Marianne

एका आईने तिच्या कुटुंबाला वाइल्डफायर्सपासून कसे सुरक्षित ठेवले

पाच जणांचे कुटुंब त्यांच्या स्वयंपाकघरात उभे आहे, गप्पा मारत आहे आणि त्यांच्या हातांत कॉफीचे मग आहेत.
दक्षिण कॅलिफोर्नियामधील ब्रिज फायरमुळे मारियानच्या कुटुंबाला त्यांचे घर सोडावे लागले.
जेव्हा मारियान आणि तिच्या कुटुंबाने कॅलिफोर्नियाच्या राईटवुडमधील त्यांच्या घरी टोबी नावाचे एक कुत्र्याचे नवीन पिल्लू आणले, तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांना पुढच्याच दिवशी तिच्याबरोबर घर सोडावे लागेल. मंगळवार, 10 सप्टेंबरची त्यांची सकाळ सर्वसाधारण होती. मारियानच्या 14, 12 आणि 9 वर्षांच्या मुली शाळेत गेल्या आणि तिने तिच्या पॅटिओमधून स्वच्छ आकाशाखाली काम केले.
मागील अंगणात एक महिला दोन कुत्र्यांबरोबर खेळत आहे, बॅकग्राऊंडमध्ये तीन लोक पोर्चवर उभे आहेत.
घर सोडण्याच्या एक दिवस आधी, या कुटुंबाने टोबी नावाचे एक नवीन कुत्र्याचे पिल्लू घरी आणले होते; हे नाव टोब्लरोनचे संक्षिप्त स्वरूप होते.
दुपारपर्यंत वाऱ्याचा वेग वाढला आणि लाइन फायर जवळ येताच आकाशातून राख पडत होती. अधिकाऱ्‍यांनी सर्वांना सर्व काही ठीक असल्याचे आश्‍वासन दिले तरी मारियानने मुलींना शाळेतून घरी आणले. त्यांना बाहेरची परिस्थिती आणखीनच बिकट होताना दिसली. “ते जगाचा अंत झाल्यासारखे दिसत होते,” मारियानने सांगितले. “माझा नवरा आणि मी म्हणालो, ‘मुलींनो, बॅग पॅक करा.’” त्यानंतर लवकरच निर्वासन आदेश आला.
"ते जगाचा अंत झाल्यासारखे दिसत होते. माझा नवरा आणि मी म्हणालो, 'मुलींनो, बॅग पॅक करा.'"
—मारियान, Airbnb.org गेस्ट
मारियानच्या घरामधून आगीमुळे गडद नारिंगी झालेले आकाश दिसत आहे.
मारियानच्या घरातून दिसणारे दृश्य आग किती जवळ आली होती हे दर्शवते. (मारियानने काढलेला फोटो)
दरम्यान, Airbnb.org ने निर्वासितांना Airbnbs मध्ये विनामूल्य ठेवण्यासाठीसॅन बर्नार्डिनो काऊंटीमधील Hearts & Lives आणि Visit Big Bear या स्थानिक ना-नफा संस्थांशी भागीदारी केली. भागीदारांना गेस्ट्स शोधण्यात आणि Airbnb.org द्वारे आपत्कालीन घरांबद्दल माहिती पसरवण्यात मदत करण्यासाठी तीन Airbnb होस्ट्सनी स्वेच्छेने काम केले. तारा,केटी आणि मोनिक यांनी इनटेक फॉर्म्स तयार केले, सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यांच्या कम्युनिटीजमधील निर्वासितांना घरे मिळवण्यात मदत करण्यासाठी स्थानिक भागीदारांसह चोवीस तास काम केले. “लोकांना काहीच सुचत नव्हते,” तारा म्हणाल्या. “जेव्हा त्यांनी ऐकले की त्यांच्या बाळाला रांगायला, तसेच त्यांना कपडे धुवायला, जेवण बनवायला जागा मिळू शकते, तेव्हा त्यांच्या आवाजात जो दिलासा होता—तो खरा कृतज्ञतेचा आवाज आहे.” होस्ट्स आणि भागीदारांच्या मदतीने Airbnb.org ने ब्रिज आणि लाईन फायरमुळे विस्थापित झालेल्या 1,000 हून अधिक सॅन बर्नार्डिनो रहिवाशांना, शेकडो मुले आणि पाळीव प्राण्यांसह, जागा मिळवून दिली.
दोन व्यक्ती एका आतील उबदार, लाकडी खोलीमध्ये सोफ्यावर जवळजवळ बसल्या आहेत आणि एकतेची आणि आरामाची भावना दर्शवत आहेत.
Airbnb सुपरहोस्ट्स तारा आणि केटी यांनी स्थानिक ना-नफा संस्थांना गरजू गेस्ट्सना ओळखण्यात आणि त्यांना Airbnbs मध्ये जागा मिळवून देण्यात मदत केली.

"जेव्हा त्यांनी ऐकले की त्यांच्या बाळाला रांगायला, तसेच त्यांना कपडे धुवायला, जेवण बनवायला जागा मिळू शकते, तेव्हा त्यांच्या आवाजात जो दिलासा होता—तो खरा कृतज्ञतेचा आवाज आहे."

—बिग बेअर, CA मधील Airbnb सुपरहोस्ट तारा
Airbnb.org होस्ट ताराची प्रोफाईल इमेज, व्हेरिफाईड चेकमार्क बॅजसह.
मारियानचे कुटुंब, टोबीसह, निर्वासन आदेशात असताना Airbnb मध्ये विनामूल्य राहिलेल्यांपैकी एक होते. “आमचं सारं विश्वच कोलमडलं होतं. शेवटी स्थिरस्थावर होण्यासाठी एक जागा मिळणे ही खूप मोठी दिलासा देणारी गोष्ट होती,” त्या म्हणाल्या. त्यांना अनेक दिवसांनी पहिल्यांदा बाथरूममधील साहित्य अनपॅक केल्याचे आठवले. “ही एक छोटीशी गोष्ट होती, परंतु जिथे मी माझे सामान ठेवू शकेन आणि विचार करू शकेन अशी एक जागा असणे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.”
आरामदायी लिव्हिंग रूममध्ये दोन मुली स्वतंत्र सोफ्यांवर खेळणी घेऊन बसल्या आहेत आणि बॅकग्राऊंडमध्ये स्वयंपाकघर आहे.
दोन आठवडे वाइल्डफायर्सचा मागोवा घेतल्यानंतर आणि त्यांच्या घराबद्दल काळजी केल्यानंतर, मारियानचे कुटुंब सुरक्षितपणे घरी परतू शकले.
दोन आठवड्यांनंतर, हे कुटुंब सुरक्षितपणे घरी परतू शकले, जिथे ते त्यांच्या प्राण्यांना पुन्हा भेटले आणि मुली शाळेत परतल्या. 2015 मध्ये राईटवुडला स्थलांतर केल्यानंतर, मारियान आणि तिच्या नवऱ्याला वाइल्डफायर्समुळे घर सोडावे लागण्याची ही दुसरी वेळ होती. कदाचित ही शेवटची वेळ नसेल, परंतु मारियानने सांगितले की तिला अशा कम्युनिटीमध्ये राहणे भाग्याचे वाटते, जिथे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत सपोर्ट मिळतो.“बरेच अज्ञात घटक होते, परंतु Airbnb.org ने आशा आणि आश्वासन दिले की आम्ही ह्यातून तारून जाऊ—केवळ आमच्या पाठीवरील कपड्यांसकटच नव्हे. तर आमची काळजी घेतली जाईल आणि आम्हाला सॉफ्ट लँडिंग मिळेल.”

Airbnb.org ला सपोर्ट करा

100% देणग्या थेट संकटाच्या वेळी लोकांना विनामूल्य राहण्यास अर्थसहाय्य करण्यासाठी वापरल्या जातात.
देणगी द्या