लॉस एंजेलिसमधील वणवे

वणव्यानंतर बेन कुटुंबीय एकमेकांना घट्ट आधार देत एकत्र राहिले

बेन कुटुंब हे अल्टाडेना, कॅलिफोर्निया येथील कम्युनिटीचा अविभाज्य भाग आहेत आणि ते एक सांगीतिक कुटुंब म्हणून ओळखले जाते. लॉरी आणि ऑस्कर यांची सात मुले वाढत असताना स्थानिक शाळेत, चर्चमध्ये आणि कम्युनिटी इव्हेंट्समध्ये नियमितपणे गात होती आणि अजूनही एकत्र गाणी सादर करत असतात.बेन कुटुंब अल्टाडेना येथे 1950 च्या दशकापासून राहत होते आणि त्या भागात घरे विकत घेणाऱ्या पहिल्या काही कृष्णवर्णीय कुटुंबांपैकी एक होते. मुले त्यांची आजी आणि काका-काकूंपासून थोड्याच अंतरावर राहत होती. ते त्यांच्या अंगणात फळे वेचण्याची कामे करत.

गवताने आच्छादित अंगणात लाल केस असलेली एक आई तिच्या बाळाला हाती घेऊन दुसऱ्या एका बाईसह उभी आहे.

लॉरी आणि ऑस्करच्या मुलांपैकी जेष्ठ असलेल्या लॉरेन बेन यांनी सांगितले की, “आम्ही अत्यंत भाग्यवान होतो कारण आम्ही अशा कम्युनिटीमध्ये वाढलो, जिथे आमच्याचसारखी आपल्या घरात राहणे महत्त्वाची मानणारी आणि पिढ्यानुपिढ्या त्याच कम्युनिटीत राहणारी कुटुंबे होती”.

“घर गमावणे ही एक दुःखाची बाब आहेच. पण तुम्ही तुमच्या वारशाचा एक भाग गमावला आहे हे आणखी दुःखदायक असते.”

जेव्हा ईटनची आग अल्टाडेनामध्ये पसरली, तेव्हा लॉरेनच्या पालकांचे घर, तिच्या आजीचे घर आणि तिच्या भावाचे घर जळून गेले. “घर गमावणे ही एक दुःखाची बाब आहेच. पण तुम्ही तुमच्या वारशाचा एक भाग गमावला आहे हे आणखी दुःखदायक असते,” लॉरेन म्हणाल्या.

टॅन कोट आणि फेस मास्क घातलेली एक महिला डोंगराच्या पार्श्वभूमीवरील एका जळालेल्या घराच्या अवशेषांमध्ये उभी आहे.

बेन दांपत्याने सात मुलांना जिथे वाढवले होते ते घर आणि आसपासच्या परिसरातील इतर अनेक घरे गमावली.

बेन कुटुंबाने त्यांची जागा सोडली तेव्हा आपण थोड्या दिवसांत परत येऊन असे त्यांना वाटले होते. ऑस्कर ऑक्सिजनवर होता आणि धूर टाळण्यासाठी ते अतिरिक्त सावधगिरी बाळगत होते. ते घरी परत जाऊ शकणार नाहीत हे लवकरच स्पष्ट झालं, आणि लॉरेनने Airbnb.org आणि 211 LA च्या माध्यमातून आपत्कालीन घरासाठी अर्ज केला. ऑस्कर आणि लॉरीच्या तीन नातवंडांसह बेन कुटुंबातील अकरा जण एका Airbnb घरात महिनाभरापेक्षा जास्त काळ विनामूल्य राहिले आणि आता पुढे काय करावं यावर विचार करत होते.

गुलाबी सनग्लासेस घातलेली एल मुलगी निळ्या आकाशाखाली गवताळ अंगणातील खुर्चीवर बसून मंद स्मितहास्य करत आहे.

बेन कुटुंबाला जागा शेअर करून राहण्याची आणि दररोजच्या आयुष्यात एकमेकांना मदत करण्याची सवय आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी एकत्र राहणे खूप महत्त्वाचे होते. “जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा आम्हाला आयुष्य पुन्हा सामान्य झाल्यासारखे वाटले,” लॉरी म्हणाल्या. एके दिवशी त्यांनी स्पॅगेटी बनवली. घर गमावल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी घरी शिजवलेले जेवण खाल्ले होते. धाकट्या नातवाने आपली पहिली पावले याच घरात टाकली.

“आयुष्य आता पहिलेसारखे होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे, परंतु कम्युनिटी या प्रसंगाचा धीराने सामना करेल आणि आमच्यासह या संकटातून बाहेर पडेल अशी आम्हाला आशा आहे.”

तीन पुरुष एकमेकांच्या जवळ झुकले आहेत आणि थेट समोर पाहत आहेत, मधल्या माणसाने ऑक्सिजन मास्क घातलेला आहे.

त्यांच्या Airbnb. org वरील वास्तव्यादरम्यान, बेन कुटुंबाला पुढील वर्षासाठी दीर्घकाल राहण्यासाठी एक घर मिळाले. अल्टाडेनाला परत जाऊन फक्त त्यांची घरांचीच नाही तर त्यांना चिरपरिचित असलेल्या जगण्याच्या पद्धतीची पुनर्बांधणी करणे ही त्यांची योजना आहे.

सहभागी व्हा

संकटाच्या वेळी आपत्कालीन घरे उपलब्ध करून देणाऱ्या एका जागतिक कम्युनिटीत सामील व्हा.

अधिक जाणून घ्या

प्रत्येक वास्तव्याची एक कहाणी असते

आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि ज्यांनी मदत केली त्यांना भेटा.