्ट रूम आणि बाथरूमला रंग देतील,” असे ते सांगतात. “रंग देणे हा एखाद्या जागेला अधिक आकर्षक बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे!” अधिक सोप्या रीफ्रेशसाठी, बेड लिनन्स बदलणे, नवीन थ्रो पिलोज ठेवणे किंवा फक्त शॉवरचा पडदा बदलणे हे करून बघा.
2. तुमच्या कमी गर्दीच्या सीझनचा जास्तीत जास्त लाभ घ्या
मोठे अपग्रेड्स करायचा विचार करत आहात? एकदा तुम्ही तुमचा कमी मागणी असलेला सीझन ओळखला की, अपडेट्स करण्यासाठी त्याचा फायदा घ्या, खासकरून जर त्यासाठी तुमची जागा काही दिवस किंवा आठवड्यांसाठी रिकामी ठेवावी लागणार असेल. प्रोएन्डोस, स्पेनमधील होस्ट मार्टिन म्हणतात, “येथे हिवाळा हा कमी गर्दीचा काळ आहे, त्यामुळे मोठ्या प्रोजेक्ट्ससाठी तो योग्य आहे." विला नोव्हा दे गाया, पोर्तुगाल येथील सुपरहोस्ट डेल्फिना आणि जॉर्ज यांच्या लक्षात आले की नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कमी गेस्ट्स चेक इन करतात, तेव्हा त्यांनी “स्वयंपाकघरातील सर्व फर्निचर रंगवले, नवीन वायरलेस व्हॅक्यूम क्लिनर घेतला, आणि नवीन डुव्हे विकत घेतला.”
3. तुमच्या गेस्ट्सवर पडणाऱ्या पहिल्या छापेबद्दल पुन्हा एकदा विचार करा
जेव्हा गेस्ट्स तुमच्या दारात येतात, तेव्हा ते सर्वात आधी कोणती गोष्ट लक्षात घेतात? जर ते उखडलेला रंग किंवा योग्य प्रकाश नसलेला वॉकवे असेल तर तुम्ही गेस्ट्सना पहिल्या नजरेत आकर्षित करण्याची संधी गमावू शकता. ग्रीसमधील अथेन्स येथील होस्ट मारिया सांगतात, “हवामान सुधारले की आम्ही आमचे पुढचे दार पेंट करायला सुरुवात करतो.” आणि डोर्नबर्न, ऑस्ट्रियाचे सुपरहोस्ट मार्कस “आमच्या अपार्टमेंट्सच्या प्रवेशद्वार एरियात मोशन डिटेक्टर्ससह नवीन एलईडी आऊटडोअर लाईट्स” बसवत आहेत.
4. तुम्हाला स्वच्छतेसाठीचा वेळ वाचवण्यात मदत करू शकतील असे बदल करा
फर्निचरपासून ते फिक्स्चर्सपर्यंत, काही बदल केल्याने तुमच्या जागेची स्वच्छता अधिक वेगवान (आणि अधिक किफायतशीर!) होऊ शकते. फ्लॅगस्टाफ, अॅरिझोना येथील सुपरहोस्ट बेथ यांनी त्यांच्या अधिक देखभाल करावी लागणाऱ्या बेड फ्रेमच्या जागी अधिक सुव्यवस्थित असणारा “प्लॅटफॉर्म बेड ठेवला ज्याला पॉलिशिंगची आवश्यकता नाही.” आणि ब्राझीलच्या साओ पाउलोमधील सुपरहोस्ट बियाट्रीज यांच्याकडे पोहोचण्यास अवघड असणाऱ्या स्पॉट्सना अधिक ॲक्सेसिबल बनवण्यासाठी एक उत्तम युक्ती आहे: “मी स्वच्छतेची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी काही फर्निचरखाली छोटी चाके लावणार आहे.”
5. वीज वाचवणारी उपकरणे वापरण्यास सुरुवात करा
तुमच्या जागेत ऊर्जेचा वापर कमी करणे हे केवळ या ग्रहासाठीच चांगले नाही—ते तुम्हाला तुमच्या बिलांमध्ये बचत करण्यात देखील मदत करू शकते. डोर्नबर्न, ऑस्ट्रिया येथील होस्ट मार्कस, स्मार्ट थर्मोस्टॅट वापरण्याचा प्लॅन करत आहेत: “मला आशा आहे की हे माझे हीटिंगचा खर्च कमी करेल, कारण मी हीटिंग आउटपुट बिनधास्त [जेव्हा जागा रिकामी असेल तेव्हा] कमी करू शकेन.” आणि लॉस एंजेलिस मधील सुपरहोस्ट पीट यांनी त्यांच्या गेस्ट्सना ऊर्जावापरात अधिक जागरूक राहण्यात मदत करण्यासाठी “अलीकडेच बाथरूम सीलिंग हीटर आणि पंख्याला काउंटडाउन टाइमर जोडले आहे”.
6. प्रतिबंधात्मक देखभाल सुरू ठेवा
तुमचे HVAC फिल्टर्स बदलणे, लाइट बल्ब्स बदलणे असो किंवा मॉडेम आणि राऊटर डस्टिंग आणि रीसेट करणे, अशी काही कामे आहेत जी तुम्ही तुमच्या जागेत सर्वकाही सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी शेड्यूलवर सेट करू शकता. तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून, स्थानिक वातावरणानुसार तुमची टू-डू लिस्ट बदलू शकते. “मी टॉयलेट फ्लॅपर चेनच्या जागी नायलॉन रस्सीच्या तुकड्याने लावली आणि मी नियमितपणे बिजागरींना तेल लावते,” मेक्सिकोच्या सयुलिता येथील सुपरहोस्ट सारा म्हणतात, जिथे हवेतील आर्द्रता आणि मीठ मेटल फिक्स्चर खराब करू शकतात.
7. तुमच्या जागेची सुऱक्षिततेसाठी तयारी पुन्हा एकदा तपासा
सुरक्षिततेसाठी तुमची जागा अपडेट करणे ही नेहमीच फायदेशीर गुंतवणूक असते. सुरुवात करण्यासाठी “स्मोक अलार्म्स, कार्बन मोनॉक्साईड अलार्म्स, आणि एखादा अपघात किंवा घटना घडल्यास गेस्ट्सनी अनुसरण करण्याचे साईनेज” या उत्तम गोष्टी आहेत, स्पेनमधील लास पाल्मास डी ग्रॅन कॅनेरियाचे सुपरहोस्ट ब्रायन म्हणतात. मनःशांतीसाठी, तुमच्या जागेत अग्निशामक यंत्र आणि प्रथमोपचार किट स्टॉक करा. तुमच्या प्रदेशासाठीच्या विशिष्ट नियम आणि नियमनांची देखील तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे.
8. घराबाहेरची जागा आपलीशी वाटेल अशी तयार करा
गेस्ट्सना छान हिरवळ असलेली जागा आवडते आणि अशी जागा तयार करण्यासाठी तुमच्याकडे मोठे अंगण असले पाहिजे असे नाही. ऑस्ट्रेलियातील पार्कविल येथील सुपरहोस्ट लॉरेन्स यांना काही तरी मोठे करायचे आहे म्हणून ते "गच्चीच्या डेकवर कुंडींची बाग तयार करण्याचे नियोजन" करत आहेत. "मी समुद्र किनाऱ्यावरील स्वदेशी वनस्पती वापरणार आहे." पनामा सिटी, पनामा येथील सुपरहोस्ट अर्विंग गेस्ट्सना थोडा वेळ बाहेर घालवण्यासाठी प्रेरित करत आहेत. "मला बाल्कनीवर एक बाग तयार करायची आहे आणि गेस्ट्स निसर्गाशी कनेक्ट होऊ शकतील अशी जागा तयार करण्यासाठी अंगणातील फर्निचरचा एक सेट मी तिथे ठेवणार आहे."
9. गेस्ट्सच्या गरजा ओळखण्यासाठी तुमच्या जागेमध्ये रहा
कुठून सुरुवात करावी याची तुम्हाला खात्री नसल्यास, स्वत:ला तुमच्या गेस्ट्सच्या जागी ठेऊन विचार करण्याचा प्रयत्न करा. “तुम्ही नूतनीकरण किंवा सुधारणा सुरू करण्यापूर्वी, बॅग पॅक करा आणि काही रात्री आपल्या स्वत:च्या जागेत रहा,” दक्षिण चार्ल्सटन, ओहायोमधील सुपरहोस्ट सारा म्हणतात. “मग तुम्हाला आवश्यक असलेल्या, विसरलेल्या किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न करणाऱ्या गोष्टींची यादी बनवा.” पूर्ण अनुभव घेण्यासाठी तुम्ही गेस्टच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याची खात्री करा.
10. आणि तुमची लिस्टिंग अपडेट करायला विसरू नका!
तुमच्या जागेतील प्रत्येक सुधारणा ही तुमची लिस्टिंग अधिक आकर्षक बनवण्याची संधी आहे, त्यामुळे तुमचे वर्णन, सुविधांची यादी आणि फोटोज अपडेट करण्याची खात्री करा. तुम्हाला शक्य असेल तर, वर्सेस्टर, यूके मधील सुपरहोस्ट जॅकी सारखे व्यावसायिक फोटोग्राफीमध्ये पैसा लावायचा विचार करा. “ते सार्थक ठरले,” त्या म्हणतात. “बुकिंग्ज वाढल्या.”
आम्हाला आशा आहे की या कल्पना तुम्हाला आता आणि येणाऱ्या काही महिन्यांत आणि वर्षांमध्ये तुम्ही तुमची जागा सुधारू शकता अशा सर्व मार्गांचा विचार करण्यास प्रवृत्त करतील.
हायलाइट्स
रंगाच्या ताज्या हातापासून ते नवीन शीट्सपर्यंत, अगदी लहान अपडेट्सचाही मोठा प्रभाव पडू शकतो
स्वच्छतेसाठीचा वेळ कमी करण्यात, प्रतिबंधात्मक देखभाल सुरु ठेवण्यात आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकतील असे बदल करा
सुधारणेला कुठे वाव आहे हे ओळखण्यासाठी तुमच्या जागेमध्ये रहा—आणि तुम्ही अपडेट्स केल्यानंतर, तुमची लिस्टिंग अपडेट करा