घराची भेट द्या

संकटाच्या वेळी तुम्ही आपत्कालीन घरे उपलब्ध करून देऊ शकता. गिव्हिंग टयूजडेला Airbnb सर्व एकदाच दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा 100% निधी जुळवत आहे.
आजच देणगी द्या

देणग्या कशा काम करतात

100% निधी थेट घरांसाठी वापरला जातो

तुम्ही दिलेला प्रत्येक डॉलर संकटाच्या वेळी लोकांना आपत्कालीन घरे पुरवण्यासाठी थेट वापरला जातो.

Airbnb सुद्धा देणगी देत आहे

Airbnb.org चे सर्व ऑपरेशनल खर्च Airbnb कव्हर करते आणि प्रत्येक आपत्कालीन वास्तव्यासाठी सर्व सेवा शुल्क माफ करते.

गेस्ट्स नेहमीच विनामूल्य राहतात

होस्ट्स त्यांची घरे उपलब्ध करून देतात, अनेक होस्ट्स सवलतही देतात. देणग्या उर्वरित खर्च कव्हर करण्यात मदत करतात, त्यामुळे गेस्ट्स नेहमीच विनामूल्य राहू शकतात.
चार गेस्ट्सचे एक कुटुंब आणि एक होस्ट जोडपे डेन्व्हरमधील घराच्या पुढच्या पायऱ्यांवर उभे आहेत.
सूझान आणि स्टीव्हने 2017 मध्ये डेन्व्हरमधील त्यांच्या घरामध्ये मूसा, राशा, जे आणि अली यांना होस्ट केले होते.

“सूझान आणि स्टीव्हने जवळपास महिनाभर आम्हाला मनापासून त्यांच्या घरी ठेवून घेतलं. आठ वर्षांनंतर ते आमचं कुटुंब बनले आहेत.”

—राशा, Airbnb.org गेस्ट
लोकांचा ग्रुप मोकळ्या हवेत जमला आहे, काहींच्या हातात पुस्तक आणि पाळीव कुत्रा आहे, बॅकग्राऊंडमध्ये स्ट्रिंग लाइट्स आहेत.
टेबलक्लोथने झाकलेल्या टेबलावर मोकळ्या हवेत लोकांचा ग्रुप एकत्र जेवतो आहे, बॅकग्राऊंडमध्ये पसरलेले स्ट्रिंग लाइट्स आहेत.
राशा, मूसा, जे आणि अली यांना कम्युनिटी मिळाली आहे आणि त्यांनी त्यांच्या Airbnb.org होस्ट्सच्या मदतीने डेन्व्हरमध्ये त्यांचे आयुष्य पुन्हा उभे केले आहे.

जगभरातील 60,000 हून अधिक Airbnb होस्ट्स Airbnb.org ला सपोर्ट करतात.

कम्युनिटीमध्ये सामील व्हा
Airbnb.org ही Airbnb ने स्थापन केलेली एक ना-नफा संस्था आहे.