एक फोटोग्राफर त्याचे घर गमावल्यानंतर कम्युनिटीच्या शोधात आहे
केविन कूली यांना वणव्यांचे डॉक्युमेंटेशन करणे सवयीचे आहे. वणव्यांची आणि इतर नैसर्गिक घटनांची फोटोग्राफी करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. पण असाच एक वणवा अल्टाडेना येथील त्यांच्या कुटुंबाचे घर नष्ट करणार आहे याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती.
केविन आणि एक कलाकार आणि शाळेतील शिक्षिकासुद्धा असलेल्या त्यांच्या पत्नी ब्रिजेट यांनी त्यांचे घर, त्यांचा स्टुडिओ आणि त्यांच्या बऱ्याच कलाकृती गमावल्या. त्यांना त्यांचा मुलगा कोपर्निकस आणि त्यांचा कुत्रा गॅलेक्सी यांच्यासह ती जागा सोडावी लागली. ब्रिजेट यांना 211LA च्या माध्यमातून Airbnb.org देत असलेल्या मोफत, आपत्कालीन घरांविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी त्वरीत क्रेडिट्ससाठी अर्ज केला.
केविन, ब्रिजेट, कोपी आणि गॅलेक्सी हे Airbnb.org च्या माध्यमातून मिळालेल्या एका Airbnb घरात अनेक आठवडे विनामूल्य राहिले.
हे कुटुंब अनेक आठवडे एका Airbnb घरात वास्तव्य करून असताना, तिथे त्यांनी पुढे काय केले पाहिजे यावर विचारविनिमय केला. “सध्या आम्ही फक्त शांतपणे बसून आहोत आणि पुढची परिस्थिती कशी हाताळायची यावर विचार करायचा प्रयत्न करत आहोत,” केविन म्हणाले.

प्लेसहोल्डर
“आपले घर आणि आपले सामान गमावणे हे नक्कीच दुःखद आहे,” ब्रिजेट म्हणाल्या. "पण ही कम्युनिटी इतकी चांगली आहे की मला ती खरंच गमवायची नाहीये."
त्यांच्या वास्तव्यादरम्यान, केविन यांनी एका स्थानिक गॅलरीमध्ये त्यांचे काम प्रदर्शित केले आणि वणव्यांच्या आधीच योजलेले त्यांचे पुस्तकसुद्धा लाँच केले. त्या निमित्ताने त्यांना त्यांच्या कम्युनिटीला अशा वेळेस एकत्र आणण्याची संधी मिळाली जेव्हा त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाला कनेक्शन आणि सपोर्टची गरज होती.
“आपले घर आणि आपले सामान गमावणे हे नक्कीच दुःखद आहे,” ब्रिजेट म्हणाल्या. “पण ही कम्युनिटी इतकी चांगली आहे की मला ती खरंच गमवायची नाहीये.” या कुटुंबाला दीर्घकाळ राहण्यासाठी एक घर मिळाले आणि आता ते त्यांच्या कम्युनिटीला एकत्र ठेवण्यासाठी काम करत आहेत.सहभागी व्हा
संकटाच्या वेळी आपत्कालीन घरे उपलब्ध करून देणाऱ्या एका जागतिक कम्युनिटीत सामील व्हा.
अधिक जाणून घ्याप्रत्येक वास्तव्याची एक कहाणी असते
आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि ज्यांनी मदत केली त्यांना भेटा.