आमच्याविषयी

Airbnb.org ही Airbnb ने स्थापन केलेली एक ना-नफा संस्था आहे जी संकटाच्या वेळी लोकांना आपत्कालीन घरांशी जोडते.
पार्श्वभूमीत लाकडी भिंत असलेल्या दारातून तपकिरी शर्ट घातलेली, गडद कुरळया केसांची एक स्त्री हसते आहे

हे सर्व एका होस्टपासून सुरू झाले

ही कल्पना शेल नावाच्या एका Airbnb होस्टकडून आली जिने 2012 मध्ये सँडी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना तिची जागा विनामूल्य ऑफर केली. तेव्हापासून, 60,000 हून अधिक Airbnb होस्ट्सनी जगभरातील 250,000 हून अधिक लोकांना घरे दिली आहेत.

आमचे मॉडेल युनिक आहे

Airbnb ऑपरेटिंगचा खर्च कव्हर करते, म्हणून सर्व सार्वजनिक देणग्यांच्या 100% रकमेतून गरजू लोकांसाठी आपत्कालीन घरांकरता निधी पुरवला जातो.
एका रांगेत उभी असलेली पाच विविध ॲनिमेटेड कॅरॅक्टर्स, प्रत्येकाने वेगवेगळे रंगीबेरंगी पोशाख घातले असून ते हात हलवत आहेत आणि हसत आहेत.

आमचा आपत्ती प्रतिसाद

दरवर्षी जगभरात लाखो लोक विस्थापित होतात. इथेच आम्ही आमच्या गेस्ट्सच्या राहण्याची व्यवस्था करतो.

आम्ही पार्टनर्ससोबत कसे काम करतो

जेव्हा एखादी आपत्ती येते, तेव्हा आम्ही सर्वाधिक गरज असलेल्या गेस्ट्सना शोधण्यासाठी आणि त्यांना आपत्कालीन घरे मिळवून देण्यासाठी स्थानिक संस्थांसह भागीदारी करतो.
211 चा लोगो
Catholic Charities USA लोगो
मेन्साजेरोस दे ला पाझ लोगो
IOM चा लोगो
ORAM चा लोगो
pertence चा लोगो
Airbnb चा लोगो

आम्ही Airbnb सह कसे काम करतो

Airbnb चे जागतिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म, सेवा आणि कम्युनिटीचा फायदा घेऊन Airbnb.org आपत्कालीन घरांची आवश्यकता असलेल्या लोकांना आपत्तींना बळी पडलेल्या ठिकाणांजवळ जागा उपलब्ध असलेल्या होस्ट्ससह मॅच करते. Airbnb.org एक 501(c)(3) सार्वजनिक धर्मादाय संस्था आहे, जी Airbnb पासून वेगळी आणि स्वतंत्र आहे. Airbnb तिच्या प्लॅटफॉर्मवर Airbnb.org द्वारे सपोर्ट केल्या गेलेल्या वास्तव्यांसाठी सेवा शुल्क कव्हर करते.

आमच्या बोर्ड सदस्यांना भेटा

जेनिफर बाँड हेडशॉट

जेनिफर बाँड

जेनिफर बाँड या लॉ प्रोफेसर असून निर्वासित धोरणातील जागतिक तज्ञ म्हणून त्यांना 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी Refugee Hub ची स्थापना केली आणि त्या Global Refugee Sponsorship Initiative च्या अध्यक्षा असून विविध संस्थांच्या सहकार्याने काम करतात. जेनिफर यांनी 20 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्वासितांच्या संरक्षणाच्या पद्धती डिझाईन केल्या आहेत, ज्यामध्ये विशेष करून अफगाणिस्तान आणि युक्रेनमधील संकटांना दिलेला प्रतिसाद समाविष्ट आहे. त्यांनी UNHCR सह सीरियामध्ये काम केले आहे आणि त्या कॅनडाच्या इमिग्रेशन मंत्र्यांच्या सल्लागार होत्या.
जे कार्नी हेडशॉट

जे कार्ने

जे Airbnb च्या ग्लोबल पॉलिसी अँड कम्युनिकेशन्स टीम्सचे नेतृत्व करतात. Airbnb च्या आधी त्यांनी Amazon च्या ग्लोबल कॉर्पोरेट अफेअर्स टीमचे नेतृत्व केले, तेव्हा त्यांनी सार्वजनिक धोरण, कम्युनिकेशन्स आणि कम्युनिटी एंगेजमेंटचे व्यवस्थापन केले आहे. ते राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे प्रेस सेक्रेटरी होते आणि त्यांनी 20 वर्षे TIME मॅगझिनमध्ये काम केले आहे. जे Urban Institute, TechNYC आणि Human Rights First यासह अनेक संस्थांच्या बोर्ड्सवर आहेत. त्यांनी येल युनिव्हर्सिटीमधून बीए केले आहे आणि येल युनिव्हर्सिटी कौन्सिलचे सदस्य आहेत.
कुरळे केस असलेली, लाल लिपस्टिक लावलेली एक ब्लॅक महिला हसत आहे.

शॅरियन मॅकस्वेन

Sharyanne is the President of Echoing Green, bringing over 40 years of experience in financial services and business operations. She has helped propel the organization to support social innovation leaders advancing racial, ethnic, and other equity globally. Before joining Echoing Green, Sharyanne was the Chief Financial and Administrative Officer at StoryCorps and worked at several banks and financial services firms. She holds an MBA from INSEAD in France and a BA in Urban Studies from Mount Holyoke College.
सोनेरी केस असलेली एक महिला, पांढरा बटन-डाउन शर्ट घालून हसत आहे.

कॅथरीन पॉवेल

कॅथरीन यांनी Airbnb च्या होस्ट्सच्या जागतिक कम्युनिटीचे नेतृत्व केले आणि होस्ट्ससाठी स्टँडर्ड्स, प्रशिक्षण आणि वैशिष्ट्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. Airbnb मध्ये सामील होण्यापूर्वी, कॅथरीन यांनी 15 वर्षांहून अधिक काळ Disney मध्ये काम केले, अगदी अलीकडे त्या अमेरिकेच्या पश्चिम भागातील Disney Parks च्या आणि Disneyland Paris च्या अध्यक्ष होत्या. त्याशिवाय, त्यांनी BBC Worldwide मध्ये 7 वर्षे काम केले आहे. कॅथरीन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पॉलिटिक्स, फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्सची पदवी घेतली आहे.
पांढरे केस असलेला माणूस, निळा शर्ट, लाल पॅटर्नचा टाय आणि राखाडी सूट जॅकेट घालून हसतो आहे.

रिच सेरीनो

रिच हे हार्वर्ड्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे एक प्रतिष्ठित सीनियर फेलो आहेत, जे National Preparedness Leadership Initiative सह काम करतात. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ लोक सेवा, आपत्कालीन मॅनेजमेंट, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि होमलँड सिक्युरिटीमध्ये काम केले आहे. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी त्यांची नियुक्ती केली होती आणि त्यानंतर त्यांनी FEMA चे आठवे डेप्युटी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम केले. FEMA च्या आधी, रिच यांनी बॉस्टन EMS मध्ये 36 वर्षे काम केले, जिथे ते पदोन्नती प्राप्त करत संस्थेचे प्रमुख बनले.
सोनेरी केस असलेली महिला काळ्या रंगाचा शर्ट आणि काळे नेकलेस घालून कॅमेऱ्याकडे बघून हसत आहे

जोसेलिन व्याट

जोसेलिन या Alight च्या CEO आहेत. मानवकेंद्रित दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करून धोरणे विकसित करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे आणि त्या 20 हून अधिक देशांमध्ये दरवर्षी 35 लाखांहून अधिक विस्थापित लोकांसाठी सन्मानजनक सेवा तयार करण्यात मदत करत आहेत. Alight च्या आधी, जोसेलिन IDEO.org च्या सहसंस्थापक होत्या तसेच CEO होत्या, जिथे त्यांनी सर्वसमावेशक उत्पादने आणि सेवा डिझाईन करण्यासाठी ना-नफा संस्थांसह काम केले. त्या Marketplace आणि Drucker Institute च्या सल्लागार मंडळावर आहेत तसेच Chief च्या संस्थापक सदस्य म्हणून काम करतात.

देणग्यांबद्दल काही प्रश्न आहेत का?

give@airbnb.org वर आमच्याशी संपर्क साधा
पार्श्वभूमीवर बुकशेल्फ असलेल्या आरामदायक खोलीत टेबलावर बसलेले दोन लोक हसत फोनवर काहीतरी चर्चा करत आहेत.

सहभागी व्हा

संकटाच्या वेळी आपत्कालीन घरे उपलब्ध करून देणार्‍या 60,000 हून अधिक होस्ट्सच्या कम्युनिटीत सामील व्हा.