लॉस एंजेलिसमधील वणवाग्रस्तांसाठी सहाय्य
आम्ही वणव्यांमुळे प्रभावित झालेल्या 22,000 हून अधिक लोकांना राहण्यासाठी घरे दिली आहेत आणि अजूनही मदत देत आहोत.
लॉस एंजेलिसमधील वणवाग्रस्तांसाठी सहाय्य
आम्ही वणव्यांमुळे प्रभावित झालेल्या 22,000 हून अधिक लोकांना राहण्यासाठी घरे दिली आहेत आणि अजूनही मदत देत आहोत.

7 जानेवारी 2025 रोजी लॉस एंजेलिसमधील जंगलांना लागलेल्या वणव्याने 2,00,000 हून अधिक लोकांना विस्थापित केले आणि 29 लोकांचे बळी घेतले. या आगीत 12,000 हून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून आसपासचे अनेक परिसर बेचिराख झाले आहेत.
सतत सपोर्ट


राहण्याची जागा प्रदान करा
संकटात सापडलेल्या लोकांसाठी सवलतीच्या दराने तुमची जागा लिस्ट करा.
आमचा प्रभाव
वणवे सुरू झाल्यानंतर लगेच, Airbnb.org ने प्रभावित लोकांना विनामूल्य, आपत्कालीन घरे ऑफर करण्यासाठी 211 LA या ना-नफा संस्थेसोबत भागीदारी केली. आम्ही 24 तासांच्या आत आमच्या पहिल्या गेस्टना रहायला घर दिले होते आणि आतापर्यंत 22,000 हून अधिक लोकांना आपत्कालीन घरे दिली आहेत.
9 जानेवारी ते 2 मार्च 2025 पर्यंतचा मॅप डेटा
लोकांना घराच्या जवळ राहायचे होते आणि त्यांनी त्यांच्या प्राथमिक निवासस्थानाच्या जवळ असलेल्या Airbnb वरील जागा बुक केल्या, ज्यामुळे त्यांना मुलांना शाळांमध्ये ठेवता आले, नोकरीच्या जवळ राहता आले आणि त्यांच्या स्थानिक कम्युनिटीमध्ये सक्रियपणे सहभागी राहता आले.
22,000
गेस्ट्सना राहायला घरे दिली
2,300
पाळीव प्राण्यांना राहायला घरे दिली
1,000
प्रथम मदत कर्मचार्यांना राहायला घरे दिली
होस्ट्स आणि गेस्ट्सच्या कहाण्या
परिस्थिती सामान्य होऊ लागली असताना, स्थानिक कम्युनिटीज एकमेकांना मदत करण्यासाठी सतत पुढे येत आहेत.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
मी Airbnb.org चे आपत्कालीन वास्तव्य कसे ॲक्सेस करू?
Airbnb.org द्वारे जागा कोण बुक करू शकते?
लॉस एंजेलिसमधील वणव्यांमुळे प्रभावित झालेले लोक Airbnb.org द्वारे आपत्कालीन वास्तव्ये बुक करण्यास पात्र असू शकतात—ज्यात विस्थापित लोक आणि अधिकृत क्षमतेत मदत करणारे मदत कर्मचारी यांचा समावेश आहे. पात्रता निश्चित करण्यात मदत करण्यासाठी Airbnb.org सरकारी संस्थांसह आणि ना-नफा भागीदारांसह काम करते. अधिक जाणून घ्या
मी Airbnb वर गेस्ट्ससाठी संपूर्ण भाड्याने माझे घर देऊ शकतो का आणि Airbnb.org द्वारे आपत्कालीन परिस्थितीत ते विनामूल्य किंवा सवलतीसह देऊ शकतो का?
होय. तुमच्यासाठी एक कॅलेंडर असेल, त्यामुळे गेस्ट्स तुमची जागा डबल-बुक करू शकणार नाहीत.
मला कसे कळेल की बुकिंग Airbnb.org वरून आले आहे?
जेव्हा Airbnb.org द्वारे आपत्कालीन वास्तव्यासाठी एखादी रिझर्व्हेशनची विनंती येते तेव्हा बुकिंग प्रक्रियेदरम्यान होस्ट्सना सूचित केले जाते.
गेस्ट्सचे वास्तव्य संपल्यावर काय होते?
रिझर्व्हेशनच्या रेकॉर्डनुसार ठरलेल्या वेळी चेक आऊट करण्यासाठी Airbnb.org चे गेस्ट्स जबाबदार असतील. ठरलेल्या वेळी चेक आऊट केले न गेल्यास, Airbnb कडे कुशल सपोर्ट एजंट्सची एक स्वतंत्र टीम आहे जी त्वरित चेक आऊट करण्यासाठी गेस्ट्सना मदत करेल.
मी Airbnb होस्ट नाही, पण नैसर्गिक आपत्तीनंतर मी माझे घर वास्तव्यासाठी देऊ इच्छित आहे. मी काय करावे?
तुम्ही केवळ Airbnb.org च्या माध्यमातून होस्ट करण्यासाठी साईन अप करू शकता, म्हणजेच तुम्ही केवळ आपत्कालीन वास्तव्यांची आवश्यकता असलेल्या गेस्ट्सनाच होस्ट कराल आणि तुम्ही तुमची जागा विनामूल्य देऊ शकाल. तुमची जागा गेस्ट्सना आपत्कालीन नसलेली वास्तव्ये बुक करण्यासाठी उपलब्ध नसेल.
आमच्या प्रतिसादांबद्दल अधिक जाणून घ्या
आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि ज्यांनी मदत केली त्यांना भेटा.